चंद्रयान ३ च्या यशस्वी लॅडिग करीता अखेरची १५ मिनिटे का अधिक महत्वाची आहेत? ह्या शेवटच्या १५ मिनिटांचे महत्व काय आहे? – chandrayaan 3 update

चंद्रयान ३ च्या यशस्वी लॅडिग करीता अखेरची १५ मिनिटे का अधिक महत्वाची – chandrayaan 3 update

अवघ्या काही तासातच भारताचे चंद्रयान ३ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे.हे लॅडिग यशस्वी झाल्यास चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.

असे करत भारताचे चंद्रयान ३ अंतराळ क्षेत्रात एक जागतिक पातळीवरील मोठा विश्व विक्रम पराक्रम नोंदवुन इतिहास रचणार आहे.

चंद्रयान २ चे लॅडिग करताना ज्या चुका झाल्या त्या चंद्रयान ३ चे लॅडिग करताना अजिबात होणार नाही यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली गेली आहे असे इस्रोचे माजी प्रमुख के सिवान म्हटले आहे.

त्यामुळे आता सर्व जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान ३ ह्या मोहीमेकडे लागुन आहे.

चंद्रयान ३ च्या लॅडिगच्या प्रक्रिये मध्ये शेवटची १५ मिनिटे ही फार महत्त्वाची असतात ह्या शेवटच्या १५ मिनिटांत कोणकोणत्या प्रक्रिया घडुन येतील हेच आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

चंद्रयान ३ चे लॅडर माॅडयुलला चंद्रावर उतरवत असताना त्याला ९० अंश कोन मध्ये उतरवणे अत्यंत आवश्यक असते.

chandrayaan 3 update
chandrayaan 3 update

चंद्रयान ३ च्या लॅडिग मधील शेवटच्या १५ मिनिटांची प्रक्रिया एकुण आठ टप्प्यात पार पाडली जाईल.

सध्या चंद्रयान ३ ह्या यानाचा वेग कमी करण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू आहे.हे यान ३० किलोमीटर इतक्या अंतरावर आल्यावर याचा वेग कमी केला जाणार आहे.यासाठी राॅकेट प्रज्वलित करण्यात येईल.

यानंतर पहिल्या टप्प्यात चंद्रयान ३ हे १० मिनिटांमध्ये ७.४ किलोमीटर इतक्या अंतरावर पोहोचणार आहे.

यानंतर दुसरा टप्पा सुरू होईल ज्यात चंद्रयान ६.८ किलोमीटर इतक्या अंतरावर पोहोचल्यावर आपणास लॅडरचे पाय खाली फिरताना दिसुन येतील.हे यान योग्य ठिकाणी जात आहे किंवा नाही याची शहानिशा लॅडरवरील लावलेली उपकरण करणार आहे.

तिसरया टप्प्यात यान ८०० मीटर म्हणजे चंद्र केवळ एक किलोमीटरच्या आत येईल.

See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi

चौथ्या टप्प्यात हे यान चंद्राच्या पासुन फक्त १५० मीटर इतक्या अंतरावर दिसुन येईल.

पाचव्या टप्प्यात हे यान ६० मीटर इतक्या उंचीपर्यंत खाली उतरविण्यात येईल.

सहाव्या टप्प्यात चंद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या पासुन १० मीटर इतक्याच अंतरावर राहील.

सातव्या टप्प्यात चंद्रयान ३ हे चंद्रावर अलगदपणे उतरविण्यात येईल.हयावेळी यानाचे इंजिन बंद करण्यात येईल.चंद्रावरील धुळीचा लॅडरवरील सोलर पॅनल वर पडु नये किंवा त्याचा काही परिणाम होऊ नये यासाठी हे इंजिन बंद केले जाईल.

यानंतर अखेरचा आठवा टप्पा एका सेकंदात पार पाडण्यात येईल.यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तरी देखील यान हे चारही पायांवर सरळ उतरताना दिसुन येईल.

मग लॅडर सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यावर काही काळातच त्याचा रॅप ओपन होईल अणि त्यातुन रोव्हर बाहेर निघेल.मग हा रोव्हर लॅडरचे एक छायाचित्र घेईल अणि पृथ्वीवर इस्रोकडे पाठवेल.हाच हया प्रक्रियेचा आठवा अणि सर्वात शेवटचा टप्पा असणार आहे.

मग यानंतर पुढच्या १४ दिवसात लॅडर अणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करताना दिसुन येतील.