इंटरनेट अणि मानवी जीवन – इंटरनेट म्हणजे काय ?

इंटरनेट म्हणजे काय ?

इंटरनेट म्हणजे काय ?

इंटरनेट हे एक जागतिक इंटरनेट नेटवर्क आहे जे आपल्याला अनेक प्रकारची माहिती आणि सुविधा पुरविण्याचे काम करते. आपल्याला माहिती आणि सुविधा प्रदान करण्यासाठी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/TCP/ IP आइपी प्रोटोकॉलद्वारे (TCP/IP) दोन संगणकांमधील स्थापण केलेल्या कनेक्शनला इंटरनेट असे म्हणतात.

 इंटरनेट अणि मानवी जीवन यांचा सहसंबंध तसेच डिजीटल पदधतीचा अणि इंटरनेटचा मानवी जीवना वर मोठ प्रभाव पडत आहे.

इंटरनेट अणि मानवी जीवन ह्या दोघांचा काय परस्पर संबंध आहे हे हे आपण आज दइंदिन जीवनातअनुभवत आहोतच , इंटरनेट ने संवाद संचार दळणवळण आणि परिवहन क्षेत्रात तर क्रांती च आणली आहे.

आज जागोजागी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वाना कामावर प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाहीये कारण गर्दी वाढली तर कोरोनाचा संसर्ग वाढत जाणार अणि रुग्णांची संख्याही वाढत जाणार.त्यामुळे आपण सर्व जण प्रत्यक्ष कामासाठी एकमेकांना भेटु शकत नाही एकमेकांसोबत काम तसेच व्यवहार करु शकत नाहीये अशावेळी इंटरनेट हे खुप चांगले माध्यम म्हणुन कार्य करते आहे आपल्यासाठी वर्क फ्राँम होम करण्यासाठी.

आज कोरोनाच्या काळात जे काही व्यवहार उद्योग व्यवसायांचे काम चालले आहे ते सर्व आँनलाईनच चालले आहे.एवढेच काय तर आज सर्व व्यवसाय उद्योग धंदे हे डिजीटल पदधतीनेच चाललेले आपणास दिसुन येतात.

सगळयांनीच ह्या डिजीटल पदधतीचा अवलंब केलेला आपणास दिसुन येतो आहे अगदी लहान मुलांच्या शाळांपासुन मोठया मुलांचे काँलेज हे सर्व डिजीटल पदधतीने म्हणजेच इंटरनेटवर आँनलाईन होताना आपणास दिसुन येते आहे.सर्व तासिका तसेच लेक्चर हे आज आपल्याला आँनलाईन पदधतीनेच होताना दिसुन येता आहे.अणि हे सर्व घडते आहे ते इंटरनेटमुळे.

पैशाचे व्यवहार म्हणजेच पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी आता आपल्याला बँकेत जाण्याची गरज पडत नाही आपण एका ठिकाणी बसुन गुगल पे तसेच फोन पे वरुन ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याला आज पाठवु शकतो त्यासाठी आज आपल्याला कोणाला प्रत्यक्ष भेटण्याची तसेच त्याच्या समोर जाण्याची गरज पडत नाही.अणि त्यामुळे आज कोरोनाचा संसर्ग वाढण्याचेही प्रमाण कमी होत चालले आहे कारण आज लोक सर्व व्यवहार व्यवसाय उद्योग हे इंटरनेटवर आँनलाईन पदधतीने करता आहे.अणि आज हे सर्व घडुन येते आहे आपण डिजीटल पदधतीचा तसेच इंटरनेट जगताचा अवलंब केल्यामुळे अणि याचे अनेक फायदे आहेत.आपला वेळ वाचतो म्हणजेच घरातुन निघायचे मग बँकेत जायचे मग पैशाचे व्यवहार करायचे त्यापेक्षा जागेच बसुन आँनलाईन पदधतीने पैसे ट्रान्सफर केल्यास आपल्या उर्जेचीही बचत होते.अणि आपला वेळही वाचत असतो.

