आषाढी एकादशीचे महत्व

आषाढी एकादशीचे महत्व-

1)आषादी एकादशी म्हणजे काय?

आषाढी एकादशी ही आषाढ शुक्ल पक्षात येणारी एकादशी असते.जिला देवशयनी आषाढी एकादशी असे देखील म्हटले जाते.

2022 मध्ये आषाढी एकादशी कधी आहे?

2022 मध्ये आषाढी एकादशी 10 जुलै रोजी रविवारच्या दिवशी आहे

आषाढी एकादशीला अध्यात्मिक दृष्टया काय अणि किती महत्व आहे?

आषाढी एकादशी हा जुलै महिन्यातील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे.कारण ह्या दिवशी सर्व वारकरी प्रचंड संख्येत पंढरपुर येथे विठठलाचे दर्शन घेण्यासाठी जमत असतात.

अध्यात्मिक दृष्टुकोणातुन पाहिले तर भक्त मंडळी वारकरी यांच्यासाठी हा एक खुप महत्वपूर्ण दिवस आहे.कारण भक्त मंडळी साठी हा जणु काही एक उत्सवाचाच दिवस असतो.

आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी वारकरी मंडळ हे लाखोच्या संख्येत पंढरपुर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी पदयात्रा करून दाखल होत असते.

आषाढी एकादशीला देहु गावचे संत तुकाराम यांची तसेच आळंदी ह्या गावाचे संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी वाजत गाजत पंढरपुरात दाखल होत असते.

याचसोबत पैठण येथुन संत एकनाथ महाराज यांची पालखी तसेच त्रयंबकेश्वर येथुन निवृत्ती महाराज यांची पालखी देखील मोठया उत्साहात वाजत गाजत पंढरपुरात यादिवशी दाखल होत असते.

यादिवशी लाखो वारकरी लोक टाळ अणि मृदृंग या दोघांच्या आवाजात विठठल भक्तीत तल्लीन होऊन तसेच ज्ञानोबा तुकोबा यांची पालखी खांद्यावर घेऊन आनंदाने पंढरपुरला जाण्यासाठी पंढरपुरच्या दिशेने पदयात्रा करीत असतात.

ह्या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करण्याला अणि विठुरायाचे दर्शन घेण्याला खुपच महत्व आहे.सर्वच विठठलभक्त वारकरी व्यक्ती या दिवशी पंढरपुरला विठठलाचे दर्शन घेण्यासाठी न चुकता जात असतात.

See also  कंटेट रायटिंग म्हणजे काय ? करियर संधी - Content Writing Information In Marathi

अणि समजा जर एखाद्या वेळी आपण नाही जाऊ शकलो तर अशा वेळी घरीच उपास केला जातो अणि मोठया श्रदधेने विठठलाची पुजा अर्चा-आराधना केली जाते.

असे देखील म्हटले जाते की पंढरपुरला वारीसाठी जाण्या अगोदर सर्व शेतकरी आपापल्या शेतात पिकांची पेरणी करतात.अणि वारी पुर्ण करून घरी आल्यावर त्यांच्या शेतातील पीक माल वाढु लागलेले असते.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हटले जाते?

उत्तरायनास देवांचा दिवस अणि दक्षिणायनास देवांची रात्र असे म्हटले जाते.अणि आपल्याला माहीतच आहे की आषाढ महिन्यामधल्या कर्क संक्रातीच्या दिवशी दक्षिणायनास आरंभ होतो अणि उत्तरायन पुर्ण झालेले असते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर हा कालावधी देवांचा निद्रेचा काळ असतो म्हणुन यास आषाढी एकादशी तसेच देवशयनी एकादशी असे संबोधित केले जात असते.

असे म्हटले जाते की ह्या काळात राक्षसी बळ अधिक वाढत असते.अणि ह्याच राक्षसी शक्तींपासुन आपला बचाव व्हावा यासाठी भगवान विष्णुंची पुजा आराधना करावी तसेच व्रत देखील करायला हवे.

अणि हे व्रत केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपणास आर्शिवाद देतो अणि आपल्या मनातील सर्व ईच्छा देखील पुर्ण होत असतात.

आषाढी एकादशीचे पौराणिक महत्व –

सत्ययुगामध्ये मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राज्य करत होता.त्याच्या राज्यात सर्व प्रजा आनंदाने व गुण्यागोविंदाने राहत होती.

पण अचानक लागोपाठ तीन वर्षे पाऊस न पडल्याने राज्यात भीषण दुष्काळाचा प्रसंग निर्माण झाला.

सर्व प्रजा याने त्रस्त झाली होती सगळीकडे हाहाकार माजला होता.

प्रजेची ही दयनीय अवस्था पाहून राजाला राहावले नाही अणि तो यावर उपाय शोधण्यासाठी जंगलाकडे निघाला.

वाटेत खुप प्रवास करून भटकंती करून राजा मांधाता अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला.अणि राजाने त्यांना आपली सर्व व्यथा सांगितली.

मग राजाची व्यथा ऐकून अंगिरा ऋषींनी राजाला सांगितले की तू राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचे व्रत कर.

See also  WWE champion, superstar ब्रे व्हाईट याचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

या उपवासाच्या प्रभावामुळे राज्यात नक्कीच पाऊस पडेल.अंगिरा ऋषींचे म्हणणे ऐकून मांधाता राजा आपल्या राज्यात पुन्हा परतला.

अणि राजाने नियमानुसार अंगिरा त्रषींनी सांगितल्याप्रमाणे देवशयनी एकादशीचे व्रत केले, अणि मग त्या व्रताच्या प्रभावाने राज्यात चांगला पाऊस पडला आणि संपूर्ण राज्य संपत्तीने परिपूर्ण झाले.राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला.

आषाढी एकादशीच्या व्रताची महती –

● जो व्यक्ती आषाढी एकादशीचे व्रत करत असतो त्याला भरपुर धन प्राप्त होते.

● काही शारीरिक आजार असेल तर त्यापासून देखील मुक्ती मिळते.अणि मनाला शांतता मिळते.