1million is equal to? के,मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन म्हणजे किती? – What is million billion trillion

के,मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन ची माहिती – 1million is equal to – What is million billion trillion

आपण युटयुबवर नेहमी एखाद्या चँनलचे 100 के,1 मिलियन किंवा 10 मिलियन सब्स्क्राईबर पुर्ण झाले असे ऐकत तसेच बघत असतो.

किंवा जेव्हा आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्यक्ती कोणकोण आहेत?ते किती पैसे कमवतात त्यांचे नेटवर्थ किती आहे हे जाणुन घेण्यासाठी नेटवर सर्च करत असतो.

तेव्हा आपल्याला तिथे देखील 100 मिलियन डाँलर 1 बिलियन डाँलर तसेच 1 ट्रिलीयन डाँलर असेच वाचायला मिळते.

अशा वेळी आपल्याला एकच प्रश्न सतावत असतो तो म्हणजे हे के,मिलियन,बिलियन आणि ट्रीलियन म्हणजे काय असते?

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे हे जे 100 के,100 मिलियन,1 बिलियन 3 ट्रीलीयन डाँलर हे आपल्याला वाचायला मिळत असते.ही रक्कम Indian rupees मध्ये एकुण किती होत असते?

उदा.1)

100 k म्हणजे किती? -100 k is equal to

10 मिलियन डाँलर याचे Indian rupees मध्ये Conversion केल्यावर किती होतात?

2) 1 बिलियन डाँलर याचे Indian rupees मध्ये Conversion केल्यावर किती होतात?

3) 1 ट्रिलियन डाँलर याचे Indian rupees मध्ये Conversion केल्यावर किती होतात?

हेच आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.आणि अशा वेळी या terms चा अर्थ जाणुन घ्यायला आपण नेटवर देखील सर्च करतो पण तिथे देखील काही समाधान कारक उत्तर आपणास प्राप्त होत नसते.

See also  राष्ट्रीय नागरी सेवा दिवस शुभेच्छा - National Civil service day Quotes , Wishes messages

पण चिंता करू नका आजच्या लेखात आपण के म्हणजे काय?मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन डाँलर म्हणजे काय?आणि यांचा Indian rupees मध्ये काय अर्थ होतो? इत्यादी सर्व काही सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

के म्हणजे किती होतात? 1 k is equal to

जसे की आपल्याला सगळयांनाच माहीत आहे की एक हजार ह्या रक्कमेवर आपण तीन शुन्य लावत असतो.आणि ह्या एक हजारलाच 1 के असे देखील म्हणतात.

आणि जेव्हा आपण दहा के असे एखाद्या ठिकाणी वाचत असतो तेव्हा त्याचा अर्थ 10 हजार असा होत असतो.

जेव्हा आपण 50 के असे वाचत असतो तेव्हा त्याचा अर्थ 50 हजार असा होत असतो.आणि 100 के असे वाचत असतो तेव्हा त्याचा अर्थ एक लाख असा होत असतो.

उदा:

● 1के=1 हजार –    10 के =10 हजार
● 2 के =2 हजार –  20 के = 20 हजार
● 3 के =3 हजार –   30 के =30 हजार
● 4 के =4 हजार-    40 के = 40 हजार
● 5 के = 5 हजार –  50 के = 50 हजार
● 60 के =60हजार- 200 के =2 लाख
● 70 के =70 हजार- 300 के =3 लाख
● 80 के =80 हजार – 400 के =4 लाख
● 90 के =90 हजार – 500 के = 5 लाख
● 100 के = 1 लाख – 200 के = 2 लाख

 

मिलियन म्हणजे किती होतात? – 1million is equal to Marathi information

जसे की आपण वर बघितले की एक हजारवर तीन शुन्य लागत असतात.पण त्याच तीन शुन्यांवर आपण अजुन तीन शुन्य लावल्यावर म्हणजेच सहा शुन्य लावल्यावर तीच संख्या मिलियन बनत असते.

आणि 1 मिलियनचा अर्थ 10 लाख असा बनत असतो.आणि 10 मिलियनचा अर्थ एक करोड असा होत असतो.

