21 Best Marathi Web Series- मराठीत बघण्यासाठी 21 उत्तम वेब सीरीज – Best Marathi web series to watch in Marathi

मराठीत बघण्यासाठी उत्तम वेब सीरीज – Best Marathi web series to watch in Marathi

मित्रांनो आजकाल संपुर्ण जगभरात वेब सीरीजची लोकांना आवड लागली आहे.

वेब सीरीजची भारत वाढणारी ही क्रेझ बघुन आता इंग्लिश अणि हिंदी भाषेसोबत आता मराठी मध्ये देखील वेबसीरीज तयार केल्या जात आहेत.

वेबसीरीजचे कथानक इतके रंजक असते की आता मराठी माणसांना मराठी चित्रपटांसोबत वेबसीरीज देखील बघायची आवड हळु हळु निर्माण होते आहे.

मराठी प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेऊन आज आपण सुटटीच्या दिवशी तसेच फावल्या वेळात आपल्या प्रियजनांसोबत टाईमपास,मनोरंजन म्हणुन बघण्यासाठी

आपल्या मातृभाषेत तयार करण्यात आलेल्या मराठीतील काही उत्तम वेबसीरीजची नावे जाणुन घेणार आहोत.

मराठीतील उत्तम वेबसीरीजच्या नावांची यादी -चँनलच्या नावासमवेत-best Marathi web series list with their channel name

शांती क्रांती २०२१-

ही वेबसीरीजला आपण सोनी लिव्ह ह्या चँनलवर बघु शकता.

ही एक ड्रामा तसेच काँमेडी वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजमध्ये आपणास तीन मित्रांची कथा दिसुन येते जे आपल्या सध्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी गोव्याच्या ट्रिपला जाण्याचे ठरवतात.

अणि या तिघेही मित्रांना आपली सहल लोणावळा येथील ध्यानधारणेत संपवायची असते.

ह्या वेबसीरीजला आय एम डीबी वर ८.५ इतके रेटिंग देण्यात आली आहे.ह्या वेबसीरीजचे दिदर्शन सारंग साठे अणि पाँला मँक्लगीन या दोघांनी मिळुन केले आहे.हिचे लेखन सुदधा सारंग साठे यांनीच केले आहे.

यात कलाकारांच्या भुमिकेत आपणास आलोक राजवाडे,अभय महाजन,ललित प्रभाकर,सागर यादव शिखा तलसानिया इत्यादी जण दिसुन येतात.

झुम २०२१-

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.जीचे सिझन वन भाग ५ हा आपल्यासाठी युटयुबवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.ह्या वेबसीरीजला आय एम डीबी वर ९.३ इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.

ह्या वेबसीरीजची सेटींग पुणे शहरात करण्यात आली आहे.आणि याची सुरूवात ही गौरवने केली आहे जो आपले पहिले पेय वापरण्यासाठी सज्ज आहे परंतु अचानक त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी एक प्रसंगपूर्ण संध्याकाळ उलगडते.

हिचे दिग्दर्शक ओंकार जाधव अणि अभय राऊत हे दोघे आहेत.

ह्या वेब सीरीजचे लेखन वरूण नार्वेकर यांनी केले आहे.यात विभावरी देशपांडे,सुनिल अभ्यंकर,तृष्णा चंद्रात्रे,दिव्या कनारे,गधर्व गुळवेलकर इत्यादी कलाकार आपणास दिसुन येतात.

अणि काय हवे?-

ही एक रोमाँन्स अणि काँमेडीने भरलेली वेबसीरीज आहे.

ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ९.० इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ही वेब सीरीज आपण एम एक्स प्लेअर वर जाऊन बघु शकतो.

ह्या वेबसीरीजमध्ये आपणास पुण्यातील दांपत्य साकेत जुही या लाईफस्टाईल पाहायला मिळते.ह्या वेबसीरीज मध्ये आपणास साकेत अणि जुहीचा रोजचा दैनंदिन जीवनातील संघर्ष अणि दोघांचे एकमेकांवर असलेला बिना अटीचे प्रेम आपणास पाहायला मिळते.

ह्या वेबसीरीजचे लेखन अणि दिग्दर्शन वरूण नार्वेकर यांनी केले आहे.

यात आपल्याला कलाकारांमध्ये प्रिया बापट अणि उमेश कामत हे दोघे देखील दिसुन येतात.

