आपला Android फोन सुरक्षित कसा ठेवावा ? Best mobile security tips in Marathi

Best mobile security tips in Marathi

Table of Contents

आपला Android फोन सुरक्षित कसा ठेवावा ? Best mobile security tips in Marathi

आपण सर्व आज स्मार्टफोनवर  खूप अवलंबून आहोत , अगदी एकाद दुकान शोधण्या पासून तर एकाद ई बुक किंवा गुगल मिटिंग्स ते घरी बसून काम करणे WFH हे सर्व स्मार्टफोन मुळेच शक्य आहे.

स्मार्टफोन च इतका वारेमाप युज होत असताना आपण असंख्य वेबसाईट्स आणि ऐप्स च्या संपर्कात येत असतो, नवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो.

ह्या व्यापात आपण सर्वात म्हत्वाची बाब म्हणजे आपला स्मार्टफोन secure आहे का ?सुरक्षित आहे का?  की  नकळत एकाद्या malicious साइट्स वरून  काही वायरस फाईल डाउनलोड झालेली आहे , आणि आपल दुर्लक्ष होतय ?

खलील काही साध्या स्टेप्स आपण चेक केल्यात तर तात्काळ आपल्याला  आपल्या फोन ची सुरक्षितता  तपास ता येईल.

 Android ची ऑपरेट सिस्टम मुळातच आपल्याला हवे तसे बदल करतायेण्या जोगी आहे आणि त्यामुळेच आपल्या फोन वर व्हायरसचे आणि मालवेयर अटॅक चे प्रमाण वाढत जाते , अटॅक होण म्हणजे काय तर आपल्या मोबाइल मधून नेट बँकिंग करत असाल तर आपला आयडी , पासवर्ड चोरने , वैक्तीक माहिती चोरने .नको ते खोटे फसवे मेसेजेस पाठवणे ह्या सारखं आपल  नुकसान होवू शकत.

आपला स्मार्टफोन मध्ये काही नकली, बनावट फाइल्स किंवा व्हायरसचे आणि मालवेयर आहेस का चेक करण्यासाठी

  • सर्वात प्रथम पहा की फोन नेहमीसारखा चालतो का ? की का
  • ही साइट्स आपओप ओपेन होतात ?
  • मधेच काही जाहिराती दिसतात ,
  • स्लो चालतो ?
See also  गूगल बार्ड - गृहिनींपासून तर विद्यार्थी ,नोकरदार सर्वां करता एक वरदानच! WHAT IS GOOGLE BARD

आपल्याला प्रश्न पडला की माझा फोन मालवेयरने संक्रमित झाला आहे का ?  हे शोधण्यासाठी खाली दिलेल्या कृती करून पहा

आपला इंटरनेट वापर किती आहे ?

सोप ,हे जे वायरस किंवा मालवेयरल असतात त्यांना आपल्या फोन मध्ये आपला डेटा किंवा गोपिणीय माहिती चोरण्याकरता मोठ्या प्रमाणवर इंटरनेटची गरज पडते, आपण आपल्या फोन मधील सेटिंग मध्ये जावून डेटा युसेज असते त्यावर क्लिक करून सर्व ऐप्स चेक करा की कुठला अप्स नेहमीपेक्षा जास्त नेट च वापर करत आहेत कारण ह्या फसव्या ऐप्स ना काम करण्या करता नेट खूप जास्त लागत असते. सहसा सर्व ऐप्स मध्ये डेटा युसेज चेक करता येतो, नसेल तर आपण ग्लासवेअर सारखं ऐप्स वापरू शकता.

काही फसवे आणि संशयास्पद ऐप्स

वर म्हटल्या प्रमणे काही फसवे , बनावटी ऐप्स वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी तयार केले जातात आणि फक्त इंटरनेट च युज किती झाला ह्या वरुन लक्ष्यात येत नाही अश्या वेळी आपण आपल्याला हवे ते ऐप्स  डवूनलोड करत असताना चुकून एकाद असले फसवे ऐप्स डवूनलोड केल का ते चेक करा , त्या करता ऐप्स लिस्ट मध्ये जावून एक एक करून सर्व ऐप्स चेक करा व एकाद संशयास्पद ऐप्स  दिसत असेल तर त्याला अनइंस्टॉल करा व त्याला काही आपण परमीशेन दिलेल्या असतात त्या काढून टाका.

