ईडी विषयी माहीती- ED information in Marathi
मित्रांनो टिव्हीमध्ये आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकत असतो की अमुक अमुक राजकीय नेता,उद्योजक व्यक्तीची त्याच्या संपुर्ण मालमत्तेची ईडी कडुन चौकशी केली जाणार आहे.
अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे ईडी काय भानगड आहे?ईडीचे काम काय असते?ईडी कडुन काही व्यक्तींची त्यांच्या मालमत्तेची कडुन चौकशी का केली जाते?
म्हणून आजच्या लेखात आपण ईडीविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपणास आपल्या प्रश्नांची सर्व उत्तरे प्राप्त होतील.l
इन्फोर्समेंट म्हणजे काय?Enforcement meaning in Marathi
इनफोर्समेंटचा अर्थ अंमलबजावणी असा होत असतो.
ईडीचा फुलफाँर्म काय होतो?ED full form in Marathi
ईडीचा फुलफाँर्म enforcement directorate असा होत असतो ज्याला मराठीत अंमलबजावणी संचालनालय असे म्हणतात.
ईडी का मतलब क्या होता है?ED meaning in Hindi
ईडी का मतलब प्रवर्तन निदेशालय ऐसे कहा जाता है
ईडी म्हणजे काय?ED meaning in Marathi
जेव्हा एखादी व्यक्ती आपली एखादी बेहिशोबी संपत्ती मालमत्ता इन्कम टँक्स म्हणजेच आयकर चुकवण्यासाठी,टँक्स भरणे टाळण्यासाठी विशेषकरून उभारत असते.
तेव्हा अशा व्यक्तींची त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी इडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय ही तपास यंत्रणा करत असते.
ईडीचे प्रमुख काम काय असते?
ईडी ह्या तपास यंत्रणेचे काम आर्थिक घोटाळे ब्लँक मनी अणि पैशांच्या झालेल्या गैरव्यवहाराविषयी कसुन चौकशी करणे हे आहे.
ईडी ह्या तपास यंत्रणेचे कामकाज कोणाअंतर्गत चालते?
ईडी ह्या तपास यंत्रणेचे काम केंद्र सरकारच्या महसुल अर्थ मंत्रालय विभागाअंतर्गत चालते.
ईडी ह्या तपास यंत्रणेची स्थापणा कधी अणि केव्हा करण्यात आली होती?
ईडी ह्या तपास यंत्रणेची स्थापणा दिल्ली येथे 1956 साली करण्यात आली होती.
ईडीकडुन कोणत्या कायदयांची अंमलबजावणी केली जाते?
1)एफ ई एम ए -foreigh exchange management act 1999
2) पी एम एल ए -prevention of money laundering act 2002
वरील दोन कायद्यांचे एखाद्या व्यक्तीने उल्लंघन केल्यास ईडी ही तपास यंत्रणा त्या व्यक्तीची त्याच्या संपत्ती मालमत्तेची कसुन चौकशी करत असते.
ईडीकडे कोणकोणते अधिकार असतात?
ईडी ह्या तपास यंत्रणेकडे एखाद्या व्यक्तीची चौकशी करणे,त्याला बेडया घालून अटक करणे,त्या व्यक्तीवर खटला दाखल करणे,गुन्हा नोंदविणे,त्याच्या अनैतिक मालमत्ता संपत्तीवर जप्ती आणने हे अधिकार असतात.
ईडीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
ईडीचे मुख्य कार्यालय चंदिगढ कोलकत्ता चेन्नई,दिल्ली मुंबई इत्यादी ह्या शहरात आहे.
ह्या यंत्रणेची विभागीय तसेच उपविभागीय कार्यालये संपुर्ण भारत देशामध्ये विविध कानाकोपरयात स्थित आहेत.
आतापर्यत ईडीची भारतामध्ये एकुण 50 कार्यालये आहेत.
दिल्ली येथील ईडी ह्या तपास यंत्रणेचे कार्य विशेष संचालकांमार्फत पार पाडले जाते.
ईडी पासुन कोणाला अधिक धोका असतो?
असे उद्योजक,राजकीय नेता,अभिनेता,करोडपती व्यक्ती ज्यांनी खास आपला कर चुकवण्यासाठी आपल्या एखाद्या संपत्तीची उभारणी केली आहे.
अणि तिचा हिशोब देखील सरकारकडे दिलेला नाहीये अशा बेहिशोबी मालमत्ता असलेल्या व्यक्तींवर ईडी कडुन कारवाई केली जात असते.
1 thought on “ईडी विषयी माहीती – ED information in Marathi”
Comments are closed.