कार इन्शुरन्स म्हणजे काय ? वाहन विमा संपूर्ण माहिती – Car Insurance Marathi information

कार इन्शुरन्स म्हणजे काय ? What is Car Insurance -Car Insurance Marathi information

कार इन्शुरन्स ( वाहन विमा )ला मोटार इन्शुरन्स आणि ऑटो इन्शुरन्स देखील म्हणतात.कार इन्शुरन्स हा एक विमा कवच असतो जो वाहन धारकला आर्थिक सरक्षण देतो , आपल्या वाहनं ला काही अनपेक्षित आणि अपघात झालाच तर त्या धोक्यापासून सरक्षण मिळते , मग ते काही असो , चोरी असो किंवा काही म्हत्वाचे गाडीचे पार्ट्स असो  किंवा आग व पाण्यापासून होणारे नुकसान असो.

 • आपल्या कारचा अपघात झाला तर कार ची झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी वाहन धारक  कार इन्शुरन्स खरेदी करतात.
 • प्रत्येकाचे कार घेण्याचे स्वप्न असते.कार घेतल्यानंतर कार सोबतच कार इन्शुरन्स ही असलाच पाहिजे  जेणेकरून तुमच्या कारचे भविष्यात अपघातामुळे किंवा अन्य गोष्टींमुळे नुकसान झाले.तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल.
 • इतकाच नाहीतर TPA (Third Party Insurance )असेल आणि दुर्दवाने अपघाता झालाच तर त्यातून होणार्‍या जीवित आणि मालमत्ता नुकसानी करता सुद्धा आपल्याला सरक्षण मिळते तसेच मानव निर्मित असो की नैसर्गिक संकट असो त्यातून आपल्याला वित्तीय सरक्षण मिळते   हा तुमच्या कारला अपघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी घेतला जातो.
 • ह्या इन्शुरन्स द्वारे तुम्हाला कार च्या झालेल्या नुकसान भरपाईचा कव्हरेज  मिळते.कार इन्शुरन्स असला म्हणजे थोड एक प्रकारे आपली काळजी दूर होते.

Car insurance चे प्रकार – Car Insurance Marathi information

वेगवेगळ्या प्रकारचे कार इन्शुरन्स  उपलब्ध असतात  ज्यात तुम्हाला कमी कव्हरेज मिळते आणि असे काही कार इन्शुरन्स असतात ज्यात तुम्हाला जास्त कव्हरेज मिळते.

 • अन्यपक्ष समाविष्ट असलेला विमा -Third-Party Insurance
 • सर्वसमावेशक- Comprehensive Insurance
 • पूरक किंवा अधिक विमा -Add-on Insurance Covers

Third-Party Insurance

नावात म्हटल्याप्रमाणे या विम्यात मर्यादित , मोजक विमा कव्हर केलेला असतो , यात तिसर्‍या पक्षाच्या जीवित आणि मालमत्ता हानी करता सरक्षण मिळते ,झालेल्या नुकसान ची भरपाई दिली जाते.

लक्ष्यात घ्या या प्रकारच्या विम्यात स्वतच्या वाहनं किंवा जीवित हानी ल आर्थिक सरक्षण मिळत नसते

भारतीय कायद्या नुसार कमीतकमी  असा प्रकारचा  विमा काढण बंधनकारक असते

थर्ड पार्टी इन्शुरन्स चे फायदे :

 • अचानक उद्भभवलेल्या अपघातातून  आपल्याला कायदेशीर आणि आर्थिक सरक्षण मिळते
 • अश्या धक्का दायक प्रसंगत थोडा आधार मिळतो
 • विमा राक्कम जास्त नसते , सहज विमा घेता येतो
 • अपघातात ओढवलेल्या अन्यपक्षांना सरक्षण मिळते

सर्वसमावेशक इन्शुरन्स –Comprehensive Insurance

ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. अपघातात अन्य पक्षाना होणर्‍या नुकसानी त लागणारे गरजेपुरते सरक्षण

तसेच ,अपघात झालेल्या कारची नुकसान भरपाई,अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा दवाखान्याचा खर्च.ह्यांध्ये नैसर्गिक आपत्ती जसे पुर, भूकंप ,सुनामी  तसेच दंगली व जाळपोळ मध्ये झालेल्या नुकसान भरपाई चे देखील कव्हर असते.कार घेताना सर्व सर्वसमावेशक इन्शुरन्स घेणे फायद्याचे आहे.

