बायोमेट्रिक अटेंडेंस मशीन म्हणजे काय ? उपयोग आणि फायदे – Biometric attendance machine Marathi information

Biometric attendance machine म्हणजे काय ? उपयोग आणि फायदे – Biometric attendance machine Marathi information

बायोमँट्रिक अटेंडंस हे एक हजरी घेण्यासाठी वापरले जाणारे मशिन आहे.ज्याचा वापर कुठल्याही सरकारी कार्यालयात,कंपनीत कर्मचारींची अटेंडंस घेण्यासाठी,शाळा काँलेजात शिक्षक आणि विदयार्थ्यांची अटेंडंस घेण्यासाठी इत्यादी कारणासाठी प्रामुख्याने केला जात असतो.

बायोमँट्रिक अटेंडंस मशिन हे प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीची ओळख पटण्यासाठी वापरले जात असते.

यात आपल्या दोन्ही हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात,हाताचे मोजमाप केले जाते.तसेच व्हाँईस पँटर्न,फेस रिकोगनाइझेशन अशा विविध पदधतीने बायोमँट्रीक अटेंडंस ही घेतली जात असते.

आजच्या लेखात आपण ह्याच बायोमँट्रीक अटेंडंस मशिनविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

 बायोमँट्रिक अटेंडंस मशिन म्हणजे काय?

बायोमँट्रीक अटेंडंस मशिन हे एक असे यंत्र असते ज्याचा वापर विविध सरकारी कार्यालयात,शाळा काँलेजात शिक्षकांची,विदयार्थ्यांची अटेंडंस घेण्यासाठी केला जात असतो.

बायोमँट्रीक अटेंडंस मशिनवर आपली ओळख सिदध करण्यासाठी आपल्याला आपल्या दोघे हाताच्या बोटांचे ठसे द्यावे लागत असतात.

यात आपण व्हाईस रिकाँगनाइझेशन,फेस रिकाँगनाइझेशन ह्याचा वापर देखील आयडेंटीफिकेशन प्रुफ तसेच व्हेरीफिकेशनसाठी साठी करत असतो.

अँड्राईड मोबाईल मध्ये युझर आयडेंटीकेशन साठी फेस रिकोगनाइझेशन,व्हाँईस रिकाँगनाइझेशन इत्यादी फंक्शन फिचर्स दिलेले असतात.हे देखील बायोमँट्रीक अटेंडंसचाच एक प्रकार आहे.

 

बायोमँट्रीक्सचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- बायोमँट्रीक्स मशिनचे पुढीलप्रमाणे विविध प्रकार पडतात:

 1) फिंगर स्कँनर :

2) हँण्ड स्कँनर :

3) फेस स्कँनर :

4) ईरिस स्कँनर :

5) व्हाँईस स्कँनर :

 6) डिजीटल साईन :

 

1)फिंगर स्कँनर :

ह्या प्रकारात आपली ओळख पटण्यासाठी आपल्या दोन्ही बोटाचे ठसे घेतले जात असतात.

2) हँण्ड स्कँनर :

ह्या प्रकारात ओळख पटवण्यासाठी हँण्ड स्कनिंग केले जात असते.

3) फेस स्कँनर :

ह्या प्रकारात ओळख पटण्यासाठी चेहरा स्कँन केला जात असतो.

4) ईरिस स्कँनर :

ह्या प्रकारात ओळख पटण्यासाठी डोळे स्कँन केले जात असतात.

5) व्हाँईस स्कँनर :

ह्या प्रकारात ओळख पटण्यासाठी आपला आवाज स्कँन केला जात असतो.

6) डिजीटल साईन :

ह्या प्रकारात ओळख पटण्यासाठी डिजिटल सिग्नेचर घेतले जात असते.इत्यादी.

बायोमँट्रीक्स अटेंडंस मशिन कशा पदधतीने काम करत असते?

बायोमँट्रीक्स मशिन कोणत्याही व्यक्तीचे फिंगरप्रिंट स्कँन करत असते.आणि सुरूवातीपासुन एण्ड पाँईटपर्यत पुर्ण फिंगरप्रिंट मँच होते आहे का नाही हे चेक करण्याचे काम करत असते.

यात जोपर्यत आपला म्हणजेच एखाद्या कर्मचारीचा डेटा सिस्टमध्ये प्रविष्ठ केला जात नाही.तोपर्यत आपण लाँग ईन करून लाँग आऊट करू शकत नसतो.

