रोबोटिक्स: मुलांकरिता एक प्राँमिसिंग करिअर – Career Opportunities in Robotics

रोबोटिक्स: मुलांकरिता  – Career Opportunities in Robotics

आपण बोलताना असे बोलून जातो की येणारी वेळ ही आता संपूर्ण पणे आयटी आणि कॉम्प्युटर शी जोडलेली असणार आहे. कंपन्यांमध्ये आता माणसांची गरज लागणार नाही कारण सर्व काही आता रोबोट्स करणार आहे. आपण हे सर्व काही चित्रपटांमध्ये बघितले असेल तर मग नक्की हे

  • रोबोटिक्स म्हणजे काय?
  • यात मुलांसाठी करियरच्या संधी काय आहेत? Career Opportunities in Robotics Marathi Information
  • जर संधी असतील तर मग ते एक प्रॉमिसिंग करियर आहे का?

याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.               

रोबोटिक्स म्हणजे काय?

  • रोबोटिक्स म्हणजे ही एक अशी फिल्ड आहे ज्यात तांत्रिक उपकरणाचे डिझाईन आणि ऑपरेटिंग केले जाते. आपण या तांत्रिक उपकरणाला साधारणतः रोबोट्स म्हणून ओळखतो.
  • आपल्याला रोबोट्स म्हणले की मनुष्यासारखा दिसणार एक यंत्रमानव समोर दिसतो मात्र रोबोट्स म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी मनुष्याच्या हस्तक्षेपाशिवाय किंवा थोड्याश्या हस्तक्षेपाने काम करते.
  • रोबोट्स बनवत असताना त्याची बॉडी बनवून फक्त मेकॅनिकल काम करणे हा एक भाग असतो मात्र याशिवाय त्याच्या कार्यासाठी प्रोग्रामिंग करणे देखील तितकेच गरजेचे असते. रोबोटिक्स ही पूर्ण फिल्ड मेकॅनिकल डिझाईन आणि मशिन प्रोग्रामिंग वर काम करते. यासाठी तुम्हाला मेकॅनिकल ज्ञानासोबत प्रोग्रामिंग म्हणजेच कोडिंग विषयी देखील माहिती असायला हवी.
  • रोबोटिक्स क्षेत्राने आज प्रत्येक क्षेत्राला आपल्या कवेत घेतले आहे. मात्र रोबोटिक्स मध्ये आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात आणि त्यामुळे शासनाने आता दोन्ही गोष्टी एकाच कोर्स मध्ये शिकवता येतील असे कोर्स सुरू केले आहेत.

रोबोटिक्स मुलांसाठी एक प्राँमिसिंग करिअर का आहे?

  • आपण सुरुवातीलाच बघितले की पुढे जाऊन सर्व काही रोबोट्स बघणार आहेत त्यामुळे रोबोट्स आणि स्वयंचलित गोष्टींची जर भविष्यात गरज असेल तर मग रोबोटिक्स साठी करियरच्या अनेक संधी सध्या पासून उपलब्ध आहेत आणि पुढेही असतीलच.
  • आजच्या घडीला रोबोटिक्स इंजिनिअरिंग सारखे वेगवेगळे रोबोटिक्स निगडित शिक्षण सुविधा येत आहेत. जर रोबोटिक्स क्षेत्राला पुढे जाऊन एक प्रॉमिसिंग करियर नसते तर सरकारने आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेने या नवीन क्षेत्रात विद्यार्थी का बनवले असते?
  • रोबोटिक्स क्षेत्रात सध्या तुम्हाला एका सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि आयटी इंजिनिअर सारखे पॅकेज मिळते आहे. याशिवाय स्वतः तुम्ही एखादे नवीन संशोधन करून किंवा कंपनी सुरू करून स्वतःचा व्यवसाय देखील या रोबोटिक्स मध्ये सुरू करू शकता.
See also  12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारी नोकरीच्या जागा- Government job vacancy for 12 th pass students November 2022 जागा -

