अलाउन्स म्हणजे काय?Allowance meaning in Marathi

अलाऊन्स म्हणजे काय?Allowance meaning in Marathi

अलाउन्स म्हणजे भत्ता किंवा एका विशिष्ट हेतुसाठी नियमितपणे दिले जाणारे पैसै तसेच रक्कम.

अलाउन्स हा एक आर्थिक लाभ असतो विशेष सवलत असते जी केंद्र तसेच राज्य सरकार कडुन,विविध कंपनीकडुन आपल्या कर्मचारींना प्रदान केली जात असते.

सरकारी कर्मचारी वर्गाला सरकारकडुन कोणकोणते महत्वाचे अलाउन्स दिले जात असतात?

सरकारी कर्मचारी वर्गाला सरकारकडुन पुढील काही महत्वपूर्ण अलाउन्स दिले जात असतात-

1) डिए

2) एच आर ए

3) टीपीटीए

4) टीए

5) एल टीसी

6) सीई ए

7) डेली अलाउन्स

डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय DA dearness allowance meaning in Marathi

डिअरनेस अलाऊन्स म्हणजे महागाई भत्ता

आपल्या कर्मचारींचे महागाईपासुन रक्षण करण्यासाठी तसेच आपल्या कर्मचारी वर्गाच्या दैनंदिन खर्चावर महागाईचा जो परिणाम होत असतो तो कमी करण्याकरीता सरकार आपल्या कर्मचारींना जो भत्ता देत असते त्याला महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स असे म्हणतात.

महागाई भत्ता हा वर्षातुन दोनदा मोजला जातो.जानेवारी तसेच जूलैदरम्यान साधारणत हा मोजला जात असतो.

हाऊस रेंट अलाऊन्स म्हणजे काय?HRA House rent allowance meaning in Marathi

हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे आवास निवारा भत्ता.

See also  IELTS परीक्षेची माहिती - IELTS Marathi Information

निवारा आवास भत्ता हा अशा सरकारी कर्मचारी वर्गाला दिला जात असतो जे सरकारी कर्मचारी कुठल्याही सरकारी निवासस्थानात न राहता भाडयाने आपला रूम घेऊन निवास करत असतात.भाडयाने खोली रूम घेऊन राहत असतात.

याने सरकारी नोकरदारांना भाडयाने रूम खोली घेण्यासाठी खर्च प्राप्त होत असतो सरकारकडुन निवासासाठी हातभार प्राप्त होत असतो.

कोणत्या कर्मचारीला किती अलाऊन्स द्यायचा हे त्या कर्मचारीच्या वेतन अणि तो राहत असलेल्या शहरावरून ठिकाणावरून निश्चित केले जाते.

ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणजे काय?TPTA Transport allowance meaning in Marathi

ट्ँव्हल अलाऊन्स म्हणजे वाहतुकीचा येण्याजाण्याचा दिला जाणारा खर्च तसेच भत्ता.ज्याला परिवहन भत्ता असे देखील म्हणतात.

हा खर्च सरकारी कर्मचारींना आपल्या निवासस्थानापासुन कार्यालयात आँफिसमध्ये येण्यासाठी अणि सुटटी झाल्यानंतर परत निवास स्थानी जाण्यासाठी दळण वळणाकरीता बसभाडे रिक्षा भाडे वगैरे साठी दिला जात असतो.

हा असा भत्ता असतो ज्यावर केंद्रीय कर्मचारीस महागाई भत्ता देखील प्रदान केला जात असतो.

हा अलाउन्स सर्व कर्मचारींना समान दिला जात नसतो.कर्मचारीची पोस्टिंग कोणत्या ठिकाणी झाली आहे त्याचे एकुण वेतन किती आहे हे बघितले जाते मग हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स कर्मचारीस दिला जात असतो.

कोणत्या कर्मचारीला किती भत्ता दिला जाईल.हे ठरवण्यासाठी टीपीटीएची दोन प्रमुख श्रेणींमध्ये विभागणी करून गणना केली जाते.

उच्च वाहतुक भत्ता असलेली शहरे तसेच कमी वाहतुक भत्ता असलेली शहरे.

ट्रँव्हलिंग अलाऊंस म्हणजे काय?Traveling allowance TA meaning in Marathi

ट्रँव्हलिंग अलाउन्स म्हणजे प्रवास भत्ता.हा भत्ता कर्मचारींना तेव्हा दिला जात असतो जेव्हा ते काही सरकारी तसेच आँफिसच्या कामासाठी प्रवास करत असतात.मग ते मिटिंग असो किंवा आँफिसचे इतर महत्वपूर्ण काम असो.

ट्रँव्हलिंग अलाउंस हा कर्मचारींना देशातील प्रवासयात्रेसाठी तसेच विदेशी प्रवास यात्रेसाठी देखील दिला जात असतो.पण हा तेव्हाच दिला जात असतो जेव्हा कर्मचारी हा आँफिसच्या कामाने ही यात्रा करत असतो.

See also  मोबाईल कीबोर्ड चिन्हे - Keypad symbols (Alt codes)

सरकारी कर्मचारी वर्गाला निवृतीनंतर घरी जाण्यासाठी देखील हा अलाउन्स दिला जात असतो.पण हा अलाउन्स कोणत्या कर्मचारीला किती दिला जाईल पे लेव्हल वर आधारलेले असते.कारण वेगवेगळया पे लेव्हलवर वेगवेगळा अलाउंस दिला जातो.

