Brahma Muhurta – ब्रम्हमुहुर्त म्हणजे काय? ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे फायदे  कोणते आहेत?

Brahma Muhurta

ब्रम्हमुहुर्त म्हणजे काय? ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे फायदे  कोणते आहेत?

आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रम्ह मुहुर्ताला खुप महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आतापर्यंतच्या सर्व धर्मग्रंथ वेद तसेच पुराणात देखील ब्रम्ह मुहुर्तावर उठणे किती फायदेशीर ठरते हे सांगितले गेले आहे.

याचसोबत अनेक साधु संत त्रषी मुनींकडुन देखील आपणास ब्रम्ह मुहुर्तावर उठणे किती फायदेशीर अणि महत्वाचे आहे हे नियमित ऐकायला मिळत असते.

साधु संत असे म्हणतात की जी व्यक्ती दररोज ब्रम्ह मुहुर्तावर उठते त्याला सौंदर्य,शक्ती ज्ञान आरोग्य अणि बुदधी इत्यादी अशा सर्व गोष्टी प्राप्त होत असतात.तसेच त्या व्यक्तीला दिवसभर आपले शरीर ऊर्जेने भरले असल्याचे जाणवते.

अणि अशी व्यक्ती जे काही कार्य करते त्यात त्याला भरघोस यश प्राप्त होत असते.

धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती ब्रम्ह मुहुर्तावर उठते आणि ईश्वराची आराधना करते तिची प्रार्थना थेट परमेश्वरापर्यत पोहचत असते.अणि त्या व्यक्तीला आपल्या पुजेचे फळ देखील लवकरात लवकर मिळत असते.

म्हणुन साधु संत ईश्वराचे ध्यान पुजा आराधना ह्या ब्रम्ह मुहुर्तावर करत असतात.प्राचीन काळात साधु संत त्रषी मुनी ह्याच वेळेला परमेश्वराच्या आराधनेची ध्यान करण्याची सर्वोत्तम वेळ मानायचे.

ब्रम्ह मुहुर्त म्हणजे काय? | Brahma Muhurta

Brahma Muhurta

ब्रम्ह मुहुर्त याला देवमुहुर्त असे म्हटले जाते.याचीच जर आपण शब्दश फोड केली तर ब्रम्हा म्हणजे ब्रम्हा म्हणजेच देव परमात्मा असा अर्थ होतो तर मुहुर्त म्हणजे वेळ अणि या दोघांचा मिळुन अर्थ होतो ब्रम्ह मुहुर्त म्हणजे देवाचा तसेच परमात्माचा मुहुर्त.

ब्रम्ह मुहुर्त हा रात्रीचा शेवटचा तास तसेच प्रहर असतो.म्हणजे यानंतर रात्र संपुष्टात येते अणि सकाळचा आरंभ होत असतो.म्हणजे ब्रम्ह मुहुर्त हा सुयोदयाच्या आधीचा काळ अणि रात्रीचा अखेरचा प्रहर असतो.

ब्रम्ह मुहुर्ताची वेळ कोणती असते?

पहाटे चार वाजेपासून सकाळचे साडेपाच वाजेपर्यंतचा कालावधी हा ब्रम्ह मुहुर्ताचा कालावधी असतो.यालाच ब्रम्ह मुहुर्ताची वेळ असे म्हटले जाते.

ब्रम्ह मुहुर्त हा ईश्वराचे ध्यान करण्याची पुजा आराधना करण्याची वेळ असते म्हणून ह्या वेळेला झोपणे हे निषिद्ध असते.

ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे महत्व तसेच फायदे कोणकोणते असतात?

अशी धार्मिक मान्यता आहे की ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात साक्षात परमेश्वर आपल्या घरी येत असतो.अणि आपण ह्या वेळेत झोपुन न राहता उठुन देवाचे ध्यान केले तर आपल्या घराची प्रगती होते.आपल्या रोजच्या कार्यात नोकरी व्यवसायात देखील आपणास यश लाभते.

ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे अजुन एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्व वातावरणामध्ये परीसरामध्ये सकारात्मक उर्जा पसरलेली असते.

अणि आपण ह्या वेळेत ऊठुन परमेश्वराचे ध्यान नामस्मरण केले तर आपल्या आजुबाजुला असलेली ही सर्व सकारात्मक उर्जा आपल्या शरीरामध्ये देखील प्रवेश करत असते.

याने आपल्या मनात कुठलेही नकारात्मक तसेच वाईट विचार येत नसतात.आपल्या मनात नेहमी चांगले अणि सकारात्मक विचार येतात.ब्रम्ह मुहुर्तावर केलेले ध्यान आत्म विश्लेषण हे ब्रम्ह ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी देखील सर्वोत्तम असते.

शेअर मार्केट २०२३ मधील सुटटयांची यादी | Share Market Holiday List 2023 In Marathi

ब्रम्ह मुहुर्त हा निसर्गात वातावरणात चैतन्य प्रफुल्लता निर्माण होण्याचा कालावधी असतो.यावेळेला सर्व पशु पक्षी प्राणी जागे होतात कोंबडा आरवत असतो.फुले बहरत असतात.

