प्रेस सेंशरशीप कशाला म्हणतात? Press Censorship in Marathi

प्रेस सेंशरशीप कशाला म्हणतात?press censorship in Marathi

प्रेसच्या न्युज छापण्याच्या स्वातंत्र्यावर जेव्हा गदा आणली जाते तसेच प्रेसच्या न्युजच्या छपाई करण्याच्या स्वातंत्र्यावर प्रतिबंध केला जातो तेव्हा त्यास प्रेस सेंशरशीप असे म्हटले जात असते.

प्रेस सेंशरशीप मध्ये कुठलीही न्युज तसेच बातमीची छपाई करण्याअगोदर ती बातमी न्युज छापण्याच्या आधी प्रेसला न्युज चॅनलला सरकारची परवानगी घेणे आवश्यक असते.

यानंतर शासन हे ठरवत असते की ती न्युज प्रेसने तसेच न्युज चॅनलने छापावी किंवा नाही.जर शासनाने ती न्युज छापण्यास मनाई केली तर कुठल्याही न्युज चॅनलला प्रेसला ती न्युज बातमी छापता येत नसते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर जेव्हा एखाद्या राजनैतिक दलाकडुन पक्षाकडुन एखादी विशिष्ट सुचना,माहीती बातमी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेसला न्युज चॅनलला मनाई केली जाते ती बातमी छापण्यास प्रेसवर न्युज चॅनलवर प्रतिबंध आणला जातो.तेव्हा त्यास प्रेस सेंशरशीप असे म्हटले जाते.

भारतात ब्रिटीश राजवटीच्या काळात प्रेस सेंशरशीप लादणे लाॅर्ड लिटनने सुरू केले होते.पण लाॅर्ड रिपनने नंतर ही लिटनने लागु केलेली प्रेस सेंशरशीप पुर्णपणे काढुन टाकली होती.

आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रीय आपात्कालीन दरम्यान 1975 पासुन 1977 पर्यंत प्रेस सेंशरशीप सर्वप्रथम लावण्यात आली होती.

भारताच्या तेव्हाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 26 जुन 1975 रोजी देशात आपात्कालीनची घोषणा केली होती.

भारताच्या राज्यघटनेतील कलम 19(१A) मध्ये विचार अणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या मुलभुत अधिकाराची तरतुद करण्यात आली आहे.

हा मुलभूत अधिकार प्रत्येकाला देण्यात आला आहे ज्यामुळे कुठलाही विचार स्वतंत्रपणे जगासमोर मांडु शकतो अभिव्यक्त करू शकतो.

हा विचार अणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वृत्तपत्र प्रसारमाध्यमे तसेच प्रेस न्युज चॅनल यांना देखील देण्यात आला आहे.म्हणुन वृत्तपत्र प्रसारमाध्यमे यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देखील ओळखले जाते.

See also  जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके - आर्थिक सक्षमता - Top 10 Best Personal Finance Book

प्रेस सेंशरशीपचे फायदे कोणकोणते आहेत?

प्रेस सेंशरशीप मध्ये कुठलीही न्युज तसेच बातमीची छपाई करण्याअगोदर ती बातमी न्युज छापण्याच्या आधी प्रेसला न्युज चॅनलला सरकारची परवानगी घ्यावी लागत असते.

यानंतर शासन हे ठरवत असते की ती न्युज प्रेसने तसेच न्युज चॅनलने छापावी किंवा नाही.जर शासनाने ती न्युज छापण्यास मनाई केली तर कुठल्याही न्युज चॅनलला प्रेसला ती न्युज बातमी छापता येत नसते.

याने फायदा असा होतो की जागोजागी सोशल मिडिया तसेच इंटरनेटच्या माध्यमातून शासनाशी संबंधित विषयांवर जसे की शासनाने सुरू केलेल्या सरकारी योजना,शासनाने सुरू केलेले नवीन उपक्रम,राजकीय वादविवाद

याविषयी ज्या फेक न्युज चुकीच्या अफवा समाजात पसरवल्या जात असतात त्यांना कायमचा आळा बसतो.याने सामाजिक समतोल टिकुन राहण्यास मदत होते.

वृत्तपत्र प्रसारमाध्यमे न्युज चॅनल प्रेस यांची काय तक्रार आहे?

काही राजनैतिक दलाकडुन आपल्या राजकीय हेतु साध्य करण्यासाठी वृत्तपत्र प्रसारमाध्यमे यांच्या विचार अणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रतिबंध लादला जातो आहे गदा आणली जात आहे असा आरोप देखील सध्या अनेक वृत्तपत्र प्रसारमाध्यमे आपापल्या न्युज चॅनल वरून करताना दिसुन येत आहे.

अनेक वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे न्युज चॅनलचे असे मत आहे की फेक न्युजला आळा घालण्याच्या नावाखाली शासन प्रेस तसेच न्युज चॅनलवर सेंसरशीप लादण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रेस न्युज चॅनलच्या लेखन विचार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याने गदा येईल असे वक्तव्य मिडिया कडुन केले जात आहे.

कोणती न्युज फेक आहे कोणती न्युज रिअल आहे हे आता सरकार तसेच राजनैतिक पक्ष आपल्या पदधतीने ठरवणार का असा सवाल देखील मिडिया कडुन केला जातो आहे.