जॉबच्या संधी कुठे आहेत? Career Opportunities in Robotics Marathi Information

  • रोबोट आता इंडस्ट्री मध्ये सर्रास वापरले जात आहेत त्यामुळे तिथे तुम्हाला ऑपरेटर किंवा निरीक्षक म्हणून जॉब मिळू शकतो.
  • याशिवाय ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सध्या कार मध्ये बरेच काही ऑटोमॅटिक होते आहे त्यामुळे तुम्हाला तिथे संधी आहेत.
  • भारतात सुद्धा ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये रोबोटिक्स क्षेत्राला प्राधान्य दिले जाते आहे.
  • गव्हरमेंट क्षेत्रात तुम्हाला रिसर्च सेंटर मध्ये जॉब मिळू शकतो. यात स्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात काम करण्याच्या संधी आहेत.

शैक्षणिक पात्रता काय लागते

  • इंजिनिअरिंग साठी तुम्हाला काही कॉलेज मध्ये JEE द्यावी लागते किंवा काही कॉलेज मध्ये त्यांच्या स्वतःच्या परीक्षा असतात त्या घ्याव्या लागतात.
  • तुमची शैक्षणिक पात्रता ही इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून हवी असते. यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे विषय असणे आवश्यक असते.
  • बाकी कॉलेज अनुसार यामध्ये काही बदल असू शकतात. काही मुलांना बारावीला कॉम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक असेल तर त्याचा फायदा त्यांना ऍडमिशन घेताना होतो.

करिअर स्कोप काय आहे

तुम्ही जर बॅचलर असाल आणि पुढे करियर विषयी शोधत आहात तर मग तुम्ही मास्टर विषयी नक्की विचार करायला हवा.

  • मायक्रोरोबोटिक्स,
  • आर्टिफिशिअल इंटेलिजन्स,
  • कॉम्प्युटर इंटेग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टम,
  • रोबोट मॅन्युप्युलेटर्स,
  • एअर ट्राफिक कंट्रोलर

सारख्या अनेक विविध क्षेत्रांमध्ये करियरच्या संधी उपलब्ध आहेत.

भारतात इंडस्ट्रीत सध्या रोबोट्स हे मॅन्युफॅक्चरिंग, इंस्पेक्शन, ट्रान्सपोर्ट यासाठी वापर केला जातो आहे आणि हे प्रमाण मागील काही काळापासून वेगाने वाढत आहे. करियरच्या संधी या फक्त बाहेर प्रदेशात जाऊन नाहीयेत तर भारतात देखील आहेत.

रोबोटिक्सचे कोर्सेस कोणते आहेत?

आपण सुरुवात लहान मुलांपासून करूयात. त्यांना त्यांच्या भविष्यात काहीतरी रोबोटिक्स मध्ये करायचे असेल तर सध्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर लहान मुलांसाठी रोबोटिक्स विषयी कोर्सेस घेतले जातात.

See also  उमेद अभियान - महिला कर्जाविषयी माहीती- Woman Loan Scheme Information In Marathi

याशिवाय तुम्ही त्यांना व्हाईट हॅट ज्युनियर सारख्या प्लॅटफॉर्म वरून कोडींग शिकवू शकता. यावर रोबोटिक्स निगडित अनेक नवीन कोर्सेस आता उपलब्ध आहेत. यामुळे त्यांना कोडींग सोबत मेकॅनिकल डिझाईन विषयी देखील माहिती मिळेल.

तुम्हाला रोबोटिक्स मध्ये जायचे असेल तर इंजिनिअरिंग करावे लागेल.

  • बी टेक आणि एम टेक सारखे कोर्सेस तुम्हाला यामध्ये करता येतील.
  • मेकाट्रॉनिक्स, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स,
  • ऍडव्हान्स रोबोटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग,
  • इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग तुम्ही करू शकता.
  • मेकाट्रॉनिक्स ही आता एक नवीन फिल्ड आलेली आहे ज्यामध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग या फिल्ड एकत्र करून शिकविल्या जातात.
  • तुम्हाला रोबोटिक्स ऑप्शन असलेले इंजिनिअरिंग मिळत नसेल तर तुम्ही मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करू शकता.