उदा:

See also  भारताचा राष्टीय ध्वज विषयी माहीती - रंग ,इतिहास व आचारसंहिता- India national flag information in Marathi

1मिलियन =10 लाख(1000 के) 10 मिलियन =एक करोड
2 मिलियन =20 लाख। 20 मिलियन =2 करोड
3 मिलियन =30 लाख। 30 मिलियन = 3 करोड

4 मिलियन =40 लाख। 40 मिलियन = 4 करोड
5 मिलियन = 50 लाख। 50 मिलियन 5 करोड
100 मिलियन = 10 करोड
500 मिलियन = 50 करोड

Million dollar चे Indian rupees मध्ये conversion ची काही उदाहरणे :

● 1 मिलियन USD -Indian rupees= 7,49,29,300,00

● 5 मिलियन USD -Indian rupees= 37,46,46,500,00

● 10 मिलियन USD -Indian rupees =74,92,93,000.00

● 15 मिलियन USD -Indian rupees =1,12,39,39,500.00

 

बिलियन म्हणजे किती होतात? – 1 Billion is equal to Marathi information

वर आपण जसे जाणुन घेतले की हजार वर तीन शुन्य लागत असतात.आणि त्यात अजुन तीन शुन्य अँड केल्यावर म्हणजेच एकुण सहा शुन्य झाल्यावर ती संख्या मिलियन बनत असते.

पण त्याच सहा शुन्यात अजुन तीन शुन्य जेव्हा आपण अँड करतो म्हणजेच एकुण नऊ शुन्य झाल्यावर ती संख्या बिलियन बनत असते.एक बिलियन म्हणजेच शंभर करोड होत असतात.

उदा:

1 बिलियन = 1 बिलियन म्हणजेच 1000 मिलियन(100 करोड)
2 बिलियन = 2000 मिलियन (200 करोड)
3 बिलियन = 3000 मिलियन (300 करोड)
10 बिलियन = 1000 करोड
1 बिलियन USD dollar

Indian rupees=74,92,93,00,000.0

ट्रीलीयन म्हणजे किती होतात? – 1 Trillion is equal to Marathi information

एकावर नऊ शुन्य म्हणजेच बिलियन होतात हे आपण वर पाहिलेच आहे.

पण त्याच नऊ शुन्यात अजुन तीन शुन्य अँड केल्यावर म्हणजेच एकावर एकुण बारा शुन्य अँड केल्यावर तीच संख्या ट्रिलीयन बनत असते.

उदा:

1 ट्रिलियन = 1000 बिलियन (एक लाख करोड)
2 ट्रिलियन =2000 बिलियन
3 ट्रिलियन =3000 बिलियन
5 ट्रिलियन = 5000 बिलियन
1 ट्रिलियन USD dollar
Indian rupees=7,49,29,30,00,00,000.00

वरील दिलेल्या प्रत्येक ठिकाणी आपण तीन शुन्य वाढवले आहेत.पण आंतरराष्टीय काऊंटिंग आणि इंडियन काऊंटिंग मध्ये थोडा फरक आहे तो म्हणजे असा की इंटरनँशनल काऊंटिंगमध्ये कोणत्याही संख्येत डाव्या बाजुने प्रत्येक तीन अंकांनंतर काँमा अँड केला जातो.

See also  उदगम पोर्टल काय आहे? - udgam portal information in Marathi

पण इंडियन काऊंटिंगमध्ये हजार,लाख,करोड,अरब इत्यादीत डाव्या बाजुने पहिल्या तीन अंकांनंतर काँमा अँड केला जात असतो.

नंतर प्रत्येक दोन अंकांनंतर काँमा अँड केला जातो याने आपल्याला काऊंटिंग करणे अधिक सोपे जात असते.

जगातील 15 सर्वोत्तम ब्लोगर्स – किती आहे कमाई ? – Top Adsense Earners in world Marathi information

1 thought on “1million is equal to? के,मिलियन,बिलियन आणि ट्रिलीयन म्हणजे किती? – What is million billion trillion”

Comments are closed.