आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवस का साजरा केला जातो ह्या दिनाचे महत्त्व काय आहे?
दरवर्षी ४ मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवस साजरा केला जात असतो.
सर्वप्रथम हा अग्नीशमन दिवस १९९९ मध्ये साजरा करण्यात आला होता.हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू हा जगभरातील फायर फायटर्स यांचा सन्मान करणे त्यांच्या ह्या अमुल्य सेवेसाठी योगदानासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करणे हा होता.
कारण आज फायर फायटर्स हे आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात.हया साहसी अणि जोखिमदायी कार्यात अनेक फायर फायटर्सचा मृत्यू देखील झाला असल्याचे सांगितले जाते.
आॅस्ट्रेलिया देशात एकदा व्हिक्टोरिया मधील लिंटनच्या बुशांना आग लागली होती.यातच उलट दिशेने वारे वाहू लागल्यामुळे अग्नीशमन दलाच्या पाच जवानांचा यात आगीत अडकुन मृत्यू देखील झाला होता.
हवामान खात्याने विपरीत दिशेने वारे वाहणार आहे असे कुठलेही भाकित केलेले नसताना पण अचानक वारयांच्या दिशेत परिवर्तन घडुन आल्याने अग्नीशमन दलाच्या पाच जवानांचा आगीत अडकुन मृत्यू झाला हयाच लोकांना वाचवताना आगीत अडकुन मृत्यू पावलेल्या फायर फायटर्सला सन्मानित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हा जागतिक अग्नीशमन दिवस साजरा करण्यासाठी ४ मे ही तारीख ह्या करीता निवडण्यात आली होती की कारण हयाच दिवशी फायर फायटर सेंट पलोरेन यांचा मृत्यू झाला होता.
असे सांगितले जाते की सेंट पलोरेन यांच्या गावात एकदा अचानक आग लागली ही सर्व आग सेंट पलोरेन यांनी फक्त बादलीभर पाण्याच्या साहाय्याने विझवली होती.तेव्हा पासुन यूरोप तसेच इतर देशांमध्ये सुदधा हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवस म्हणून साजरा केला जातो.
आपत्ती संकट काळात आपल्या जिवाला धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करणारया फायर फायटर्सला सन्मानित करण्याचा त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.आंतरराष्टीय अग्नीशमन दिनी फायर फायटर्सच्या वर्तमान आणि भुतकाळातील योगदानाची आठवण केली जाते.
त्यांच्या ह्या जनतेच्या सेवेसाठी त्यांचे आभार व्यक्त केले जातात.
आताच्या काळात अग्नीशमन दलाची आपल्या जीवनात फार महत्वाची भुमिका आहे.आज कुठेही आग लागली तर अग्नीशमन दलाचे जवान तत्काळ आग लागलेल्या स्थळी धाव घेतात अणि आपला जीव धोक्यात टाकुन आग विझवून सर्व नागरीकांचे प्राण वाचवित असतात.
आज अग्नीशमन दलाचे जवान प्रत्येक जिल्ह्यात शहरात कार्यरत आहेत पण वेळप्रसंगी आपणास देखील इतरांचा जीव वाचवता यावा यासाठी आपण देखील अग्नीशमन प्रशिक्षण घेणे त्या विषयी माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे.
अग्नीशमन प्रशिक्षण नावाचा एक ग्रंथ बाजारात उपलब्ध आहे तसेच यासारखे अनेक ग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत त्यात अग्नीशमन प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे आपण ती देखील वाचुन अग्नीशमन प्रशिक्षणाचे ज्ञान प्राप्त करू शकतो.
आंतरराष्ट्रीय अग्नीशमन दिवस हा १४ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेमुळे देशात साजरा केला जाऊ लागला होता.