चालु घडामोडी मराठी – 17 मे 2022 Current affairs in Marathi

17 मे 2022 चालु आणि ताज्या घडामोडी  Current affair in Marathi

 1) माणिक साहा बनले त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री

 • त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच राज्यसभा खासदार माणिक साहा यांनी रविवारच्या दिवशी सकाळी त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
 • डाँ माणिक साहा हे त्रिपुरा राज्याचे अकरावे मुख्यमंत्री बनले आहेत.
 • माणिक साहा हे व्यवसायाने एक दंतवैद्यक आहेत.

2) भारत देशाकडुन युएई अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद यांना श्रदधांजली म्हणुन एक दिवसाचा दुखवटा

भारत देशाकडुन युएई अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद यांना श्रदधांजली म्हणुन एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.

 • भारत देशाकडुन युएई अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद यांना श्रदधांजली अपर्ण करण्यासाठी एक दिवसाचा राष्टीय दुखवटा ठेवण्यात आला आहे.

 

3) भारत देश ठरला थाँमस कप स्पर्धेचा विजेता

भारत देशाने पहिल्यांदाच थाँमस कप स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.

 • भारत हा देश तब्बल 73 वर्षांनंतर थाँमस कप ह्या स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
 • भारत देशाने या स्पर्धेत चौदा वेळा चँम्पियन इंडोनेशियाला पराभुत करून हे विजेतेपद प्राप्त केले आहे.
 • भारत देशासाठी लक्ष्य सेन,सात्विक साईराज,आणि चिराग शेटटी,किदंबी श्रीकांत या जोडीने सामना जिंकुन देऊन भारताला विजयी केले आहे.
 • थाँमस कप जिंकणारा भारत देश आता सहावा देश बनलेला आहे.
 • याआधी निव्वळ पाचच देशांना थाँमस कप ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात यश प्राप्त झाले आहे.

 

4) 2022 च्या थाँमस कप आणि उबेर कप ह्या स्पर्धा थायलंडमध्ये केल्या गेल्या आयोजित

2022 च्या थाँमस कप आणि उबेर कप ह्या स्पर्धा थायलंड ह्या देशामध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या.

 • थाँमस कप आणि उबेर कप या दोघी दविवार्षिक आंतरराष्टीय बँडमिंटन स्पर्धा आहेत.
 • ज्यात थाँमस कप ही पुरुष बँटमिंटन स्पर्धा आहे आणि उबेर कप ही महिला बँटमिंटन स्पर्धा आहे.
 • थाँमस कपची ह्या वर्षीची 32 वी आवृती आहे.आणि उबेर कपची एकोणतिसावी.
 • ह्या स्पर्धेचा कालावधी हा 8 मे ते 15 मे असा होता.

 

 • यावर्षी थाँमस कप भारत देशाने पहिल्या वेळेस जिंकला आहे आणि दक्षिण कोरियाने उबेर कप हा सलग दुसरयांदा जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

5) केंद्रिय दुरसंचार विभागाकडुन केंद्रिय गतीशक्ती संचार पोर्टलचा आरंभ

नुकताच केंद्रिय दुरसंचार विभागाकडुन केंद्रिय गतीशक्ती संचार पोर्टलचा आरंभ करण्यात आला आहे.

 • गतीशक्ती संचार पोर्टल हे केंद्रिय दुरसंचार विभागाकडुन सुरू केले गेले आहे.
 • गतीशक्ती संचार पोर्टलचे उदघाटन हे अश्विनी वैश्णव(दुर संचार मंत्री) यांच्याहस्ते करण्यात आले आहे.
 • हे पोर्टल सुरू करण्यामागचा हेतु हा नागरीकांना डिजीटली सक्षम करण्याकरीता प्रत्येक नागरीकाला ब्राँडबँड पायाभुत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
 • हे गतीशक्ती दुरसंचार पोर्टल राष्टीय ब्राँडबँड मिशन अंतर्गत सुरू केले गेले आहे.राष्टीय ब्राँडबँड मिशन हे 17 डिसेंबर 2019 मध्ये स्थापण केले गेले होते.ज्याचे उददिष्ट हे संपुर्ण जगभरात तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागात सार्वत्रिक आणि न्याय स्वरूपात ब्राँडबँड सेवा पुरवणे हे आहे.

 

6) पहिली आंतरराष्टीय क्रुझ मिटिंग मुंबई येथे आयोजित

पहिल्या आंतरराष्टीय क्रुझ काँन्फरन्सचे आयोजन मुंबई ह्या शहरात केले गेले आहे.

