किती बोलावे,कसे बोलावे अणि कधी बोलावे? Art of speaking, Advanced communication skills
कधी कधी रागाच्या भरात आवेशात येऊन आपण समोरच्या व्यक्तीला असे काही बोलून बसतो जे आपण नाही बोलायला हवे.
मग नंतर बोलून झाल्यावर आपण पश्चात्ताप करीत बसतो की आपण समोरच्या व्यक्तीला असे नको बोलायला हवे होते.
कुठलाही विचार न करता कोणाला कधीही काहीही बोलण्यामुळे आपले अनेक जवळच्या व्यक्तींशी संबंध देखील खराब होऊन जात असतात.
म्हणुन आपण कोणालाही काही बोलण्याच्या आधी चारवेळा विचार करणे खुप आवश्यक आहे.आपण असे बोलल्याने काय दुष्परिणाम होतील याचा विचार एकदा नक्की करायला हवा.
कारण बोललेले शब्द पुन्हा वापस आपण घेऊ शकत नाही म्हणून बोलुन झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा पस्तावा करण्यापेक्षा आपण कुठलाही शब्द बोलण्या आधी चार वेळा विचार करणे आवश्यक आहे.
बोलणे ही एक अशी कला आहे जी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपणास आत्मसात करणे आवश्यक आहे.
कुठल्या ठिकाणी कोणाशी कसे बोलावे?किती बोलावे?कधी बोलावे हे अचुक कौशल्य जर आपण आत्मसात केले तर आपण कुठल्याही क्षेत्रात सहजरीत्या यशस्वी होऊ शकतो.
कारण कुठे किती कधी अणि कसे बोलावे हे कौशल्य आपल्या अंगी असेल तर आपण आपले विचार मत भावना निडर होऊन प्रभावीपणे इतरांसमोर मांडु शकतो.इतरांना आपले विचार मत पटवून देऊ शकतो.अणि त्यांना कन्व्हेयन्स देखील करू शकतो.
बोलणे हे एक असे कौशल्य आहे जे आपल्याला कुठल्याही व्यवसायात कस्टमरला आपले प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी कन्व्हेयन्स करताना,क्लाईंट समोर प्रेझेंटेशन देताना सेल्स,मार्केटिंग सेलिंग मध्ये तर उपयोगी पडते.शिवाय जीवनातील इतर क्षेत्रात देखील नक्कीच उपयोगात येते.
खुप जण आपल्या क्षेत्रात पाहिजे तसे यश प्राप्त करण्यास अपयशी ठरत असतात कारण त्यांच्यामध्ये बोलण्याची कला नसते.ज्यामुळे त्यांना इतरांसमोर आपले विचार मत भावना प्रभावीपणे मांडता येत नसतात.परिणाम स्वरुप त्यांना इतरांना आपले विचार मत व्यवस्थित पटवून देता येत नसतात.
जेणेकरून समोरचा देखील त्यांच्या बोलण्याने त्यांची वस्तु प्रोडक्ट विकत घ्यायला कन्व्हेयन्स होत नाही.ज्यामुळे त्यांना पाहिजे तसे यश आपल्या व्यवसाय उद्योगात प्राप्त होत नसते.
बोलण्याची कला कौशल्य कसे आत्मसात करावे?
जर आपणास देखील कुठे कधी अणि कसे बोलावे हे कौशल्य शिकायचे असेल तर आपण खाली दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करायला हव्यात.
१) बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालुन बोलणे –
कधीही कुठल्याही ठिकाणी मग ती एखादी मिटिंग वगैरे असो किंवा समारंभात स्टेज वर बोलताना आपण समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे हाॅल मध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालुन बोलणे आवश्यक आहे याने आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थित पोहोचत असतात.
डोळ्यात डोळे घालून बोलल्याने आपल्या चेहऱ्यावर डोळ्यात आत्मविश्वास झळकत असतो.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी बोलत असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे ऐकून घेण्यात रूची वाटत असते.आपल्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास बघुन त्याला आपल्या शब्दांमधील सत्यता दिसुन येते.
लोकांनी आपले बोलणे ऐकावे आपल्या बोलण्याकडे लक्ष द्यावे यासाठी आपण बोलताना लोकांच्या नजरेत नजर घालून बोलायला हवे.याने समोरची व्यक्ती आपले बोलणे ऐकण्यात इंटरेसटेड आहे हे देखील आपणास कळत असते.
बोलताना आपण कधीही खाली मान घालून बोलु नये इकडे तिकडे वर खाली बघु नये.याने हाॅल मध्ये उपस्थित प्रेक्षक देखील बोर व्हायला लागतात त्यांना आपले बोलणे कंटाळवाणे वाटू लागते आणि मग ते आपल्या बोलण्याकडे लक्ष देणे सोडुन मोबाईल मध्ये बोटे घालायला सुरुवात करीत असतात.