तुम्ही यामध्ये मेकॅनिकल घेऊन त्यामध्ये चांगला हातखंडा बसवून रोबोटिक्स विषयी जॉब असलेल्या ठिकाणी मेकॅनिकल साठी असणारे काम करू शकतात. वेळेनुसार तुम्ही बायको गोष्टी काम करताना शिकू शकता.

रोबोटिक्स शिक्षणासाठी खर्च

  • तुम्हाला इथे इंजिनिअरिंग साठी लागणारा खर्च असतो. यामध्ये 10 हजार ते 2 लाखांपर्यंत एका वर्षाची फी तुमची असू शकते. हे कॉलेज नुसार बदलते कारण सरकारी कॉलेज मध्ये तुम्हाला हे कमी खर्चात होऊ शकते.

रोबोटिक्स चे शिक्षण देत असलेल्या संस्था

  • जवळपास सर्व आयआयटी मध्ये आता रोबोटिक्स निगडित शिक्षण उपलब्ध झालेले आहेत. आपण रोबोटिक्स विषयी शिक्षण देणाऱ्या चांगल्या संस्थांविषयी जाणून घेऊयात.
  • आयआयटी कानपुर मध्ये तुम्हाला या क्षेत्राशी संबंधित जास्तीत जास्त ज्ञान देणारे डिपार्टमेंट आहे. इथून शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या एका चांगल्या सॅलरी आणि पोझिशनवर आहेत.

सॅलरी किती असते?

  • सुरुवात तुम्हाला कदाचित 30 हजार पासून पगार मिळेल परंतु पुढे जाऊन त्यात प्रति महिना दीड लाख पर्यन्त वाढ होऊ शकते. खाजगी क्षेत्रात इतकी सॅलरी तुम्हाला असेल मात्र गव्हरमेंट क्षेत्रात तुम्हाला सुरुवातच 50 हजार पासून मिळेल. यात तुमची गुणवत्ता आणि स्तर यानुसार वाढ देखील होत असते.
  • तुमची सॅलरी ही तुम्ही कोणत्या कॉलेज मधून शिक्षण घेताय यावर देखील अवलंबून आहे. त्यामुळे चांगल्या कॉलेज मधून तुम्ही शिक्षण घेणे गरजेचे आहे.
  • स्टार्टअप हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला रोबोटिक्स विषयी जर ज्ञान आहे तर मग तुम्ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही क्षेत्रात उत्तम आहात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे तर मग एक छोटासा स्टार्टअप तुम्हाला तुमची वर्षभर असलेली सॅलरी देखील एका महिन्यात देऊ शकतो.
See also  पोस्ट आँफिस फ्रेंचायची योजना २०२२ विषयी माहिती - Post office franchise scheme 2022 information in Marathi

रोबोटिक्स करियर म्हणून का निवडावे?

  • रोबोटिक्स ऐकायला जस भारी वाटत तसच या फिल्ड मध्ये करियरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग संपलं आहे असे अनेक लोक बोलतात मात्र या नवनवीन फिल्ड आता इंजिनिअरिंग क्षेत्रात बदल घडवत आहेत.
  • सध्या आपल्या देशाला आणि संपूर्ण जगाला देखील सर्व काही ऑटोमॅटिक करण्यासाठी रोबोट्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या गोष्टींची गरज आहे. ही गरज रोबोटिक्स क्षेत्रात करियर करणारे विद्यार्थी पूर्ण करू शकतात.
  • रोबोटिक्स मधील करियर आणि हे करियर प्रॉमिसिंग आहे किंवा नाही याविषयी आज आपण Career Opportunities in Robotics Marathi Information या लेखात माहिती जाणून घेतली.

तुमचा पूर्णपणे कल जर रोबोटिक्स कडे असेल तर मात्र तुम्ही मेकाट्रॉनिक्स किंवा रोबोटिक्स इंजिनिअरिंग केलेलं कधीही चांगलेच असेल. मात्र जर तुम्हाला संभ्रम वाटत असेल आणि रोबोटिक्स विषयी जास्त आवड देखील नसेल तर मग तुम्ही कोर इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलेले कधीही योग्यच ठरेल.