See also  World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

4) समांतर २०२० –

ह्या वेबसीरीजला आतापर्यत आय एम डी बी वर ८.७ इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.ही एक मिस्टेरीअस म्हणजे गुढ वेबसीरीज आहे.

ही वेबसीरीज आपणास एम एक्स प्लेअर वर पाहायला मिळेल.ह्या वेबसीरीजचे कथानक आपणास कुमार महाजन या तरूणाच्या जीवनाच्या अवतीभोवती फिरताना दिसुन येते.

कुमार हा एकेदिवशी त्याच्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी प्रवासाला निघतो.अणि प्रवास करत असताना त्याची भेट सुदर्शन चक्रपाणी यांच्याशी होते.
त्यानंतर हे दोन्ही व्यक्ती समान नशिबात सामायिक करतात.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे अणि समीर विदवंस यांनी केले आहे.ह्या वेबसीरीजचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

यात आपल्याला कलाकारांमध्ये स्वप्र्नील जोशी,जयंत सावरकर,तेजस्विनी पंडित,नितीश भारदवाज,गणेश रैवडेकर हे दिसुन येतात.

5) गुड बाँय –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपणास हंगामा ह्या चँनलवर पाहायला मिळेल.

ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर आतापर्यत ४.७ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.

यात आपली भेट २६ वर्षीय प्रणव मुखर्जी हया ड्रान्स इंस्कट्ररशी होते.जो ह्या गुड बाँय फाँर्मयुलाचे अनुसरण करताना दिसतो.यात तो कुठले नातेसंबंध न जोडता मुलींशी जवळीक साधताना दिसतो.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन बद्रीश यांनी अणि लेखन अनुपम पुरोहित यांनी केले आहे.ह्या वेब सीरीजमध्ये आपणास कलाकाराच्या रूपात खुशबू तावडे,ऋषी सक्सेना,रीना अग्रवाल,विनय येडेकर हे दिसुन येतात.

6) काळे धंदे –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ८.१ इतकी रेटींग देण्यात आली आहे.ही वेब सीरीज आपणास झी ५ वर पाहायला मिळेल.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक रामचंद्र गावकर आहेत.यात कलाकारांमध्ये आपल्याला ओंकार राऊत,महेश मांजरेकर,शुभंकर तावडे,नेहा खान,निखिल रत्नपारखी हे दिसुन येतात.

ह्या वेबसीरीजचे कथानक विकी नावाच्या तरूणाभोवती फिरताना दिसते.विकी हा एक फोटोग्राफर असतो जो आपला अधिक वेळ आपले मित्र सुदर्शन अणि सँम यांच्यासोबतच घालवत असतो.

एकेदिवशी विकीची भेट एका सुंदर मुलीशी होते अणि तो तिच्यासोबत डेटवर जातो.दोघे जण एका काँपी शाँपमध्ये काँफी प्यायला जातात.पण विकीला त्याचे काका रंगेहाथ त्या मुलीसोबत काँपी शाँपमध्ये पकडतात.अणि मग ते विकीला ब्लँकमेल करायला सुरूवात करत असतात.

आता पुढे काय होईल विकीला काका कसा ब्लँकमेल करतो अणि त्याच्याकडुन काय काय करून करून घेतो हे पाहण्यासाठी आपल्याला ही वेबसीरीज स्वता झी ५ वर जाऊन बघावी लागेल.

7) गोंदया आला रे –

ही एक बायोग्राफी तसेच अँक्शन वेबसीरीज आहे.

ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ९.१ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ही वेबसीरीज आपण झी ५ ह्या चँनलवर जाऊन पाहु शकतो.

ही वेबसीरीज चाफेकर बंधु अणि स्वांत्रयकथेवर आधारीत वेबसीरीज आहे.भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी हे बंधु ब्रिटीश सैन्यासोबत लढतात.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन अंकुर काकतकर यांनी केले आहे.ह्या वेबसीरीजचे लेखन अंकुर काकतकर अणि उन्मान बनकर यांनी केले आहे.

ह्या वेबसीरीजमध्ये कलाकारांच्या रूपात आपणास पल्लवी पाटील,भरत दाभोळकर,शालव किंजवडेकर,पार्थ केतकर,शिवराज वायचळ हे दिसून येतात.

8) हाय टाईम –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ८.४ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ही वेबसीरीज आपण युटयुबवर बघु शकतो.

