आधार कार्ड – केंद सरकार च्या नवीन सुचना Aadhar card new advisory and rules in Marathi

आधार कार्ड विषयी नवीन सुचना तसेच नियम aadhar card new advisory and rules in MarathiI

आधार कार्ड आज हे आपले सर्वाचेच खुप महत्वाचे डाँक्युमेंट आहे.

कुठल्याही ठिकाणी आज आपण भारताचेच नागरीक आहोत का ही आपली ओळख पटवून घेण्यासाठी आपले आधार कार्ड ओळखपत्र म्हणुन सगळयात आधी विचारले जाते.

 

मग ते कुठे जाँबसाठी अँप्लाय करणे असो,बँकेत खाते उघडायचे असो,हाँटेलमध्ये एखादा रूम बुक करायचा असो सगळीकडे पहिले आपले आधार कार्ड विचारतात.पण आपल्या आधार कार्डचा गैरवापर केला जातो आहे किंवा केला जाऊ शकतो हे सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत नवीन नियम तसेच सुचना जाहीर केली आहे.

आता आपल्या आधार कार्डचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर करण्यात येऊ नये याकरीता केंद्र सरकारने आधार कार्ड विषयी नुकतीच एक नवीन सुचना आपणा सर्वासाठी जाहीर केली आहे.

आणि ह्या सुचनेचे प्रमुख उददिष्ट आपल्या आधार कार्डचा कोणाकडुनही कुठल्याही प्रकारचा गैरवापर केला जाऊ नये हा आहे.

आज रविवारी प्रकाशित करण्यात आलेल्या एका प्रसिदधी पत्रकात भारत सरकारने असे स्पष्टपणे आपणास सांगितले आहे की

  • आपण आपल्या आधार कार्डची झेराँक्स कोणालाही बिनधास्त शेअर देऊ नये.
  • कारण असे केल्याने समोरची व्यक्ती आपल्या आधार कार्डचा गैरवापर देखील करू शकते.
  • आणि सोबतच पर्याय सुचविताना सरकारने एक सल्ला देखील आपणास दिला आहे ज्यात फक्त मास्क आधार कार्ड आपण इतरांसोबत शेअर करावे.
  • कारण त्यात फक्त शेवटचे चार अंक दिलेले असतात.हे मास्क आधार कार्ड आपण यूआयडीए आयच्या आँफिशिअल साईटवर जाऊन देखील त्वरीत डाऊनलोड करू शकतो.
  • केंद्रीय इलेक्ट्रानिक तसेच माहीती तंत्रज्ञान मंत्रालयाकडुन (Union Ministry of Electronics and Information Technology) जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये असे देखील दिले आहे की अशा खाजगी संस्था ज्यांच्याकडे कुठलेही लायसन नाहीये.
See also  तिहार जेल विषयी जाणुन घ्यायची रोचक तथ्ये-Amazing facts about Tihar jail in Marathi-

उदा, हाँटेल तसेच मुव्ही थिएटर ह्या खासगी संस्थांना आधार कार्डच्या झेराँक्सची प्रत घेण्याची तसेच ती जमा करण्याची कुठल्याही प्रकारची अनुमती नाहीये.असे केल्यास त्या संस्थेने आधार कार्ड नियमावली कायदा 2016 चा भंग केला असे मानण्यात येईल.

ज्या संस्थेने युआय डी ए आय कडुन लायसन प्राप्त केले आहे.अशाच संस्था कुठल्याही व्यक्तीची ओळख पटवुन घेण्यासाठी त्याच्या आधार कार्डचा वापर करू शकतील.असे स्पष्टपणे सरकारकडुन सांगितले गेले आहे.

याचसोबत सर्व आधार कार्ड वापरकर्ता नागरीकांना सावध करताना सरकारने असे देखील म्हटले आहे की

आपण आपले आधार कार्ड कोणत्याही संस्थेसोबत शेअर करण्याच्या अगोदर त्या संस्थेकडे UIDAI कडुन देण्यात आलेले Valid user license म्हणजेच वैध असा वापरकर्ता परवाना आहे का याची एकदा खात्री करून घ्यावी.

मगच आपण आपले आधार कार्ड तिथे शेअर करावे अन्यथा नाही.

याचसोबत सरकारकडुन हे देखील सांगण्यात आले आहे की जर

आपल्याला आपले आधार कार्ड आँनलाईन डाउनलोड करायचे असेल तर अशा वेळी आपण आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सायबर कँफे मध्ये ठेवलेल्या सर्व जण ज्याचा वापर करतात अशा कुठल्याही सार्वजनिक कंप्युटरचा देखील वापर करू नये.

आणि समजा एखाद्या वेळी आपण खुप महत्वाचे असल्यास आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी एखाद्या सायबर कँफेमध्ये ठेवलेल्या सार्वजनिक कंप्यूटरचा वापर केलाच तर त्या कंप्युटर मधुन आपण ई-आधारच्या सर्व प्रती कायमस्वरुपी डिलीट केल्या आहेत की नाही याची एकदा नक्की खात्री करून घ्यावी

2 thoughts on “आधार कार्ड – केंद सरकार च्या नवीन सुचना Aadhar card new advisory and rules in Marathi”

Comments are closed.