क्रेडिटेड अणि डेबीटेड म्हणजे काय? – Credited and debited meaning in Marathi

क्रेडिटेड अणि डेबीटेड म्हणजे काय?Credited and debited meaning in Marathi

आज आपण सर्वच जण गुगल पे फोन पे सारख्या मनी ट्रान्झँक्शन अँप्सच्या मदतीने आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करत असतो.

जेव्हा आपण आँनलाईन पैशांची देवाणघेवाण करतो तेव्हा डेबिटेड अणि क्रेडिटेड हे दोन शब्द आपणास मोबाइल मध्ये बँकेकडुन आलेल्या मँसेजमध्ये आवर्जुन पाहायला मिळत असतात.

आपल्यातील जे व्यक्ती आँनलाईन ट्रानाझँक्शनमध्ये नवीन आहेत अशा व्यक्तींना बँकेकडुन हा मँसेज आल्यावर एकच प्रश्न पडत असतो की हे डेबिटेड अणि क्रेडिटेड म्हणजे काय असते?आँनलाईन पैशांची देवाघणेवाण केल्यावर हा मँसेज आपणास बँकेकडुन नेहमी का येतो?

काही जणांना तर असे देखील वाटते की कोणीतरी त्यांच्या खात्यातुन पैसे काढुन घेतले आहे.किंवा त्यांचे खाते बँकेने बंद करून टाकले आहे.म्हणुन खुप जण घाई घाई बँकेची धाव घेत असता.

असे आपल्यासोबत होऊ नये म्हणुन आजच्या लेखात आपण डेबिटेड अणि क्रेडिटेड म्हणजे काय असते?हा मँसेज आपल्याला बँकेकडुन कधी अणि का येतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

क्रेडिटेड म्हणजे काय?Credited meaning in Marathi

जेव्हा आपणास बँकेकडुन असा मँसेज येतो की .. Amount is credited to your account याचा अर्थ असा होत असतो की इतकी रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

कोणीतरी आपल्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर तसेच जमा केली आहे.

क्रेडिटेड शब्दाचा बँकिंग क्षेत्रात पुढील अर्थ होतो-

● खात्यात जमा करणे

● बँक खात्यात पैसे जमा होणे

डेबिटेड म्हणजे काय?debited meaning in Marathi

जेव्हा आपणास बँकेकडुन असा मँसेज येतो की .. Amount is debited to your account याचा अर्थ असा होत असतो की इतकी रक्कम आपल्या खात्यातुन कट झाली आहे अणि ही रक्कम आपल्या खात्यातुन दुसरया अकाऊंटला जमा करण्यात आली आहे.तसेच ट्रान्सफर करण्यात आली आहे.

See also  आय एफ एस्सी अणि एम आय सी आर कोड म्हणजे काय? - IFSC AND MICR code meaning in Marathi

कोणाच्या तरी खात्यावर आपल्या बँक अकाऊंटमधुन पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे.

डेबिटेड शब्दाचा बँकिंग क्षेत्रात पुढील अर्थ होतो-

● खात्यातुन पैसे कट करणे

● खात्यातुन पैसे वजा होणे

● दुसरयाच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करणे

● आपल्या खात्यातुन दुसरया खात्यावर पैसे पाठविले गेले आहे.

आपल्याला क्रेडिटेड डेबीटेड असा मँसेज बँकेकडुन कधी येतो?

जेव्हा कोणी आपल्या खात्यावर पैसे जमा करते आपल्या खात्यात पैसे टाकते आपल्या अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर करते तेव्हा बँकेकडुन आपणास क्रेडिटेड असा मँसेज येत असतो.म्हणजे बँक आपणास कळवते की आपल्या खात्यावर अमुक अमुक खात्यावरून पैसे जमा ट्रान्सफर करण्यात आले आहे.इतके पैसे आपल्या खात्यावर जमा झाले आहे.

जेव्हा आपण आपल्या बँक खात्यातुन एखाद्याच्या दुसरयाच्या खात्यावर आँनलाईन पैसे ट्रान्सफर करतो तेव्हा बँकेकडुन आपणास डेबिटेड हा मँसेज येत असतो.म्हणजे बँक आपणास सुचित करते की एवढी रक्कम तुमच्या खात्यातुन कट झाली आहे तसेच तुमच्या खात्यातुन दुसरया खात्यावर ट्रान्सफर करण्यात
आली आहे.

समजा आपण कोणाला आपल्या खात्यातुन स्वता पैसे ट्रान्सफर केले नाहीये तरी देखील आपणास डेबिटेड असा मँसेज मोबाइलवर आला तर अशा वेळी आपण समजून घ्यायचे बँकेने कसले तरी सर्विसचे चार्जेस पैसे स्वता आपल्या खात्यातुन कट केले आहे.

किंवा आपल्या खात्यातुन कोणीतरी आपल्या नकळत अनोळखी अज्ञात व्यक्तीने पैसे काढले आहे अशा वेळी आपण त्वरीत बँकेशी संपर्क साधायला हवा.अणि याची शहानिशा करायला हवी.

इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी जेव्हा आपण एखाद्याला आपल्या खात्यातुन पैसे आँनलाईन ट्रान्सफर करतो पैसे पाठवतो तेव्हा आपणास डेबिटेड असा मँसेज बँकेकडून येतो अणि ज्याला आपण पैसे पाठविले आहे ट्रान्सफर केले आहे त्या व्यक्तीला क्रेडिटेड असा मँसेज बँकेकडून जात असतो.