हाय टाईम ह्या वेबसीरीजमध्ये आपणास तीन तरूणांची कहाणी बघायला मिळते.ज्यांचे नाव देवेंद्र,अमेय,बिपीन असे आहे.

हे तिघेही एकाच काँलेजमध्ये सोबत शिक्षण घेत असतात.पण या तिघांनाही एकमेकांचा तिरस्कार असतो त्यांचे कधीच जमत नसते.

एकेदिवशी हे तिघेही जण तानिया नावाच्या मुलीच्या एस एम एस मध्ये अडकतात.मग तानिया या तिघांनाही ह्या एस एम एसच्या जोरावर ब्लँकमेल करू लागते.तानिया या तिघांना कशापदधतीने ब्लँकमेल करते हे बघण्यासाठी आपण ही वेबसीरीज युटयुबवर स्वता जाऊन पाहु शकता.

See also  जागतिक परिचारिका दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? National Nurses day 2023

ही २०२० मध्ये रिलीज झालेल्या क्राईम वेबसीरीज पैकी एक अत्यंत लोकप्रिय वेबसीरीज आहे.

ह्या वेबसीरीजचे लेखन अणि दिग्दर्शन अमेय बेकनाळकर अणि शुभेंदु ललित यांनी केले आहे.ह्या वेबसीरीजमध्ये कलाकाराच्या रूपात आपणास सिदधार्थ महाशब्दे,साईनाथ गानूवाड,सुवेद कुलकर्णी,क्षितीज दाते हे दिसून येतात.

9) मुव्हींग आऊट –

ही एक ड्रामा अणि प्रेरणादायी वेबसीरीज आहे.ही वेब सीरीज आपण युटमुबवर पाहु शकतो.ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर आतापर्यत ७.८ इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.

यात आपणास एका आधुनिक युगातील मुलीची कथा पाहायला मिळते.घरचे लग्न करण्याचा अती आग्रह धरतात म्हणुन घरच्यांच्या त्रासाला कंटाळुन ही मुलगी घर सोडुन निघून जाते.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन मयुरेश माधव जोशी यांनी केले आहे.तसेच हिचे लेखन मयुरेश माधव जोशी,संदेश कुलकर्णी,निरंजन पराडकर यांनी केले आहे.

यात कलाकाराच्या रूपात आपणास गिरीजा ओक,अभिज्ञा भावे,निखिल राजशिर्के,त्रषी सक्सेना,सुश्रुत भागवत हे दिसुन येतात.

10) सेफ जर्नी –

सेफ जर्नी ही एक ड्रामा वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण युटयुब वर जाऊन पाहु शकतो.

ही एक लैंगिक जीवनावर आधारलेली वेबसीरीज आहे यात.ही वेबसीरीज सेफ सेक्सला प्रोत्साहन देण्याचे काम करते.लैंगिक अत्याचार थांबवणे हा ह्या वेबसीरीजचा मुख्य हेतू आहे.

कथेत आपल्याला एक हिंदु मुलगी जी कंपनीत कामाला आहे अणि अमेरिकेत वास्तव्यास असणारा मुस्लिम मुलगा पाहायला मिळतो.जो काँल सेंटरमध्ये कामाला लागलेला असतो.

एकेदिवशी यांची एकमेकांशी भेट होते मग ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडतात.तिथून पुढे कथेला टविस्ट अँण्ड टर्न प्राप्त होताना दिसतो.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन अनुपम बर्वे आलोक राजवाडे अणि वरूण नार्वेकर यांनी केले आहे.हिचे लेखन अमर देवगावकर यांनी केले आहे.

यात कलाकारांमध्ये आपणास सोहम आठवले,मृण्मयी गोडबोले,आलोक राजवाडे,वैभव आबनावे,आदित्य संतोष हे पाहावयास मिळतात.

11) भाडखाऊ –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण अँमेझाँन प्राईमवर जाऊन बघु शकतो.

ह्या वेबसीरीजला आरंभ हा संत्यापासुन होतो.संत्या ला एकेदिवशी त्याच्या हनीमुनच्या काही दिवस आधी पाचशे रूपयाच्या नोटा सापडतात.ज्यावर भाडखाऊ असे लिहिलेले असते.

