अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार का दिला जातो आहे?
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भुषण पुरस्कार १६ एप्रिल २०२३ रोजी दिला जातो आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आतापर्यंत केलेल्या समाजसेवेच्या कार्यासाठी अध्यात्मिक निरूपणाच्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार शासनाकडुन दिला जातो आहे.
पण आपल्यातील खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार का दिला जातो आहे त्यांनी असे कोणते महान कार्य समाजासाठी केले आहे.
आजच्या लेखात आपण अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार का दिला जातो आहे याचे कारण जाणुन घेणार आहोत.
याचसोबत अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अशी कोणकोणती सामाजिक कार्य केली आहेत ज्यामुळे त्यांना शासनाकडून आज हा पुरस्कार दिला जातो आहे हे देखील बघणार आहोत.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेली सामाजिक कार्ये कोणकोणती आहेत?
रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात वास्तव्यास असलेले कित्येक तरूण मंडळी लोक दारूच्या व्यसनाच्या आहारी जात होती.
अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्या कित्येक लोकांचे अध्यात्मिक प्रबोधन करून अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांना व्यसन मुक्त करण्याचे महान काम केले.
म्हणजेच दारूच्या नशेत आपले तारूण्य वाया घालवत असलेल्या तरूणाईला अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्माचा मार्ग दाखवला.
याचसोबत अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या समाजसेवेच्या कार्याला पुढे नेण्याचे कार्य देखील अप्पासाहेब यांनी केले.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या सामाजिक सेवेच्या वारशाला पुढे नेण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी संस्थानाची स्थापणा केली.
ह्या संस्थानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
ज्यात त्यांनी भोळी भाबडी जनता जी अंधश्रद्धेच्या आहारी गेली होती त्यांचे अध्यात्मिक निरुपण करत त्यांना अंध्रश्रदधेतुन बाहेर काढले समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले.
भोळी भाबडी जनता कर्मकांडांत फसली होती एका विशिष्ट वर्गाकडून कर्म कांडाच्या अणि धर्माच्या नावाखाली त्यांना लुबाडले जात होते त्यांची लुट केली होती ही सर्वसामान्य जनतेची केली जात असलेली लुट दिशाभूल दुर करण्याचे थांबवण्याचे काम अप्पासाहेब यांनी आपल्या अध्यात्मिक निरूपणाच्या बैठकीतुन केले.
निसर्गाचे बिघडलेले संतुलन पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम अप्पासाहेब यांनी राबविले सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होत जागोजागी वृक्ष लागवडीचे काम त्यांनी केले.
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे ही गरज लक्षात घेऊन अप्पासाहेब यांनी स्वच्छता अभियान राबवत सार्वजनिक ठिकाणी झाडु मारत परिसराची स्वच्छता देखील केली.
जिथे शासनाच्या वतीने स्वच्छतेसाठी यंत्रणेची कमतरता तिथे आपल्या अनुयायांसमवेत अप्पासाहेब यांनी परिसर स्वच्छतेचे कार्य केले.
समुद्र किनारा,वाहतुकीची रस्ते इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.सोबत जनतेला देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम केले.
ज्या बेरोजगारांना रोजगार कुठे अणि कसा मिळेल हे माहीत नाही अशा देशातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी,रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी विविध रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले.
त्यांच्या ह्या उपक्रमामुळे कित्येक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला.
विविध प्रकारच्या व्यसनामध्ये गुरफटलेल्या तरूणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी जागोजागी व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापना केली.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिरांचे देखील आयोजन केले.हया शिबिरांतर्गत त्यांनी आदिवासी तसेच खेड्यापाड्यातील गरीब लोकांना मोफत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
जागोजागी रूग्णालयात रक्ताची आवश्यकता असलेल्या गरजु रूग्णांना रक्त प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
आपल्या अध्यात्मिक निरूपणाच्या श्री बैठकीच्या कार्यातुन समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम केले संताची शिकवण घराघरात पोहचवण्याचे काम केले.लोकांचे कुठलेही शुल्क न घेता अध्यात्मिक प्रबोधन केले.
बालसंस्कार वर्ग सुरू केले अप्पासाहेब यांचे असे मत होते की समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी बालपणापासूनच मुलांच्या मनावर संस्कार केले जाणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी मुलांच्या मनावर बालपणापासूनच संस्कार व्हावेत यासाठी निःशुल्क बालसंस्कार वर्ग सुरू केले.
अशी विविध सामाजिक सेवेची कार्ये आतापर्यंत निस्वार्थ भावनेने आप्पासाहेब यांनी केली आहेत म्हणून त्यांच्या ह्या महान कार्याची दखल घेत शासनाकडुन त्यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
याआधी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पिता नानासाहेब यांना देखील समाजसेवेच्या कार्यासाठी हा महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला आहे.