आय एम डी म्हणजे काय?- IMD meaning in Marathi

आय एम डी म्हणजे काय?IMD meaning in Marathi

मित्रांनो सध्या पावसाचा हंगाम असल्याने आपणास सगळीकडे मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाऊसामुळे पुरस्थिती आल्याचे टिव्ही मधील न्युजमध्ये वाचायला मिळत असते.

पण जेव्हा आपण टिव्हीवर न्युज ऐकत असतो तेव्हा त्याच्या खाली खालच्या बाजुस IMD alert असे लिहिलेले दिसते.

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की हे आय एमडी अँलर्ट म्हणजे काय असते?याचा काय अर्थ होतो?न्युज मध्ये हा शब्द घडीघडी का दिला जातो?

काळजी करू नका मित्रांनो कारण आजच्या लेखात आपण आय एम डी म्हणजे काय?आय एमडीचे महत्व काय असते?आय एमडी अँलर्टचा काय अर्थ होत असतो हे आपण सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आय एम डीचा फुलफाँर्म काय होतो?IMD full form in Marathi

आय एम डीचा फुलफाँर्म Indian meteorological department असा होत असतो.ज्याला मराठीत मराठीत भारतीय हवामान विभाग असे म्हणण्यात येते.

आय एम डीचा अर्थ काय होतो?IMD meaning in Marathi

आय एम डीचा अर्थ इंडियन मेट्रोलाँजीकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान विभाग असा होतो.

आय एम डी ही भारत देशामधील हवामान सेवा देणारी म्हणजेच प्रत्येक विभागातील हवामानाविषयी अंदाज घेऊन आपणास त्याविषयी माहीती देणारी प्रमुख सरकारी संस्था आहे.

उदा,कुठे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे,कुठे मुसळधार पाऊस पडु शकतो?कोणत्या विभागात पावसाचा पुरस्थितीचा धोका संभवतो याविषयी हे आय एमडी डिपार्टमेंट आपणास कळवत असते.

See also  SBI ने माझ्या खात्यातून 206.5 रुपये का कापले? Why SBI deducted RS 206.5 from my account in Marathi

आय एमडीची स्थापणा कधी करण्यात आली होती?

आय एम डी म्हणजेच इंडियन मेट्राँलाँजीकल डिपार्टमेंट,भारतीय हवामान विभाग.भारतीय हवामान विभागाची स्थापणा 1875 मध्ये करण्यात आली होती.

भारतीय हवामान विभाग कुठे स्थित आहे?

सध्या भारतीय हवामान विभाग दिल्ली येथे स्थित आहे.

1889 मध्ये मे महिन्यात सर जॉन एलियट यांची कोलकत्ता येथील मुख्यालयात वेधशाळेचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय यानंतर शिमला येथे स्थलांतरीत करण्यात आले त्यानंतर पुन्हा पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आणि शेवटी नवी दिल्ली येथे आता हवामान विभागाचे मुख्य कार्यालय सध्या कार्यरत आहे.

आय एम डी अँलर्ट म्हणजे काय?imd alert meaning in Marathi

आय एमडी अँलर्ट हा शब्द आपण नेहमी न्युजमध्ये वाचत ऐकत असतो.

आय एमडी म्हणजे भारताचे हवामान विभाग अणि अँलर्ट म्हणजेच दोघांचा मिळुन भारतीय हवामान विभागाकडुन दिलेला सतर्कतेचा इशारा असा अर्थ होतो.