सर्वसमावेशक इन्शुरन्स चे फायदे : Comprehensive Insurance advantages

 • ह्यामध्ये आर्थिक सुरक्षितता कव्हर केली जाते.
 • काही कायदेशीर बाबी उद्भवलया तर त्यात होणारा खर्च ही यात मिळतो म
 • ह्यांध्ये अपघातात झालेल्या कारची व वाहन मालका झालेल्या नुकसानची  भरपाई दिली जाते.
 • मानव निर्मित आपत्ती जसे की कारला आग लागणे,या मुळे झालेल्या कार च्या नुकसानाची भरपाई देखील कव्हर केली जाते.Add-on Insurance Covers – पूरक किंवा अधिक विमा

वरील  दोन प्रकार व्यतरिक्त आपण add on या प्रकारच्या विम्यातुन काही अधिक संरक्षण मिळवू शकता , add on ला आपण रायडर विमा म्हणूनसुद्धा  ओळख

 

कार इन्शुरन्स – add on करू शकता- :

 • समजा तुमची गाडी रस्त्याच्या मध्ये बंद पडली तर तुम्ही जर हा कव्हर ऍड केला असेल तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुमची गाडी बंद पडलेल्या ठिकाणी येऊन पाहोचते आणि गाडी दुरुस्त करते.
 • इंजिन खराब झाले असेल तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुमच्या गाडीचे इंजिन बदलते.या साठी तुम्हाला इंजिन रिप्लेसमेंट ऍड- ऑन कव्हरेज घेतले पाहिजे.
 • नो क्लेम बोनस
 • इंजिन सरक्षण कव्हर
 • की प्रोटेक्शन कव्हर
 • पर्सनल अपघात कव्हर
 • डेली अलोवन्स बेनिफट
 • कार काही लहान सहन पार्ट्स
 • ह्या ऍड ऑन सुविधेचा तुम्हाला खूप साऱ्या कव्हरेज चा फायदा होतो.

कार इन्शुरन्स घेण्यापूर्वी खालील गोष्टी बाबी ठेवूनच कार इन्शुरन्स निवडा :

 • तुम्हाला आवडलेल्या कार इन्शुरन्सची बाकीच्या चांगल्या कार इन्शुरन्स बरोबर तुलना करा.
 • इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी आपली आर्थिक परिस्थिती बघा आणि त्या नंतर योग्य तो कार इन्शुरन्स खरेदी करा.म्हणजे तुमची जर सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही इन्शुरन्स मध्ये जास्त कव्हरेज ऍड करू नका आणि तुमची सध्याची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही इन्शुरन्स मध्ये जास्त कव्हरेज ऍड करा.
 • इन्शुरन्स घेण्यापूर्वी त्यात कोणकोणते कव्हर केले आहे हे नक्की पाहा.
 • क्लेम रेशो आणि क्लेम सेटलमेंट रेशो नक्की पहा.
 • असा इन्शुरन्स निवडा ज्यात रोड साईड असिस्टंट,पर्सनल अकॅसिडेंट कव्हर केला जाईल.

कार इन्शुरन्स प्रीमियम कसा कॅल्क्युलेट करायचा ?

कार इन्शुरन्स प्रीमियम तीन गोष्टीवरून कॅल्क्युलेट करता येतो :

 • अन्य पक्षला होणार्  नुकसान भरपाई
 • Regulatory and Development Authority of India (IRDAI), ने ठ्ररविलेल्या नियाम नुसार हा विमा कारच्या क्युबिक क्षमते वर अवलंबून असते .
 • कारच्या क्युबिक क्षमता Premium – 16 जून 2019  पासून –
 • 1000 cc                पेक्षा जास्त नसेल तर – ₹2,072
 • 1000 cc पेक्षा जास्त पण  1500 cc जास्त नाही –    ₹3,221
 • 1500 cc                पेक्षा जास्त – ₹7,890 2
 • स्वतचा वयक्तिक नुकसान –  IDV X (Tariff Rate) – Discounts + Add On Covers
 • वैयक्तिक अपघात _ premium + Additional covers

प्रीमियम ची किंमत खालील गोष्टींवरून ठरवली जाते ? – Car Insurance Marathi information

 • IDV-IDV – declare value ही पोलिसी मध्ये क्लेम केलेली सर्वात मोठी रक्कम असते.तुमचा जर IDV जास्त असेल तर तुमची प्रीमियम ची किंमत ही जास्त असते.
 • तुम्ही जर शहरी भागात राहत असाल, तर ती अपघाताचे प्रमाण जास्त असते.म्हणून तुम्ही कुठे राहता यावरून तुमच्या प्रीमियम ची किंमत ठरवली जाते.
 • तुमचा मागच्या काही वर्षात ऑटो इन्शुरन्स वरती क्लेम नसेल,तर तुम्हाला प्रीमियम मध्ये नो-क्लेम बोनस मिळतो.

भारतातील कार इन्शुरन्स देणाऱ्या 15 कंपन्या –

 • HDFC एर्गो कार इन्शुरन्स
 • IFFCO टोकियो कार इन्शुरन्स
 • SBI कार इन्शुरन्स
 • एडल्वेस कार इन्शुरन्स
 • ओरिएंटल कार
 • कोटक कार इन्शुरन्स
 • टाटा AIG कार इन्शुरन्स
 • नॅशनल कार इन्शुरन्स
 • न्यू इंडिया अशुरन्स कार इन्शुरन्स
 • फ्युचर जनेरली कार इन्शुरन्स
 • बजाज कार इन्शुरन्स
 • भारती अक्सा कार इन्शुरन्स
 • युनायटेड इंडिया कार इन्शुरन्स
 • रिलायन्स कार इन्शुरन्स
 • रॉयल सुंदरम कार इन्शुरन्स

SIP KNOWLEDGE

Leave a Comment