बोलताना आपली नजर हाॅल मध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्तीकडे जायला हवी.आपल्या नजरेशी त्यांची नजर भिडणे आवश्यक आहे तेव्हाच आपले विचार त्यांच्यापर्यंत व्यवस्थीत पोहोचतील.
२) कुठे बोलायचे?कसे बोलायचे?किती बोलायचे?अणि आपले बोलणे कुठे थांबवायचे याचे भान ठेवणे –
परिस्थिती नुसार कोणत्या ठिकाणी गेल्यावर आपण किती बोलायला हवे कसे बोलायला हवे आपले बोलणे कुठे थांबवायला हवे याचे आपण भान ठेवायला हवे.
जेव्हा आपण आपल्या बालपणीच्या,काॅलेजच्या मित्र मैत्रिणींना खुप दिवसांनी भेटतो तेव्हा तिथे औपचारिक न होता आपण अनौपचारिक पणे थट्टा मस्करी केली,खुप वेळ मित्रांशी गप्पा मारल्या बोललो,बोलताना जोरजोरात हसलो तर ते ठिक आहे.
पण याचठिकाणी आपण एखाद्या नातेवाईकाच्या तसेच कामावरील सहकारीच्या घरी काही कामानिमित्त गेलो
किंवा एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू वगैरे साठी गेलो किंवा आपल्या कंपनीकडुन प्रेझेंटेशन देत असलो तर तिथे आपण थट्टा मस्करी करून चालणार नाही तिथे आपणास आवश्यक तेवढे मुद्देसूद पणे बोलता यायला हवे.
खुप जास्त न हसता,खुप जास्त वेळ बडबड न करता,एकदम मर्यादित स्पष्टपणे अणि मोजक्या शब्दात औपचारिक पद्धतीने मुद्देसूद पणे आपले मत विचार इतरांसमोर मांडता आले पाहिजे.आपले मत इतरांना पटवून देता आले पाहिजे.
3) बोलताना आपल्या शब्दात गोडवा माधुर्य असायला हवे-
नेहमी आपल्या बोलण्यामध्ये गोडवा माधुर्य असायला हवे फक्त बोलण्याने समोरच्या व्यक्तीचे मन आपल्याला जिंकून घेता आले पाहिजे.
काही लोक असे असतात जे पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीचे फक्त आपल्या बोलण्याने मन जिंकून घेत असतात.फक्त एका भेटीत त्याचे मन वळवून घेत असतात.त्याच्या हदयात आपले एक स्थान निर्माण करून घेत असतात.
तर काही व्यक्ती असे देखील असतात ज्यांना भेटल्यावर पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीचे त्यांच्यावरील मन उडुन जाते.पहिल्याच भेटीत ती व्यक्ती समोरच्याला नकोनकोशी वाटु लागते.
यावरून आपणास लक्षात येईल की आपले बोलणे कसे आहे यावरून व्यक्ती आपली पारख करीत असते.त्याच्या हदयात जीवनात आपल्याला स्थान देत असते.
म्हणुन आपण कुठल्याही क्षेत्रात असाल नेहमी आपल्या बोलण्यात माधुर्य विनम्रता समोरच्या विषयी आदर असायला हवा.बोलताना आपल्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित हास्य असायला हवे.कारण आनंदी व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती सर्वांना नेहमीच आवडते.
आपले शब्द हेच समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी आदर सन्मान प्रेम निर्माण करीत असतात.
४) बोलण्यातील ताळमेळ –
बोलताना आपल्याला किती जोरात बोलावे किती हळु आवाजात बोलावे हे माहीत असणे आवश्यक आहे.
खुप हळु आवाजात बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे व्यवस्थित ऐकु येत नाही अणि खुप जोरजोरात बोलल्याने समोरच्या व्यक्तीचे कान दुखु लागतील तो कानांवर हात लावून बसेल म्हणून आपल्याला बोलताना आपल्या आवाजात ताळमेळ ठेवून बोलता यायला हवे.
बोलताना आपल्या आवाजात एक परफेक्ट व्हॅल्युम अणि एक ट्युनिंग असायला हवी.
५) मी अणि माझे न करता समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घ्यायला हवे –
काही व्यक्तींना बोलताना स्वता विषयीच बोलायला आवडत असते ते दुसरयाचे बोलणे अजिबात ऐकुन घेत नसतात ज्यामुळे समोरची व्यक्ती त्यांचा कंटाळा करू लागते.
म्हणुन आपण बोलताना समोरच्या व्यक्तीचे बोलणे देखील नीट व्यवस्थित ऐकून समजून घ्यायला हवे याने बोलताना एकमेकांशी संवाद साधणे अधिक सोप्पे जाते.
आपण समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट ऐकून घेतले तर पुढच्या वेळी तो त्याचे पर्सनल सिक्रेट मनातील इतर सर्व गोष्टी देखील शेअर करू लागतो कारण त्याचा आपल्यावर विश्वास झालेला असतो.त्याच्याशी आपण इमोशनली कनेक्ट झालेलो असतो.