बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर २२५ जागांसाठी भरती सुरू | Bank of Maharashtra recruitment 2023 in Marathi

बॅक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर २२५ जागांसाठी भरती सुरू |  Bank of Maharashtra recruitment 2023 in Marathi

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तब्बल २२५ जागांसाठी बंपर भरती केली जात आहे.या भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात देखील झालेली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आॅनलाईन पद्धतीने आपल्या पात्रतेनुसार योग्य असलेल्या पदासाठी ६ फेब्रुवारी च्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

एकुण पदे -२२५

सर्व पदांचा तपशीलवार –

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये २२५ जागांसाठी जी भरती करण्यात येत आहे यात अर्थशास्त्रज्ञ पदासाठी दोन जागा असणार आहे.

सुरक्षा अधिकारी पदाच्या १० जागा,कायदा अधिकारी पदाच्या १० जागा असणार आहे.स्थापत्य अभियंता पदाच्या तीन जागा,

व्यवसाय विकास अधिकारी पदाच्या ५० जागा भरल्या जाणार आहे.विदयुत अभियंता पदाच्या दोन जागा, राजभाषा अधिकारी पदासाठी एकुण १५ जागा भरल्या जाणार आहे.

एच आर पर्सोनिल आॅफिसर पदाच्या १० जागा अणि आयटी स्पेशालिस्ट पदाच्या एकुण १२३ जागांची भरती करण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या पदानुसार ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या अटी –

१)अर्थशास्त्रज्ञ -२ जागा

अर्थशास्त्रज्ञ या पदासाठी उमेदवाराने अर्थशास्त्र ह्या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवारास किमान पाच ते सहा वर्षांचा अनुभव देखील असायला हवा.

२) सुरक्षा अधिकारी -१० जागा

सुरक्षा अधिकारी पदाच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतुन कुठल्याही एका शाखेतुन बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

See also  PM-KMY -प्रधानमंत्री किसान मानधन योजना विषयी माहीती-2023 Updates - Pradhan Mantri Kisan Maan-Dhan Yojana (PM-KMY)

सुरक्षा अधिकारी पदावर काम करण्याचा पाच वर्षे इतका अनुभव देखील असायला हवा.

३) स्थापत्य अभियंता -३ जागा

स्थापत्य अभियंता पदाच्या भरतीसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन प्राप्त केलेली अभियांत्रिकी डिग्री असणे आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता पदावर काम करण्याचा तीन ते पाच वर्षे इतका अनुभव देखील असायला हवा.

४) कायदा अधिकारी -१० जागा

कायदा अधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन लाॅची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच कायदा अधिकारी पदावर काम करण्याचा सात ते आठ वर्षांचा अनुभव देखील असायला हवा.

५) व्यवसाय विकास अधिकारी -५० जागा

व्यवसाय विकास अधिकारी म्हणजेच बिझनेस डेव्हलपमेंट आॅफिसर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच पीजीडी एमबीए एम बी ए मार्केटिंग/पीजी डिग्री झालेली असणे आवश्यक आहे.

व्यवसाय विकास अधिकारी पदासाठी उमेदवाराला ह्या कामाचा किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

६) विद्युत अभियंता -२ जागा

विद्युत अभियंता पदासाठी अर्ज करायला उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन इलेक्ट्रीकल विषयात अभियांत्रिकी डिग्री मिळवणे गरजेचे आहे.

विद्युत अभियंता पदासाठी उमेदवाराला ह्या क्षेत्रातील कामाचा किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक असणार आहे.

७) राजभाषा अधिकारी -१५ जागा

राजभाषा अधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच राजभाषा अधिकारी क्षेत्रात काम करण्याचा किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

८) एच आर/परसोनिल आॅफिसर -एकुण १० जागा

एच आर परसोनिल आॅफिसर पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन कुठल्याही एका शाखेमधुन पदवी तसेच पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे.

एच आर परसोनिल आॅफिसर पदासाठी किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

९) आयटी स्पेशालिस्ट -१२३ जागा

आयटी स्पेशालिस्ट पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्थेतुन बीई बीटेक किंवा एमसीए एम एससी केलेली असणे आवश्यक आहे.

See also  दुर संचार विभागात २७० जागांसाठी भरती सुरू- DOT recruitment 2023 in Marathi

वयाची अट –

उमेदवार ३१ आॅक्टोंबर २०२२ रोजी २१ ते ३८ वर्षांचा असणे आवश्यक आहे.

वयातील सुट –

वयाच्या संदर्भात एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क तसेच फी –

जनरल कॅटॅगरी मधील उमेदवाराला अर्ज शुल्क १८० भरावे लागणार आहे.अणि ओबीसी एससी एसटी कॅटॅगरी पीडबलयुडी मधील उमेदवारांना ११८ रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

वेतन –

वरील सर्व पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ४८ हजार एकशे सत्तर रुपये ते ७८ हजार हजार २३० रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर पदांसाठी अर्ज करायला २३/१/२०२३ पासुन सुरूवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०२३ असणार आहे म्हणून सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरायचा आहे.

बॅक आॅफ महाराष्ट्रची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?

Bankofmaharashtra.in ही बॅक आॅफ महाराष्ट्रची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

निवड प्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची निवड ही आॅनलाईन परीक्षेतील तसेच इंटरव्ह्यू मधील गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

आॅनलाईन अर्ज करण्याची लिंक –

“RECRUITMENT OF SPECIALIST OFFICERS IN SCALE II & III PROJECT 2023-24 “https://ibpsonline.ibps.in/bomsodec22/