एलटीसी म्हणजे काय?LTC leave travel concession meaning in Marathi

केंद्र सरकारच्या कर्मचारींना आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला जाण्यासाठी देशाच्या विविध विभागात फिरस्तीला जाण्यासाठी ही विशेष सवलत केंद्र सरकार प्रदान करत असते.

पण यासाठी देखील अट असते सरकारी कर्मचारीला आपल्या कामावर रजा टाकावी लागते त्यासाठी रजेचा अर्ज करावा लागतो.

मग रजा मंजुर झाल्यानंतर जितक्या दिवसांची एलटीसी त्याने काढली आहे.तितक्या दिवसांच्या भारत भ्रमणासाठी यात्रेसाठी त्याला अलाऊन्स दिला जात असतो.

पण ज्या कर्मचारींची पत्नी रेल्वेत कार्यरत आहे अशा कर्मचारींना ही सवलत दिली जात नसते.अशा कर्मचारींना सरकारकडुन वार्षिक आँल इंडिया एलटीसी दिला जात असतो.

सीईए म्हणजे काय?CEA children education allowance meaning in Marathi

हा अलाउन्स सरकारी कर्मचारी वर्गाला मुलांचे शिक्षण करण्यासाठी दिला जात असतो.ज्या कर्मचारीला किमान दोन मुले आहेत त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी हा भत्ता सरकारकडुन दिला जात असतो.

ह्यात सरकारी कर्मचारीच्या मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा किमान दोन हजार रूपये अणि ६ हजार वसतीगृह अनुदान करीता दिले जातात.पण यासाठी वस्तीगृह खर्चाची पावती एखादे प्रमाण दाखवणे आवश्यक आहे.

सरकारी कर्मचारीचा मुलगा जर अपंग दिव्यांग असेल तर यात अधिक वाढ केली जाते.

हा अलाउन्स प्राप्त करण्यासाठी कर्मचारीला आपला मुलगा ज्या शाळेत महाविद्यालय संस्थेत शिक्षण घेत आहे तेथील प्रमुखाने दिलेले सर्व शैक्षणिक खर्चाचे प्रमाण आवश्यक असते.अँडमिशन घेतला असल्याचा पुरावा म्हणुन पावती दाखवावी लागते.

डेली अलाउन्स म्हणजे काय?Daily allowance meaning in Marathi

डेली अलाउन्स म्हणजे दैनंदिन भत्ता.दैनंदिन भत्यात कर्मचारीला सरकारकडुन सरकारी कामकाजासाठी बसने रेल्वेने रोजचा येण्याजाण्याचा प्रवासाचा खर्च जेवणाचा खर्च दिला जात असतो.

See also  नाबार्डचा फुलफाँर्म काय होतो? - NABARD full form in Marathi

सरकारी कामामुळे मुक्काम करावा लागला तर राहण्याचा खर्च पण मिळतो.

केंद्र सरकार कडुन काही मोजक्याच विशिष्ट श्रेणी गटातील कर्मचारींना दिले जाणारे काही विशेष अलाउन्स –

1)brief case allowance –

ह्या भत्याअंतर्गत काही विशिष्ट गटातील सरकारी कर्मचारींना आँफिशल बँग ब्रिफकेस खरेदी करायला,सुटकेस,पर्स इत्यादी खरेदी करायला विशिष्ट रक्कम दिली जात असते.

हा अलाउन्स तीन वर्षातुन एकदाच दिला जात असतो.

2) uniform allowance –

हा अलाऊन्स सरकारकडुन तसेच कंपनीकडुन कर्मचारीला नवीन गणवेश खरेदी करण्यासाठी तसेच शिवून घेण्यासाठी दिला जात असतो.

3) residential newspaper allowance –

ह्या अलाउन्सदवारे सरकारी कर्मचारीला आपल्या निवासस्थानी वर्तमानपत्रे प्राप्त करण्यासाठी विकत घेण्यासाठी अलाउन्स म्हणजेच खर्च दिला जात असतो.

यासाठी सरकारी अधिकारी कर्मचारीला एक फाँर्म भरून आपल्या आँफिसात जमा करावा लागत असतो.

कन्वहेनिअस अलाऊन्स म्हणजे काय?Conveyance allowance meaning in Marathi

जेव्हा कर्मचारी कंपनीच्या कामाने बाहेर जात असतो अणि एखाद्या लोकल ठिकाणी काम करत असतो तेव्हा त्या कर्मचारीला कंपनीकडुन हा अलाउन्स दिला जात असतो.

सिटी कंपेसेशन अलाउन्स म्हणजे काय?City compensation allowance meaning in Marathi

जेव्हा एखादा कर्मचारीला कंपनीकडुन दुसरया शहरात ट्रान्सफर केले जाते.तेव्हा त्या शहरामधील इतर महत्वपूर्ण खर्चाकरीता कंपनी त्या कर्मचारीला काही अतिरीक्त खर्च देत असते ज्याला सिटी कंपेसेशन अलाऊन्स असे म्हणतात.