आज किराणा खरेदीपासुन तर पुस्तक विकत घेण्यासाठी सुदधा लोक आँनलाईन म्हणजेच डिजीटल पदधतीचा वापर करता आहे.अँमेझाँन प्लीप कार्ट झोमँटो यासारख्या आँनलाईन सेवा पुरविणारया माध्यमांदवारे लोक घरबसल्या कपडे पुस्तके EBooks, कादंबरी,, संसारोपयोगी वस्तु खरेदी करता आहे एवढेच नव्हे तर आज लोक जेवण सुदधा आज एक फोनवर आँनलाईन मागवता आहे.फक्त मोबाईल फोनवर आँनलाईन आँडर्र करायची आपल्याला ज्या पत्यावर ती आँडर्र हवी तो पत्ता पाठवायचा आँनलाईन पेमेंट करायचे मग पुस्तक कपडे दागिने इत्यादी सर्व काही आपल्याला घरबसल्या प्राप्त होते.

See also  Jio चे ३ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन ४० जीबी पर्यंत मोफत डेटा

ह्यात कधीकधी फसवणुक सुदधा होत असते आपण फक्त अशा आँनलाईन  सेवा पुरविण्याचे आमिष दाखवुन आपल्याला फसवणारया भामटयांपासुन सावध राहणे आवश्यक आहे.आज इंटरनेटचा जसा खुप फायदा आपल्याला होतो आहे तसा त्याचा गैरवापर करून खुप लोक त्याचा सर्व सामान्य लोकांना फसवण्यासाठी गैरफायदाही उठवताना दिसुन येता आहे जसे की इंटरनेट फ्राँड सायबर क्राईम Phishing असे प्रकार सुदधा घडताना आपणास दिसुन येत आहे.ज्यात आँनलाईन जाँबच्या नावाखाली लोकांची फसवणुक केली जाते.त्यांना बँकेतुन बोलतो आहे असे सांगुन त्यांच्या अकाउंटची पुर्ण माहीती काढुन त्यांना लुबाडले जाते.

कोणत्याही नाण्याच्या दोन बाजु असतात एक छापा म्हणजे चांगली बाजु अणि एक काटा म्हणजेच वाईट बाजु आपण यात वाईट परिणाम दुर्लक्षित करायचे तसेच त्याला आपण बळी पडणार नाही याची काळजी घ्यायची.अणि त्याच्या चांगल्या परिणामांचा तसेच सुविधांचा लाभ उठवायचा असतो.कारण वाईट परिणामांचाच विचार करत जर आपण बसलो तर त्यापासुन मिळणारया चांगल्या लाभाचाही आस्वाद आपल्याला घेता येणार नाही.म्हणुन चांगले ते धरायचे अणि वाईट ते सोडायचे.

 मित्रांनो आज इंटरनेटमुळे आपल्याला एका ठिकाणी बसुन फक्त इंटरनेटवर सर्च करुन लाखो ठिकाणांची माहीती प्राप्त करता येते.विविध ब्लाँगस वाचुन वेगवेगळया विषयांचे क्षेत्रांचे ज्ञान प्राप्त करता येते. आपल्याला आरोग्य विषयक सल्ला हवा असेल किंवा एका।धार्मिक पुस्तक वाचावयास वाटत असेल तर असंख्य पुस्तके उपलब्द आहेत.

ई साहित्य किंवा पुस्तकलाय साइट्स वर हजारो पुस्तके आपण फ्री मध्ये डाऊन लोड करू शकता !!

ज्ञानेश्वरी, श्रीमद्भवगीता किंवा अन्य पुस्तके आपण नक्कीच वाचावयास हवीत,, थोडक्यात  काय तर आज इंटरनेटमुळे आपल्याला हवी ती मराठी माहिती चुटकीसरशी मिळते

इंटरनेट वेबघरबसल्या आँनलाईन काम करुन पैसे कामविण्याच्या संधी आज ह्या कोरोनाच्या काळात आँनलाईन जाँबला खुप डिमांडही वाढला आहे.कोणी फ्रिलान्सर म्हणुन आँनलाईन काम करते आहे.तर कोणी स्वताचे ब्लाँग तसेच युटयुब चँनलवरुन आज घरबसल्या पैसे कमविताना दिसुन येते आहे. आपल्याला आवड असेल तर आपण डोमेन होस्टिंग खरेदी करून वेबसाईटव।डिजाईन।करू शकता कींवा स्वतःच्या ब्लॉग द्वारे पैसे कमवू शकता.