म्हणजेच हा एक प्रकारे निसर्गाने आपल्याला दिलेला संदेश असतो की आपल्या निद्रेतुन बाहेर पडा उठा आणि आपल्या रोजच्या नित्य नियमित कार्यास आरंभ करा.

ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात प्राणायाम केल्याने तसेच उजवी नाकपुडी चालु करून दिर्घश्वसन केल्याने रक्तशुद्धी होते.रक्तात आॅक्सिजन वाढल्याने हिमोग्लोबिन वाढतो अणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.अणि रोगांपासून आपला बचाव होतो.

ब्रम्ह मुहुर्तावर आपल्या डोळयावर सुर्याचा मंद प्रकाश पडत असतो याने आपली दृष्टी देखील चांगली राहते.

ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात पृथ्वी वर पंचतत्वापैकी वायु तत्व हे जास्त प्रमाणात वातावरणात असते.हा वायु वातावरणात असताना कोणाताही जोर न लावता मल बाहेर टाकला जातो.याने आपली पचनक्रिया चांगली राहते.मुळव्याध‌ पित्त वात असे आजार आपणास जडत नसतात.

मानवी शरीरातील मलनिस्सारण अपानवायु शरीरशुद्धी करण्याचे काम हा वायु करतो.

ब्रम्ह मुहुर्ताच्या कालावधीत आपल्या शरीरातील घाण नव इंद्रियादवारे बाहेर टाकली जाते.याने आपले आरोग्य चांगले राहते.

ब्रम्ह मुहुर्तावर अभ्यास केल्यास स्मरण शक्ती वाढते अणि आपल्या पाठांतरात देखील चांगली वाढ होते.कारण ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात मेंदुमधील स्मरण शक्ती विपुल प्रमाणात कार्यरत असते.

ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे इतर फायदे –

  1. जी व्यक्ती रोज ब्रम्ह मुहुर्तावर उठते तिच्या शरीरातील उर्जेमध्ये अधिक वाढ होते.दिवसभर शरीर अणि मनात एक आशा अणि उत्साह राहत असतो.
  2. जी व्यक्ती ब्रम्ह मुहुर्तावर उठते त्याच्या शरीरातील सहनशीलतेमध्ये देखील आमुलाग्र वाढ होताना दिसते.
  3. जी व्यक्ती ब्रम्ह मुहुर्तावर उठते तिचा चेहरा नेहमी आनंदी प्रफुल्लित दिसतो अशी व्यक्ती आध्यात्मिक देवध्यानी व्यक्ती मानली जाते.
  4. नियमित ब्रम्ह मुहुर्तावर उठणारया व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते.आपणास त्याच्या बुदधी अणि ज्ञानात चांगली वाढ होताना दिसुन येते.अशा व्यक्तीस कुठल्याही कार्यात नोकरी व्यवसायात यश अणि किर्ती प्राप्त होते.
  5. वैज्ञानिक संशोधनातुन असे समोर आले आहे की पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास वातावरणामध्ये मानवी शरीरास अत्यावश्यक असणारा आॅक्सिजन देखील अधिक विपुल प्रमाणात असतो.अणि ह्या कालावधीत उठल्यावर हाच आॅक्सिजन आपल्या शरीराला प्राप्त होत असतो.अणि आपले शरीर आणि मन दोघे स्वस्थ अणि निरोगी राहत असते.
  6. ब्रम्ह मुहुर्तावर उठयारया व्यक्तीस शारीरिक सौंदर्य लक्ष्मी अणि दिर्घायुष्याची प्राप्ती होते.ब्रम्ह मुहुर्तावर उठल्याने आपले मानसिक ताणतणाव चिंता नैराश्य देखील दुर होत असते.
  7. पुराणात असे सांगितले आहे की जी व्यक्ती ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात झोपून राहते ती स्वताहुन आपले पुण्य नष्ट करत असते.म्हणुन‌ ह्या वेळेत झोपुन राहणे अशुभ मानले जाते.
  8. ब्रम्ह मुहुर्ताच्या काळात ऊॅ मंत्राचा जप केल्याने सप्त चक्र जागरूक होत असतात.अणि ह्या मृहुर्तावर वातावरण अधिक शुद्ध असते म्हणून अधिक प्रमाणात कंपने निर्माण होतात.अणि ह्या कंपनादवारे कुंडलिनी जागृत होते.
  9. ब्रम्ह मुहुर्तावर अनेक पुण्यातमा सिदधा्तमा पृथ्वीवर विराजमान झालेले असतात.यांना आपण साधनेदवारे भेटु शकतो अणि त्यांच्या पुण्याई मुळे पितृदोष सारखे दोष आपणास लागत नाही.आपले पुर्वज पुण्यातमा आपणास योग्य मार्गदर्शन करीत असतात.याने आपले आयुष्य अधिक सरळ सोपे अणि सुखद होते.