यानंतर त्याचा हनीमुन पुढे ढकलला जात असतो.आपला हनीमुन ह्या नोटांमुळेच पोस्पोन झाला असे संत्याला वाटते म्हणुन तो ती नोट ज्याने पाठवली आहे त्याचा शोध घेण्यास सुरूवात करतो.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शन शैलेश डेरे यांनी केले आहे.यात कलाकारांमध्ये आपणास नील नगरकर,स्नेहा जोशी,जेबा शेख,साक्षी गांधी हे दिसुन येतात.

12) लिफ्टमन –

ही एक काँमेडी तसेच ड्रामा वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण झी ५ वर जाऊन पाहु शकतो.

ह्या वेबसीरीजचे संपुर्ण कथानक आपणास एका लिफ्ट आँपरेटरच्या अवतीभोवती फिरताना दिसते.ही एक बेस्ट काँमेडी वेबसीरीज आहे.

ह्या वेबसीरीज मध्ये आपणास भाऊ कदम हे प्रमुख कलाकाराच्या रूपात दिसुन येतात.

13) एडियट बाँक्स –

ही एक थ्रीलर वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण एम एक्स प्लेअर वर जाऊन बघु शकतो.

ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ७.२ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक विराजस कुलकर्णी अणि जीत अशोक हे आहेत.

यात आपणास कलाकाराच्या रूपात संस्कृती बालगुडे,मृणाल कुलकर्णी,पुष्कर जोग,सुनिल बर्वे,स्पृहा जोशी हे दिसुन येतात.

ह्या वेबसीरीजच्या कथानकात आकाश नावाचा युवक दाखवला आहे जो त्याच्या जुन्या गर्लफ्रेंड कडे येण्यासाठी आतुर झालेला आहे.

जुन्या गर्लफ्रेंड कडे परत येण्यासाठी तो तिचा मोबाइल नंबर चोरायचा कट रचतो.पण त्याला हे समजते की तो स्वता हे काम करू शकत नही मग तो त्याची एक दुसरी मैत्रीणीची या कामासाठी मदत घेतो.

See also  वर्षातील सर्वात मोठया दिवसा विषयी माहिती - Longest day of year information in Marathi

आता ही आकाशची ही चोरी कितपत यशस्वी ठरते हे पाहण्यासाठी आपणास हे वेबसीरीज स्वता जाऊन पाहावी लागेल.

14) पांडु –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.आय एम डी बी वर ह्या वेबसीरीजला ८.८ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ही वेबसीरीज आपण एम एक्स प्लेअर वर जाऊन पाहु शकतो.

ह्या वेबसीरीजचे लेखन नोएल काँर्डेरा यांनी केले आहे अणि दिग्दर्शन सारंग साठे अणि अनुषा नंदकुमारने केले आहे.

यात आपणास कलाकाराच्या रूपात प्राजक्ता सालबर्डे,तृप्ती खामकर,दिपक शिर्के,सुहास शिरसाठ,सोमनाथ लिंबरकर हे दिसुन येतात.

ही मुंबई पोलिसांच्या लाईफस्टाईल तसेच प्रोफेशनवर आधारीत वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजमध्ये आपणास वेगवेगळया प्रकारचे पोलिस पाहायला मिळतात.ज्यात कोणी प्रामाणिक असते तर कोणी भ्रष्टाचारी.

वेब सीरीजच्या सुरूवातीला आपणास पांडु नावाचा एक प्रामाणिक पोलिस पाहायला मिळतो.जो त्या भ्रष्ट पोलिसांचा खरा चेहरा लोकांना दाखवण्याचे ठरवतो अणि तसा प्रयत्न देखील करतो.

15) बुमरँग –

ही एक हाँरर अणि ड्रामा वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण युटयुबवर बघु शकतो.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक कृणाल राणे आहेत अणि कलाकार सीमा कुलकर्णी,सुयश टिळक हे आहेत.

यात आपणास श्रीकांत नावाचा शिक्षक पाहायला मिळतो ज्याला आपल्या शाळेच्या भुतकाळाविषयी माहीती प्राप्त होते.

16) योलो –

ही एक ड्रामा वेबसीरीज आहे.ही वेब सीरीज आपण सोनी लिव्हवर जाऊन बघु शकतो.

ह्या वेब सीरीज मध्ये चार प्रौढ व्यक्तींची लाईफस्टाईल आपणास पाहायला मिळते.जे स्वताचा शोध घेण्याकरीता विपुल घटनांना प्रसंगांना जगत असतात.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक समीर विदवंस हे आहेत.ह्या वेबसीरीजच्या कलाकारांमध्ये आपणास नागेश भोसले,शिवराज जायफळ,आनंद इंगळे,त्रतुजा शिंदे इत्यादी जण दिसुन येतात.