आणि मग जेव्हा आपला डेटा सिस्टममध्ये इंटर केला जातो तेव्हा मग आपण त्यात लाँग इन करण्यासाठी,आयडेंटीफिकेशन व्हेरीफाय करण्यासाठी आपला इम्पलाँई आयडी टाकुन नंबर अटेंडंस देण्यासाठी बायोमँट्रीक्सचा वापर करू शकतो.

 बायोमँट्रीक अटेंडंस मशिन वापरण्याचे कारण काय?

1) पेपर वर घेतल्या जात असलेल्या हजरीपासुन मुक्ती मिळविण्यासाठी :

2) एकदम अँक्युरेट ट्रँकिंग करण्यासाठी :

3) वेळेची बचत करण्यासाठी :

4) चांगली सिक्युरीटी प्राप्त होण्यासाठी :

5) पैशांची बचत होते :

  

1)पेपर वर घेतल्या जात असलेल्या हजेरीपासुन मुक्ती मिळविण्यासाठी :

सगळयात पहिले कोणत्याही शासकीय कार्यालयात,कंपनीत,शाळा,महाविद्यालयात अटेंडंस घेण्यासाठी एक फाईल केली जायची.

 ज्यात सर्व वर्गातील विदयार्थी मध्ये किती विदयार्थी हजर आहेत आणि किती विदयार्थी गैरहजर आहेत याची नोंद केली जायची आणि मग कागदावर हजर विदयार्थ्यांची एक सही घेतली जायची ज्यात खुप वेळही जायचा आणि खरे म्हणजे यात कोणीही कोणाची डुप्लीकेट सही करुन टाकत असे.आणि गणना करण्यात चुक देखील होऊन जात असे.

 आणि हा प्रकार फक्त शाळा,काँलेजातच नव्हे तर मोठमोठया कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये,कार्यालयामध्ये देखील होऊ लागला म्हणुन मग अधिक सुरक्षेसाठी डिजीटल अटेंडंसची सुरूवात करण्यात आली.

 म्हणुन मग आज डिजीटल पदधतीने अटेंडंस घेणे सुरू झाले आहे ज्यात कोणीही कोणाची डुप्लीकेट अटेंडंस देऊ शकत नाही.कारण यात पुर्ण व्हेरीफिकेशन केले जात असते.शिवाय पेपर लेस अटेंडंस घेतली जाते.

 

2) एकदम अँक्युरेट ट्रँकिंग करण्यासाठी :

मानवकृत जी व्हेरीफिकेशन अटेंडंस घेतली जाते त्यात काही ना काही व्हेरीफिकेशन प्रोसेस मध्ये त्रूटी राहुन जात असते.म्हणजेच आपल्याकडून एकदम अँक्युरेट ट्रँकिंग केली जात नव्हती.

 म्हणुन मग ही त्रुटी भरून काढण्यासाठी बायोमँट्रीक अटेंडेंसची सुरूवात करण्यात आली.ज्यात कर्मचारींचे अँक्युरेट व्हेरीफिकेशन केले जाते.तसेच त्यांची 100 टक्के अँक्युरेट अटेंडेंस देखील घेतली जात असते.

 

3) वेळेची बचत करण्यासाठी :

वेळेची बचत करणे हे देखील एक प्रमुख कारण आहे बायोमँट्रिक अटेंडंसचे.कारण आधी अटेंडेंस घेण्यासाठी पेपर पदधतीचा वापर केला जायचा ज्यात खुप वेळेचा अपव्यय व्हायचा.

 आणि हाच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी बायोमँट्रीक पदधतीने अटेंडेंस घेण्यास सुरूवात होऊ लागली.यात झटक्यात अटेंडेंस घेतली जात असल्यामुळे लिखापट करण्यात जो वेळ वाया जायचा त्याची बचत होऊ लागली.आणि यात आपण कोणत्याही कर्मचारीचा अटेंडेंस रिपोर्ट काढुन तो पाहु देखील शकतो.

 म्हणूनच जागोजागी वेळेची बचत करण्यासाठी बायोमँट्रीक पदधतीचा वापर कर्मचारींची अटेंडंस घेण्यासाठी अधिक करण्यात येत आहे.