 • पहिल्या अतुल्य भारत क्रुझ परिषदेचे आयोजन हे बंदरे,जहाजबांधणी,जलमार्ग मंत्रालयाकडुन आणि भारत सरकार,एफ आय सीसीआय कडुन करण्यात आले आहे.
 • ह्या क्रुझ परिषदेचे उददिष्ट भारतामधील क्रुझ पर्यटनास चालना प्राप्त व्हावी जलमार्गाचा जास्तीत जास्त वापर केला जावा याचबरोबर लाखो व्यक्तींना रोजगार प्राप्त व्हावा हे आहे.
 • ह्या परिषदेला आयोजित करण्याचे कार्य केंद्रिय बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलेले आहे.

 

7) आँस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटपटटु अँड्रयु सायमंडसचे अपघाती निधन

आँस्ट्रेलिया ह्या संघाचा धडाकेबाज अष्टपैलु क्रिकेटपटटु अँड्रयु सायमंडसचे नुकतेच एका अपघातामध्ये निधन झाले आहे.

 • अँड्यु सायमंड हा आँस्ट्रेलिया संघाचा माजी अष्टपैलु क्रिकेटपटटु तसेच दोन वेळच्या विश्वचषक विजेता संघाचा सदस्य होता.ज्याचे शनिवारी रात्री रस्ता अपघातामध्ये निधन झाले आहे.

8) रिझर्व बँकेने केली नवीन कार्यकारी संचालक म्हणुन सितीकांथा पटटनाईक,राजीव रंजन यांची नियुक्ती

रिझर्व बँकेने नुकतीच नवीन कार्यकारी संचालक म्हणुन सितीकांथा पटटनाईक आणि राजीव रंजन या दोघांची नियुक्ती केली आहे.

 

9) 12 व्या महिल्या जागतिक बाँक्सिंग चँम्पियनशिपचे इस्तंबुल तुर्की येथे आयोजन

12 व्या महिल्या जागतिक बाँक्सिंग चँम्पियनशिपचे इस्तंबुल तुर्की येथे आयोजन करण्यात आले आहे.

10) सुहल जर्मनी येथे आय एस एस एफ कनिष्ठ विश्वचषकाचे आयोजन

सुहल जर्मनी येथे 2022 मधील आय एस एस एफ कनिष्ठ विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

11) फ्रँक विल्झेक यांना देण्यात आला 2022 चा टेम्पलटन पुरस्कार

फ्रँक विल्झेक यांना 2022 मधील टेम्पलटन हा पुरस्कार  देण्यात आला आहे.

 

12) दक्षिण कोरिया बनला नाटोच्या सायबर डिफेन्स गटात भाग घेणारा पहिला आशियाई देश

दक्षिण कोरिया हा देश नाटोच्या सायबर डिफेन्स गटात भाग घेणारा पहिला आशियाई देश बनलेला आहे.

 • नाटो अधिकृत सदस्यांमध्ये एकुण 32 देश समाविष्ट आहेत.ज्यात 27 देश नाटोचे सदस्य राष्ट आहेत तर बाकीचे पाच देश हे गैर नाटो सहभागी आहेत.

13) भारताच्या बीव्ही जोशी यांना राँयल गोल्ड मेडलने करण्यात आले सन्मानित

भारताच्या बीव्ही जोशी यांना राँयल गोल्ड मेडलने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

 • बिव्ही (बाळकृष्ण) जोशी हे भारतीय वास्तुविशारद आहेत.
 • राँयल गोल्ड मेडल हे वास्तुशास्त्रातील एक सर्वोच्च मेडल आहे.
 • प्रित्झर्कर आर्किटेक्चर बक्षीस आणि राँयल गोल्ड प्राप्त करणारे बिव्ही जोशी हे भारताचे एकमेव वास्तविशारद आहेत.
 • याआधी पदमश्री आणि पदमभुषण ह्या दोन पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

14) देवसहायम पिलई यांना बहाल करण्यात आले संतपद

देवसहायम पिलई यांना नुकतेच ख्रिश्चन धर्मामधील संतपद बहाल करण्यात आले आहे.

 • रविवारच्या दिवशी झालेल्या एका भव्य धार्मिक सोहळयामध्ये धर्मगुरू पोप यांच्या हस्ते हे संतपद देवसहायम पिल यांना देण्यात आले.
 • देवसहायम यांनी अठरावे शतकात ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता.
 • देवसहायम हे संतपद प्राप्त केलेले प्रथम भारतीय व्यक्ती ठरले आहेत.

Leave a Comment