सी एस आर म्हणजे काय? – CSR meaning in Marathi

सी एस आर म्हणजे काय? – CSR meaning in Marathi

सी एस आरचा फुलफॉर्म काय होतो?csr Full form in Marathi

सी एस आरचा फुलफॉर्म corporate social responsibility असा होतो.

सी एस आर म्हणजे काय?csr meaning in Marathi

सी एस आर ही एक व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.कंपनीकडुन ज्या नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करून नफा प्राप्त केला जात असतो.त्याचाच मोबदला तसेच परतफेड म्हणून कंपनी कडुन सी एस आर निधीची तरतूद केली जाते.

ज्या प्रायव्हेट क्षेत्रामधील कंपन्या असतात त्या आपल्या प्राप्त केलेल्या नफ्यातील काही हिस्सा एक सामाजिक जबाबदारी म्हणून बाजुला काढुन ठेवत असतात.

ह्या काढुन ठेवलेल्या काही हिस्सा मधून समाजाला उपयुक्त ठरेल असे सामाजिक कार्य केले जाते.क़ंपनी अॅक्ट २०१३ मध्ये याची तशी तरतूद देखील करण्यात आली आहे.

सोशल रिस्पाॅनसबिलिटी म्हणजे काय?Social responsibility meaning in Marathi

सोशल रिस्पाॅनसबिलिटी म्हणजे सामाजिक जबाबदारी होय.

आपण समाजाचे एक घटक आहोत.त्या नात्याने आपण समाजाचे काही देणे लागतो.

हया समाजाप्रती आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे.म्हणुन समाजाला अणि समाजाचे देशाचे उज्वल भविष्य ठरणारया युवा पिढीला काहीतरी फायदा होईल असे कार्य आपण करत असतो.

ज्यात गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण शिष्यवृत्ती वगैरे उपलब्ध करून देणे, गोर गरीबांना अन्न वस्त्र यांचा पुरवठा करणे इत्यादी सामाजिक कार्यांचा समावेश होतो.

सामान्य व्यक्तीसाठी ही एक समाजाचा घटक म्हणून सामाजिक जबाबदारी मानली जाते तर व्यावसायिक व्यक्ती साठी एक काॅर्परेट सोशल रिस्पाॅनसबिलिटी मानली जाते.

काॉर्पारेट रिस्पाॉनसबिलिटी म्हणजे काय?Corporate responsibility meaning in Marathi

काॉर्पारेट रिस्पाॉनसबिलिटी म्हणजे व्यावसायिक जबाबदारी होय.जेव्हा कुठलीही प्रायव्हेट कंपनी उद्योग व्यवसाय करत असते तेव्हा त्याचा काही टक्के परिणाम हा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रीत्या आजुबाजुच्या वातावरणावर,निसर्गावर समाजावर सुदधा होत असतो.

जेव्हा प्रायव्हेट कंपनी नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करतात तेव्हा त्यांच्यामुळे निसर्गाची कुठलीही हानी होऊ नये म्हणून तसेच हानी झाली तरी ती भरली जावी म्हणून एक व्यावसायिक तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून कंपनीला सी एस आर फंड द्यावा लागतो.

See also  Phone pe मध्ये bank account कसे add करतात? - How to add bank account on PhonePe

समाजाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न यात केला जात असतो.

सी एस आर फंड कोणाला जमा करणे ब़ंधनकारक आहे?

प्रत्येक प्रायव्हेट कंपनीला सी एस आर फंड जमा करणे ब़ंधनकारक मानले जाते.

ज्या प्रायव्हेट कंपनींचा प्राॉफिट पाच कोटी पेक्षा अधिक आहे.ज्या प्रायव्हेट कंपनीची पत पाचशे कोटी पेक्षा अधिक आहे, वार्षिक उलाढाल हजार कोटी पेक्षा अधिक आहे अशा कंपन्यांना सी एस आर फंड जमा करणे ब़ंधनकारक मानले जाते.

मागील दोन वर्षात जेवढा नफा झाला आहे त्याची दोन ते तीन टक्के इतकी रक्कम सी एस आर फंड मध्ये हस्तांतरित करण्यात येते.

सी एस आर फंड कुठे कोणत्या सामाजिक कार्यात खर्च करायला हवा किती खर्च करायला हवा याचे नियोजन करण्यासाठी सर्व प्रायव्हेट कंपनी कडुन एक समिती नेमली जाते.

Leave a Comment