फोन च विचित्र वागणं

  • लक्षात घ्या फोन मध्ये एकदा व्हायरस आणि मालवेयर ऐप्स बस्तान मंडल की आपला फोन विचित्र वागू लागतो , कारण फसवे ऐप्स आपले काम सुरू करतात आणि फोन व्यवस्थित रित्या चलन बंद होतो ,आपल्याला संशय तर येतो पण नक्की काय होतय लक्षात येत नाही , कळत नाही ? त्या करता खाली बाबी दिसतात का बघा ?
  • आपण पाहत असाल की कुणाचा नवीन मेसेज किंवा फोन आला तर मोबाइल आधी उजेडतो किंवा स्क्रीन वर प्रकाश येतो तर चेक करा की कुणाचा मेसेज किंवा कॉल नसतनही  स्क्रीन वर प्रकाश पडतोय किंवा फोन उजेडतोय का?
  • आपण वापरत असतानाच अचानक काही कारण नसताना आपोआप फोन रीस्टार्ट होतोय का ?
  • न समजणार्‍या भाषेत SMS उदा – !@#@!adafnbj255 येत आहेत का ?
  • फोन स्लो आहे का ?
  • फोन पूर्ण रीचार्ज असताना ही बॅटरी जलदरीत्या कमी होतेय का ? फोन खूपच गरम होतोय का कारण हे व्हायरस आणि मालवेयर बाधित अप्स खूप मोठ्या प्रमाणावर फोन मेमरी वापरतात
See also  हॉटस्पॉट म्हणजे काय ? Hotspot information Marathi

वरील पैकी काही कारण दिसत असतील तर आपल्या फोन मध्ये व्हायरस आणि मालवेयर बाधित ऐप्स असेल ह्याची शक्यता वाढते तरीही थोडा अधिक अभ्यास करून व एकाद्या फोन मधील निष्णात व्यक्ति कडून खात्री करून घ्यावी॰

ऐप्स दिलेल्या परवानगी ?

  • आपण पहिलं असेल की कुठल्ही ऐप्स आपण डावूनलोड केली की काम सुरू करण्या पूर्वी ते आपल्याला परवानगी मागत , जसे स्टोअर , फोन , लोकेशन वगरे.
  • ह्यात आपला थोडा वेळ जास्त जाईल पण हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की आपला फोन व्हायरस आणि मालवेयर बाधित आहे की समजणयसाठी ?
  • उदाहरण – आपण एकाद डॉक्युमेंट स्कॅन ऐप्स डाउनलोड केल तर त्या ऐप्स ल कॉल, SMS किंवा लोकेशन परमिशन कश्याला हवी? , फक्त स्टोरेज आणि फोन पुरेसं आहे.  तर हे नक्की पहा की ऐप्स गरज नसताना अश्या परवानगी मागत आहेत का ?
  • मग चेक करा की असे की ऐप्स आहेत ज्यांना आपण गरज नसताना अश्या परवानगी दिलेल्या आहेत. आवश्यक नसेल तिथून त्या काढून घ्या॰ ,
  • त्या करता खाली फोटो दिलेत तसे तिथ जावून एक एक ऐप्स चेक करा , आणि आवश्यक त्याच परवानगी द्या.
  • आपण जर संशयस्पद ऐप्स ल परवानगी नाकारलीत तर आपला फोन बराच सुरक्षित झालेला असतो , त्यामुळे ह्या सेटिंग्स नक्की करा.

आपण नेमक कुठल्या परवानगी दिल्या पाहिजेत किंवा नाकारल्या पाहिजेत

  • अड्मिन : ही परमिशन तर कुठल्या ही अप्स ल देवू नये , ह्या द्वारे ते ऐप्स आपला संपूर्ण मोबाइल हाताळू शकतो.
  • संदेश SMS : आणि कॉल – फसवे ऐप्स स्पॅम कॉल किंवा स्पॅम संदेश पाठवून आपल्याला आर्थिक अडचणीत आणू शकतात
  • इंटरनेट: – आपले गोपनीय पासवर्ड किंवा आयडी हकर्स ल पाठवू शकतात
  • काही अनोळखी ऐप्स चुकून डावून लोड झालेली आहेत का ?

ह्या व्यतरिक्त

  • वेळोवेळी जावून आपली इंटरनेट हिस्ट्री डिलिट करा
  • एकद् सक्षम mobile anti virus  मोबाइल अॅंटी व्हायरस ऐप्स इंस्टॉल करा
  • (Kaspersky free antivirus  ,BullGuard’s free antivirus  ,McAfee’s free antivirus app  ,Avira Antivirus Security ,Android Bitdefender तसेच Norton Mobile Security. किंवा Avast  Android antivirus apps )
  • अश्या लहान पण म्हत्वाच्या स्टेप्स घेवून आपण  आपला फोन सुरक्षित ठेवू शकता व संभाव्य नुकसान पासून स्वत:चा सरक्षण करू शकता
See also  5 जी तंत्रज्ञान -5G information in marathi -5 जी म्हणजे काय

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग