Top10 वर्डप्रेस थीम्स  -Best WordPress theme for your websites

Top 10 वर्डप्रेस थीम्स  –Best WordPress theme for your websites

 आज ब्लाँगिंगच्या क्षेत्रात काम करत असलेल्या प्रत्येक ब्लाँगरला आपल्या वेबसाईटचा फंट,लेआऊट तसेच डिझाईन बदलण्यासाठी तसेच आपल्याला हवा त्या फाँरमँटमध्ये सेट करण्यासाठी वर्ड प्रेस थीमची आवश्यकता पडत असते.

वर्ड प्रेस थीमचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.वर्ड प्रेस थीमचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटची डिझाईन चेंज करू शकतो.तसेच तिचा लेआऊट आपल्याला हवा तसा सेट करून त्याला कस्टमाईज देखील करू शकतो.

वर्ड प्रेस थीम ह्या दोन प्रकारच्या असतात ज्यात काही वर्ड प्रेस थीम ह्या आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध होत असतात.आणि काही वर्ड प्रेस थीमसाठी आपल्याला मंथली किंवा ईयरली चार्ज द्यावा लागत असतो.कारण त्या पेड असतात.

आजच्या लेखातुन आपण अशा टाँप 10 वर्डप्रेस थीमविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.ज्या आपल्यासाठी फ्री मध्ये उपलब्ध आहेत.तसेच काहींवर पेड सबस्क्रीप्शन चार्ज देखील घेतले जातात.

Word Press Theme कशाला म्हणतात?

 वर्ड प्रेस थीम ही एक फ्रेमवर्क असते जी आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटसाठी वापरत असतो.

 • वर्ड प्रेस थीमद्वारे आपल्याला आपल्या ब्लाँगचे व्हीज्युलाईझजेशन चेंज करता येत असते.
 • वर्ड प्रेस थीमचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटवर आपल्याला हवे ते चेजेंस करू शकतो.आणि आपल्या ब्लाँग वेबसाईटला पाहिजे तशा पदधतीने प्रोफेशनली सेट करता येते.
 • याने युझर्सला देखील आपला ब्लाँग प्रोफेशनल दिसत असतो आणि ते पुन्हा आपल्या ब्लाँग वेबसाईटवर व्हिझिट देत असतात.
 • याने आपल्या ब्लाँगवर रिडर्स एंगेज होत असतात आणि आपल्या ब्लाँगवरची ट्रँफिक देखील वाढण्यास मदत होत असते.

कोणत्याही वर्ड प्रेस थीम मध्ये कोणते फिचर असावे लागतात?

 कोणत्याही वर्ड प्रेस थीम मध्ये पुढील फिचर असणे खुप महत्वाचे मानले जाते.

 • आपण जी वर्ड प्रेस थीम वापरतो आहे ती दिसायला एकदम साधी असायला हवी.आणि वापरायला देखील ती सोपी असणे गरजेचे असते.
 • आपण जी वर्ड प्रेस थीम वापरतो आहे ती Browser Supportive वर्ड प्रेस थीम असणे देखील खुप गरजेचे असते.
 • आपण जी वर्ड प्रेस थीम वापरतो आहे ती सर्व प्रकारच्या प्लग इनला व्यवस्थित सपोर्ट करते आहे का नाही हे देखील आपण एकदा बघुन घ्यायला हवे.
 • आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी थीम वापरतो आहे ती ब्लाँगसाठी वापरतो आहे त्यामुळे ती एससीओला देखील सपोर्ट करणारी म्हणजेच SEO Friendly असायला हवी.
 • आणि त्यात हेल्प आँप्शन दिलेले असेल तर खुप उत्तम कारण याने आपण हेल्प मध्ये जाऊन आपल्याला थीम वापरत असताना जर काही समस्या उदभवत असेल तर हेल्प आँप्शनचा वापर करून आपण ती समस्या सोडवु शकतो.

आपल्याला वर्ड प्रेस थीम वापरल्याने कोणकोणते फायदे होतात?

 वर्ड प्रेस थीम वापरल्याने आपल्याला अनेक लाभ प्राप्त होत असतात आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

 • ब्लाँग वेबसाईटची डिझाईन चेंज करता येते.
 • आपल्या ब्लाँगला पाहिजे तसे कस्टमाईज करता येते.
 • ब्लाँग तसेच वेबसाईटचा फंट चेंज करता येत असतो.
 • ब्लाँग वेबसाईटचा लेआऊट म्हणजे आकार पाहिजे तसा सेट करता येतो.
 • आणि ब्लाँग प्रोफेशनल दिसत असल्यामुळे आपल्या ब्लाँगवरील User Engagement आणि Traffic देखील वाढत असते.

2021मधील टाँप 10 वर्डप्रेस थीम कोणकोणत्या आहेत?

आज वर्डप्रेस मध्ये अशा अनेक थीम उपलब्ध आहेत ज्या उत्तम दर्जाच्या थीम म्हणुन परिचित आहे.ज्यांचा वापर आपण फ्री मध्ये तर करूच शकतो तसेच आपण त्या पेड सबस्रकाईब करून देखील वापरू शकतो.

चला तर मग जाणुन घेऊया 2021मधील टाँप वर्ड प्रेस थीम कोणकोणत्या आहेत आणि त्यांची नावे काय आहेत.

2021 मधील टाँप टेन वर्ड प्रेस थीम पुढीलप्रमाणे आहेत :

1)News Paper

2) Astra

3) Writee

4) Divi

5) Ultra

6) Generate Press

7) Avada

8) Ocean Wp

9) Colour Mag

10) Total

1)News Paper :

न्युज पेपर ह्या वर्ड प्रेस थीमच्या नावावरूनच तिचा वापर कशासाठी होतो हे आपणास अंदाजे कळुन जात असते.

न्युज पेपर थीमचा वापर न्युज वर काम करत असलेल्या न्युज चँनल ब्लाँगसाठी वापरली जात असते.याचसोबत ही थीम विविध मँगझिन तसेच पर्सनल ब्लाँगमध्ये देखील वापरली जात असते.

2) Astra :

अँस्ट्रा ही वर्ड प्रेस थीम एक बेस्ट वर्ड प्रेस थीम आहे जी आपण फ्री मध्ये देखील वापरू शकतो तसेच तिला प्रिमियम सबस्क्राईब करून पेड देखील घेऊ शकतो.

ही वर्ड प्रेस थीम अशा ब्लाँग वेबसाईटसाठी प्रामुख्याने वापरली जात असते जो ब्लाँग ईकाँमर्ससाठी,मँगझिनसाठी,आँनलाईन एखादे स्टोअर तयार करण्यासाठी बनवला जात आहे.

याचसोबत ही वर्ड प्रेस थीम पर्सनल तसेच प्रोफेशनल ब्लाँगसाठी देखील वापरण्यात येते.

यात काही अँडव्हान्स फिचर देखील उपलब्ध असतात ज्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला काही प्रिमियम चार्ज द्यावा लागतो.

3) Writee :

राईट ही एक फ्री मध्ये उपलब्ध असलेली बेस्ट वर्ड प्रेस थीम आहे.जी फँशन,ट्रँव्हल तसेच फुडसंबंधित तयार केलेल्या ब्लाँगसाठी मुख्यकरून वापरली जात असते.

ह्या थीमचे सगळयात महत्वाचे वैशिष्टय हे आहे की ही थीम एससीओ फ्रेंडली तसेच मोबाईल फ्रेंडली थीम आहे.

4)  Divi :

डिव्ही ही टाँप टेन वर्ड प्रेस थीममधील एक बेस्ट थीम आहे कारण ही थीम आपण कोणत्याही ब्लाँग तसेच वेबसाईटसाठी वापरू शकतो.

एवढेच नाही तर ह्या थीमचा वापर करून आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटला एखाद्या प्रोफेशनल ब्लाँग प्रमाणे बनवू शकतो.

आणि डिव्ही ह्या वर्ड प्रेस थीममध्ये जे लेआऊट आपल्याला डीव्हीकडुन दिले जातात ते आपण कधीही चेंज देखील करू शकतो.

5) Ultra :

अल्ट्रा ही सुदधा एक बेस्ट वर्ड प्रेस थीम आहे जी आपण कोणत्याही ब्लाँगसाठी वापरू शकतो.

याचसोबत अल्ट्रा ह्या वर्ड प्रेस थीममध्ये मल्टीपल फिचर उपलब्ध आहेत.म्हणजे यात मल्टीपल कलर तसेच लेआऊट दिलेले असतात.जे आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटसाठी वापरू शकतो.

ही थीम असे ब्लाँगर वापरू शकतात ज्यांनी नवीनच ब्लाँग सुरू केलेला आहे कारण ह्या थीमचा वापर करून नवीन ब्लाँगर सहज आणि सोप्या पदधतीने आपल्या ब्लाँगचा सेट अप करू शकतात.

6) Generate Press :

जनरेट प्रेस ही एक मोबाईलला सपोर्ट करणारी म्हणजेच मोबाईल फ्रेंडली वर्ड प्रेस थीम आहे.

ह्या थीमचे सगळयात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे ही थीम वेबसाईट स्पीड आणि एससीओ या दोघांच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली वर्ड प्रेस थीम आहे.

ही थीम आपण फ्री मध्ये तसेच पेड देखील वापरू शकतो.पण ही थीम जर आपण फ्री मध्ये घेतली तर आपल्याला पेडमध्ये जे मल्टीपल फिचर वापरायला मिळत असतात तेवढे फ्रीमध्ये वापरायला मिळत नसतात.म्हणजेच फ्री मध्ये मर्यादित फिचरचाच वापर आपल्याला करता येतो.

7) Avada :

अवाडा ह्या वर्ड प्रेस थीमला एक मल्टीपर्पज थीम म्हणुन ओळखले जाते.

अवाडा ही वर्ड प्रेस थीम आपण ब्लाँग वेबसाईटसाठी तसेच आँनलाईन ईकाँमर्स स्टोअर तयार करण्यासाठी देखील वापरू शकतो.

ह्या थीममध्ये आपल्यावा विविध फिचर पाहावयास मिळतात.जसे की ही थीम मोबाईल फ्रेंडली आणि एससीओ फ्रेंडली देखील आहे.तसेच ह्या थीममध्ये आपल्यासाठी अनलिमिटेड डिझाईन देखील दिलेल्या असतात.

8) Ocean Wp :

 ओसीन ड्ब्लयुपी ही सुदधा एक बेस्ट वर्ड प्रेस थीम आहे.ओसीन डब्लयुपी ही टाँप टेन वर्ड प्रेस थीम मधील एक बेस्ट आणि More Responsive वर्ड प्रेस थीम म्हणुन ओळखली जाते.

म्हणुनच सर्वाकडुन ह्या थीमचा जास्तीत जास्त वापर केला जाताना आपणास दिसुन येतो.

ही थीम आत्तापर्यत किमान 900000 जणांनी इंस्टाँल केलेली आहे.कारण ही थीम सर्व ब्लाँग वेबसाईटसाठी फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ह्या थीमचा वापर करून आपण ईकाँमर्स,न्युज,मँगझिन

इत्यादी कोणतीही वेबसाईट सहज आणि सोप्या पदधतीने तयार करू शकतो.

9) Colour Mag :

कलर मँग ही एक वापरण्यासाठी सोप्पी आणि आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध होत असलेली बेस्ट वर्ड प्रेस थीम आहे.

ह्या थीमचा वापर आपण कोणत्याही वेबसाईटसाठी आपल्याला करता येत असतो.आणि यात आपण आपल्याला पाहिजे तसे विविध पदधतीचे लेआऊट देखील तयार करता येतात.

ह्या थीमचे फ्री आणि पेड असे दोन व्हरझन उपलब्ध आहेत.फ्री मध्ये मर्यादित फिचरचा समावेश करण्यात आला आहे.आणि पेडमध्ये घेतली तर जास्तीत जास्त फिचरचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो.

10) Total Theme :

टोटल ह्या थीमचा वापर करून आपण अनेक प्रकारच्या ब्लाँग वेबसाईटसाठी करू शकतो.

ह्या थीममध्ये आपल्याला अनेक फिचर असलेले पाहायला मिळते.ह्या थीममधील डिझाईन ह्या रिस्पाँन्सिव्ह आहेत.यात अँडव्हान्स थीम पँनल देखील आहे.

Leave a Comment