ही फक्त एका जागेवर बसुन काम करुन अणि हे सर्व शक्य होते आहे डिजीटायझेशनमुळे म्हणजेच आँनलाईन डिजीटल,इंटरनेट पदधतीचा अवलंब केल्यामुळे.

इंटरनेटमुळे आज कम्युनिकेशन इतके सोपे झाले की आपण दुर परदेशात असलेल्या मित्राशीही आज आपण आँनलाईन संवाद तसेच संपर्क साधु शकतो.जसे की फेसबुक व्हाँटस अँप आय एम ओ इत्यादी सारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे आपण कुठल्याही व्यक्तीशी चँटिंग करु शकतो त्याला व्हिडिओ कालिंग सुदधा करु शकतो त्याला बघु शकतो फक्त ह्या सर्वासाठी एक गोष्ट फार गरजेची असते ती म्हणजे अँड्राँईड मोबाईल अणि त्यात इंटरनेटचा बँलन्स.अणि इंटरनेट कनेक्शन.

पुढील जग हे नवीन आधुङ्क तंत्र्ज्ञान संपन्न होत जाणार आहे  जसे की

  • क्रीप्टो करन्सी – बीआयटी
  • ब्लॉक चेन Block Chain
  • Iot
  • Big Data
  • Virtual Reality
  • Cyber Security
  • Data Science
  • Cloud Computing
  • Augmented Reality
  • Artificial  Intelligence
  • Machine Leaning
  • Code Languages- Arduino
  • Deep Leaning
  • Nan robots
  • Catboats
  • ‘Human Algorithms
  • Sheet Music
  • Smart Homes, Quantum Computing, Self Driving Cars, Hologram Etc
  • ब्लॉक  चैन,बिग डाटा ,वरचूयल रिऍलिटी
  • सायबर  सिक्युरिटी,डेटा   सायन्स
  • क्लाऊड कॉम्पुटिंग ,अगुमेंटेड रिऍलिटी
  • आर्टीफिशियल   इंटेलिजन्स,मशीन लर्निंग
  • कोडे  भाषा – ,डिप लर्निंग,नॅनोरोबोट्स ,चाटबॉट्स  ,हुमान  अल्गोरिथम्स
  • शिट संगीत स्मार्ट होम्स ‘ , Quantum   कॉम्पुटिंग , सेल्फ  ड्रायविंग  कार्स , होलोग्राम Etc 2021 सामान्य इंटरनेट वापर आकडेवारी
  • सध्याची जगभरात अंदाजे लोकसंख्या 8.8 अब्ज आहे, अंदाजे 4.9 on अब्ज लोकांना इंटरनेट उपलब्ध आहे आणि
  • जगातील63.२% लोक इंटरनेट वापरतात. सन 2000 ते 2020 पर्यंत इंटरनेटचा वापर 1, 266% वाढला.
  • 2021 मध्ये,बहुतेक इंटरनेट वापरकर्त्यांसाठी आशियाचा सर्वात वाटा मोठा
  • अशियातील लोक ऑनलाइन आहेत, जे प्रमाण जागतिक इंटरनेट लोकसंख्येच्या 51.8% आहे.
  • उत्तर अमेरिकेच्या 90.3% आणि युरोपमधील 87.2% लोक दररोज इंटरनेट वापरतात .जगातील हे दोन प्रदेश आहेत ज्यात सर्वाधिक इंटरनेट प्रवेश दर आहे. 2000 पासून मध्य पूर्वात इंटरनेट वापरात 5,227% वाढ झाली आहे.
  • जगात सध्या 370.7 दशलक्ष नोंदणीकृत डोमेन नावे आहेत.
  • सर्व वेबसाइटपैकी 34.5% वर्डप्रेस त्यांची सामग्री व्यवस्थापन प्रणाली म्हणून वापरत आहेत.
  • 2021 मध्ये, दररोज 306 अब्ज ईमेल पाठविले जात आहेत.
  • 2022 पर्यंत, ही संख्या दररोज पाठविलेल्या आणि प्राप्त झालेल्या 333.2 अब्ज ईमेलपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. दर मिनिटाला अमेरिकन लोक 3,138, 420 जीबी इंटरनेट डाटा वापरतात .
  • सर्वात सामान्य डोमेन नाव विस्तारः .com .net .org .co .us
  • 2020 मध्ये वेबवर सर्वाधिक 10 भेट दिलेल्या साइट्सः
  • गूगल
  • YouTube
  • Tmail
  • बायडू
  • QQ
  • सोहू
  • फेसबुक
  • तोबाओ taobao
  • Amazon अमेझॉन
  • Jd.com
  • 2019 च्या तुलनेत, Google आणि YouTube समान पदांवर राहिले, परंतु फेसबुक आधीच्या वर्षी 3 ते 4 पर्यंत घसरल्यानंतर 4 ते 7 पर्यंत खाली आला. या यादीतील पुढील चार साइट्स सर्व चिनी वेबसाइट्स आहेत, चीनच्या इंटरनेट वापराच्या निरंतर वाढीचे सूचक आहे .
  • सोशल मीडिया स्टॅटिस्टिक्स जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया चॅनेल अशी आहेत:
  • फेसबुक: २.7 अब्ज सक्रिय वापरकर्ते
  • YouTube: 2 अब्ज
  • फेसबुक मेसेंजर: 1.3 अब्ज सक्रिय वापरकर्ते
  • इंस्टाग्राम: 1.158 अब्ज सक्रिय वापरकर्ते
  • लिंकडन: 766 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते
  • टिकटोक: 689 दशलक्ष
  • ट्विटर: 330 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते (335 दशलक्षांपेक्षा कमी)
  • स्नॅपचॅट: 294 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते
  • YouTube: 8 अब्ज
  • नेटफ्लिक्स: 150million
  • वीमिओ : 130 दशलक्ष
  • याहू! स्क्रीन: 125
  • डेलीमोशन: 100 दशलक्ष
  • हुलू: 75 दशलक्ष
  • शोध आकडेवारीत जागतिक शोध इंजिन मध्ये गुगल च वाटा 96% आहे. उर्वरित भाग बिंग, ask त विभागलेला आहे.
  • मोबाइल शोध इंजिन मध्ये com पुन्हा जगभरात 93.2%% वापरासह वर्चस्व.
  • 2020 मधील पहिल्या दहा सर्वात लोकप्रिय शोध शब्द सर्च टर्म्स 2019 च्या तुलनेत बर्यापैकी वेगळ्या
  • हवामान – 24.4 दशलक्ष
  • नकाशे – 20.4 दशलक्ष
  • अनुवाद – 18.3 दशलक्ष
  • कॅल्क्युलेटर – 16.2 दशलक्ष
  • YouTube to mp3 – 13.7 दशलक्ष
  • नेट स्पीड वेग चाचणी – 12.6 दशलक्ष बातम्या – 8.25 दशलक्ष
  • थिसॉरस – 6.7 दशलक्ष
  • पॉवरबॉल – 5.7 दशलक्ष
  • डोनाल्ड ट्रम्प – 5.6 दशलक्ष
See also  पर्सनल क्लाउड स्टोरेज म्हणजे काय ? Personal Cloud Storage Marathi information

एवढे असले तर आपण घरबसल्या कामही करु शकतो,आपला उदरनिर्वाहही आज ह्या इंटरनेटच्या जगात अगदी आरामशीर करु शकतो अणि आज इंटरनेटद्वारे खुप लोक लाखो रूपये आज ब्लाँग वेबसाईट युटयुब ह्या माध्यमांतुन कमविताना आपणास दिसुन येता आहे.म्हणजे आज इंटरनेटमुळे ज्या लोकांना आत्तापर्यत काही जाँब नव्हता स्वताचा व्यवसाय कामधंदा नव्हता त्यांना एक रोजगार प्राप्त झाला आहे आज बहुतेक खेडया पाडयातील मुले मुली सुदधा ब्लाँगिंग युटयुब सारख्या माध्यमांतुन अर्थार्जन करत आहेत.म्हणजे आज इंटरनेटमुळे रोजगार प्राप्त होताना आपणास दिसुन येतो आहे.इतके इंटरनेटमुळे आज जग पुढे येताना आपणास दिसुन येते आहे.