17) वन्स अ इअर –

ही एक रोमँण्टिक वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजला आतापर्यत ८.७ इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.

ही वेबसीरीज आपण एम एक्स प्लेअर वर जाऊन बघु शकतो.ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक मंदार कुरूंदकर यांनी केले आहे.ह्या वेब सीरीजचे लेखक गौरव पतकी हे आहेत.

या वेबसीरीज मध्ये कलाकारांमध्ये आपणास पल्ववी परांजपे,निपुन धर्माधिकारी,मृण्मयी गोडबोले हे दिसुन येतात.

ह्या वेबसीरीजच्या कथानकात आपणास एक जोडपे पाहायला मिळते.जे सहा ते सात वर्षापासुन रिलेशनशिपमध्ये असते.लग्न करण्याची अजुन योग्य वेळ नाही असे या दोघांचे मत असते.

हे जोडपे आपल्या काँलेजच्या दिवसांपासुन डेटिंगवर जाऊ लागते.

18) बँग बँग –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ह्या वेबसीरीजला आतापर्यत आय एम डी बी वर ८.२ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.ही वेबसीरीज आपण युटयुबवर जाऊन बघु शकतो.

यात आपणास एका प्रौढ व्यक्तीची कथा पाहायला मिळते.जो आपले नाते सुरू ठेवण्यासाठी आपल्या आजुबाजुच्या जिवलग मित्रांचा सल्ला प्राप्त करत असतो.

ह्या वेबसीरीजचे लेखन अणि दिग्दर्शन कृणाल राणे यांनी केले आहे.

यात कलाकारांमध्ये आपणास अक्षय केळकर,अशोक ढगे,सिदधेश नागवेकर हे दिसुन येतात.

19) स्त्रीलिंग पुलिंग –

ही एक ड्रामा तसेच काँमेडी वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण युटयुबवर पाहु शकतो.

ह्या वेबसीरीजला आय एम डी बी वर ७.५ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.

ह्या वेबसीरीजचे कथानक तीन बेस्ट फ्रेंड मुलींच्या भोवती फिरताना दिसते.जे वेगवेगळया बँकग्राऊंडचे आहेत.हे तिघेही आपापला मिस्टर परफेक्ट शोधत असतात.

पण एक अनपेक्षित घटना घडते ज्यामुळे त्यांचे पुर्ण आयुष्य बदलून जात असते.ही घटना काय आहे जिच्यामुळे यांचे आयुष्य अचानक बदलुन जाते हे पाहायला आपणास ही वेबसीरीज स्वता युटयुबवर जाऊन पाहावी लागेल.

ह्या वेबसीरीजचे दिग्दर्शक समीर पाटील आहेत.अणि लेखक व्हीजे शलाका अणि निखिल खजिंदर आहे.

ह्या वेबसीरीजच्या कलाकारांमध्ये आपणास जनार्दन जाधव,निखिल चव्हाण,नीरज गोस्वामी हे दिसून येतात.

20) भुताटलेला –

ही एक हा़ँरर तसेच काँमेडी वेबसीरीज आहे.ह्या वेब सीरीजला आय एम डी बी वर ६.५ इतकी रेटिंग प्राप्त झाली आहे.

ही वेब सीरीज आपण एम एक्स प्लेअर वर जाऊन बघु शकतो.

ह्या वेबसीरीज मध्ये सुरूवातीला आपणास एक रिबिया नावाचे पात्र दिसुन येते.जिला असे जाणवते की कोणीतरी तिच्या मागे उभे आहे.

21) स्ट्रगलर साला –

ही एक काँमेडी वेबसीरीज आहे.ही वेबसीरीज आपण युटयुब वर जाऊन पाहु शकतो.

ही वेबसीरीज दोन महत्वाकांक्षी अँक्टर्सच्या चित्रपट सृष्टीत प्रवेश करण्याच्या संघर्षावर आधारीत आहे.ह्या वेबसीरीजचे लेखन अणि दिग्दर्शन विजू माने यांनी केले आहे.

ह्या वेबसीरीज मध्ये आपणास कलाकारांच्या रूपात महेश मांजरेकर,कुशाल बद्रिके,संतोष जुवेकर,अभिजित चव्हाण हे दिसुन येतात.