 

4) चांगली सिक्युरीटी प्राप्त होण्यासाठी :

बायोमँट्रिक्स सिस्टम ही एक उत्कृष्ठ सिस्टम आहे कारण यात आपला डेटा एकदम सेफ राहत असतो.त्याची कुठलीही चोरी होण्याची भीती यात आपल्याला नसते.

 कारण बायोमँट्रिक्स मँच झाल्याशिवाय सिस्टममध्ये कोणीही बाहेरची व्यक्ती इंटर करू शकत नाही.म्हणजेच यात आपल्या डेटा तसेच सिस्टिमला एक्सट्रा सिक्युरीटी प्राप्त होत असते.

 5) पैशांची देखील बचत होते :

ही एका वेळे केलेली योग्य अशी गुंतवणुक आहे ज्यामुळे आपल्या सिस्टमला लाईफ टाईम सिक्युरीटी प्राप्त होते,शिवाय आपल्या अमुल्य वेळेची बचत यात होते,अँक्युरेट ट्रकिंग करता येते याने आपल्या डेटाचे सिस्टमचे नुकसान होऊन जो लाँस आपल्याला होणार असतो तो वाचत असतो.  म्हणुन ही एक पैशांची एक योग्य बचत आहे.

 बायोमँट्रिक अटेंडंसचा वापर कुठे कुठे केला जातो?

 बायोमँट्रिक अटेंडंसचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.

 

  • मोठमोठया कंपन्या
  • शाळा
  • काँलेज
  • हाँस्पिटल
  • सरकारी कार्यालय
  • माँल्स
  • संस्था
  • हाँटेल
See also  इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी का घालण्यात आली आहे? why chat gpt banned in Italy

 इत्यादी ठिकाणी बायोमँट्रीक अटेंडंसचा वापर केला जात असतो.

 बायोमँट्रिक्स मशिनचे कोणकोणते फायदे असतात?

 बायोमँट्रिक्स मशिनचे अनेक फायदे असतात :

 

  • यात जो डेटा सेव्ह केला जातो तो कधीही चोरी होत नाही कारण यात आपल्या डेटाला एक्सट्रा आणि हाय लेवल सिक्युरीटी प्राप्त असते.
  • बायोमँट्रिक सेंसरद्वारे जे डिव्हाईड लाँक केले जाते ते कोणीही सिस्टम बाहेरची व्यक्ती ओपन करून त्यातला डेटा हँक करू शकत नसते.
  • बायोमँट्रिक्स मशिनमध्ये जो डेटा स्टोअर केलेला असतो तो कोणी काँपी देखील करू शकत नाही.हा देखील एक महत्वाचा फायदा बायोमँट्रीक मशिनचा असतो.

 बायोमँट्रिक्स मशिनची किंमत काय असते?

बायोमँट्रीक मशीनची फिक्स किंमत आपण सांगु शकत नाही कारण आपण कोणते ब्रँण्डची निवड करतो आहे त्याची कार्यक्षमता किती आहे यावरून त्याची किंमत ठरत असते.

 बायोमँट्रीक स्कँनरचा उपयोग कशासाठी केला जात असतो?

 1)प्रवेश करण्यासाठी :

2) हजेरी घेण्यासाठी :

3) आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी :

4) धान्य खरेदी करताना :

1)प्रवेश करण्यासाठी :

 एखाद्या अशा ठिकाणी जिथे फक्त काही विशेष व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असतो अशा ठिकाणी एंट्री परमिशन देण्याकरिता बायोमँट्रिक्स स्कँन केले जाते.

 2) हजेरी घेण्यासाठी :

शाळा,काँलेज आँफिस विविध कंपनींमध्ये कोण कोण हजर आहे?कोण गैरहजर आहे हे चेक करण्यासाठी बायोमँट्रिक्सचा वापर केला जात असतो.

 3) आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी :

जेव्हा आपण मोबाईलसाठी सिमकार्डची खरेदी करत असतो तेव्हा आपले आधार कार्ड आपलेच आहे का दुसरयाचे आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी बायोमँट्रिसचा वापर केला जातो.

 4) धान्य खरेदी करताना :

सरकारी धान्य दुकानातून जेव्हा आपण धान्य खरेदी करत असतो तेव्हा तिथे देखील आपले बायोमँट्रीक्स टेस्ट घेतली जाते.