आज इंटरनेटमुळे आपल्याला कोणतीही कला शिकण्यासाठी क्लास वगैरे लावण्याची गरज पडत नाही.युटुब तसेच गुगल वर सर्च केल्यावर आपल्याला पाहिजे त्याविषया विषयी मार्गदर्शन करणारे त्याबददल आपल्याला माहीती देणारे अनेक लोक आपल्याला ब्लाँग तसेच युटयुब ह्या माध्यमांद्वारे दिसुन जातात आपण त्यांचे ब्लाँग  किंवा व्हिडिओ पाहिले तर आपल्याला त्याविषयाचे ज्ञान प्राप्त होत असते.

आपल्याला कुठल्याही विषयावर मराठी माहिती हवी असेल,,ऑनलाइन।योगा शिकायचं असेल, वेब डिजाईन।असेल, मेडिटेशन शिकायचं असेल किंवा।मराठीत टायपिंग कसे करावं हा प्रश्न पडला असणार, ही।सर्व महिती अगदी एका क्लिक वर उपलब्ध आहे.

तेही कोणत्याही प्रकारचा क्लास तसेच अँकँडमी जाँईन न करता एवढे भव्य अणि दिव्य प्रकारचे असे हे इंटरनेटचे जग आहे ज्याचे जाळे  खुपच मोठे आहे.अणि त्याविषयी सांगाव बोलाव तेवढे कमी आहे.

एवढेच काय तर आज इंटनेटवर आज विविध रोजगारांविषयी,सरकारी योजनांविषयी माहीती प्राप्त असते.तसेच इंटरनेटवर कुठे काय घडले याच्या कृषीविषयक तंत्रज्ञान किंवा कृषी योजना ,आर्थिक सामाजिक,ताज्या घडामोडी,शेअर मार्केट संबंधित अपडेट्स,नवीन तंत्र्ज्ञान , बिट्कोईन बाबत  आपण इंटरनेटवर आँनलाईन माध्यमाने पाहु शकतो.

आपल्याला इंटरनेटच्या वापरामुळे आपल्याला जीवनात अमुलाग बदल झाला आहे हे आपण थोडक्यात समजण्याचा प्रयत्न केला आहे.इंटरनेट अणि मानवी जीवन यांचा केवढा मोठा घनिष्ठ संबंध आहे इंटरनेटचा मानवी जीवणावर केवढा मोठा प्रभाव पडलेला आहे अणि इंटरनेटमुळे मानवी जीवन किती आनंदमय सुखदायी अणि सुकर झाले आहे तसेच नवीन येणाऱ्या आर्टिफिशियल टेक्नॉलॉजि आणि IOT इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल आपण पुढील।लेखात जाणून घेऊ.

See also  Instagram Facebook ची ब्लू टिक्स मिळतेय विकत किंमत जाणून घ्या


Affiliate marketing Books at Amzon


BUY AT AMAZON

Apple MacBook Air (13-inch, 8GB RAM, 128GB Storage, 1.8GHz Intel Core i5) – Silver

LG 22 inch (55cm) IPS Monitor – Full HD, IPS Panel with VGA, HDMI, DVI, Audio Out Ports – 22MP68VQ

With Up to 80% off on fashion, beauty and home furnishings, 10% instant bank discount on SBI cards and 1000+ deals every day from top fashion brands,

1 thought on “इंटरनेट अणि मानवी जीवन – इंटरनेट म्हणजे काय ?”

Comments are closed.