राजर्षी शाहू महाराज कोण होते?शाहु महाराज यांनी कोणते सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले? Rajarshi Shahu Chatrapati Maharaj

राजर्षी शाहू महाराज कोण होते?शाहु महाराज यांनी कोणते सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले?

६ मे १९२२ रोजी आजच्याच दिवशी शाहु महाराज यांचे निधन झाले होते.म्हणुन आजचा दिवस शाहु महाराज स्मृती दिन म्हणून देखील ओळखला जातो.

शाहु महाराज यांचे पुर्ण नाव छत्रपती शाहू महाराज भोसले असे होते.त्यांचे मुळ नाव यशवंतराव जयसिंगराव आप्पासाहेब घाटगे असे आहे.

शाहु महाराज यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आबासाहेब घाटगे असे होते.अणि आईचे नाव राधाबाई असे होते.

शाहु महाराज यांचा जन्म २६ जुन रोजी इसवी सन १८७४ रोजी झाला होता.हाच दिवस शाहु महाराज यांच्या कार्याचा गौरव सन्मान करण्यासाठी सामाजिक न्याय दिवस म्हणून देखील दरवर्षी साजरा केला जातो.हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचे २००६ पासुन घोषित करण्यात आले होते.

शाहु महाराज यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी झाला होता.शाहु महाराज यांच्या पत्नीचे नाव महाराणी लक्ष्मीबाई भोसले असे होते.शाहु महाराज यांना राजर्षी ही पदवी राज्यभिषेकाच्या वेळी त्यांच्या क्षात्र गुरूने दिली होती.

शाहु महाराज अवघ्या तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई हयांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतराव शाहु महाराज यांना दत्तक घेतले होते.अणि यशवंतराव कोल्हापूर संस्थानाचे राजे बनले.

दत्तक घेतलेल्या यशवंतराव यांचे नाव नाव शाहु असे ठेवले होते.

सन १८८९ ते १८९३ मध्ये ह्या चार वर्षांच्या कालखंडामध्ये धारवाड येथे शाहु महाराज यांचा शारीरिक अणि शैक्षणिक विकास घडुन आला होता.२ एप्रिल १८९४ रोजी शाहु महाराज यांचा राज्यारोहण समारंभ घडुन आला होता.

शाहु महाराज यांनी कोणते सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले?

१८९४ मध्ये राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन शाहु महाराज यांनी अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी शैक्षणिक सामाजिक कार्ये केली.

See also  Marathi to English sentence

शाहु महाराज यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणुन घेत आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत अणि सक्तीचे केले होते.

याचसोबत सरकारी नोकरी मध्ये मागासवर्गीयांसाठी ५० टक्के जागा राखुन ठेवण्यात येतील असा निर्णय घेतला म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून देखील ओळखले जाते.

एवढेच नव्हे तर अस्पृश्य जातीतील बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशातुन उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आर्थिक मदत देखील शाहु महाराज यांनी केली.

शाहु महाराज यांनी वाघ्या मुरळी प्रतिबंधक कायदा सुरू केला.अस्पृशयता अणि जातीभेद निर्मूलन करण्यासाठी आपल्या संस्थांना मध्ये शाहु महाराज यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा देखील मान्य केला.

कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ देखील शाहु महाराज यांनीच सुरू केली.राधानगरी धरण उभारले.सर्व जातीपातीच्या मुलांसाठी शाहु महाराज यांनी राजाराम वसतिगृह सुरू केले होते.

चित्रकार आबालात रहिमान सारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन देण्याचे काम देखील केले.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शाहु महाराज यांनी शिक्षण, कला,आरोग्य,क्रीडा,समाजसुधारणा व्यवसाय इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी पार पाडत आपले योगदान दिले होते.

राजर्षी शाहू महाराज यांनी २८ वर्षात केलेल्या लोकहितवादी कामगिरीसाठी त्यांना कानपुर येथील कुर्मी समाजाकडून राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली होती.

राजर्षी शाहू महाराज यांना एक प्रजाहितदक्ष अणि लोककल्याणकारी राजा म्हणून संबोधले जाते.