डीप वर्क – Deep work Book review in Marathi

पुस्तक परिचय – डीप वर्क – Deep work Book review in Marathi

आपण यशस्वी होण्यासाठी जे ध्येय निवडले तेच ध्येय खूप लोकांनी निवडलेले असते;म्हणजे समजा तुम्ही UPSC एक्साम क्रॅक करायचे ध्येय ठेवले असले तर ती एक्साम क्रॅक करणे ध्येय असणारे तुम्ही एकटे नसणार आहात,

खूप विध्यार्थी दरवर्षी UPSC परीक्षेचा चा फॉर्म भरतात, त्यातील बऱ्यापैकी मंडळी अभ्यास देखील करतात,पण का त्यातील काहीच विद्यार्थी UPSC एक्साम क्रॅक करतात.या काही लोकांमध्ये तुम्हाला जर यायचे असेल तर तुम्ही कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्क या पुस्तकातील फॉर्म्युला वापरला पाहिजे.

आपण या लेखामध्ये कॅल न्यूपोर्ट लिखित डीप वर्क या पुस्तकाचा review पाहणार आहोत.

काम करण्याचे दोन प्रकार असतात.

Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World Kindle Edition                            अमेझोन वर अधिक माहिती
 • पहिला प्रकार
 • म्हणजे काम करताना कोणासोबत तरी बोलणे,किंवा दर पंधरा-वीस मिनिटाला सोशल मीडिया उघडणे,असे जर काम आपण करत असलो तर आपण आपले ध्येय गाठू शकणार नाही.कारण जो पर्यंत आपण 100 %फोकस आपल्या कामावर देत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही.
 • दूसरा प्रकार
 • काम करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे डीप वर्क,

ज्याचा मराठी अर्थ ‛मग्न होऊन काम करणे’ असा होतो.कोणतेही काम आपण मग्न होऊन केले तर नक्कीच आपण त्या कामामध्ये पटाईत होऊ शकतो.
त्यामुळे कोणतेही काम करताना आपण डीप वर्क फॉर्म्युला चा वापर केला पाहिजे.
जगात यशस्वी झालेली व्यक्ती डीप वर्क फॉर्म्युला नुसार आपल्या कामामध्ये माहीर होतात.

 • असेच एक यशस्वी व्यक्ती अलन लाईटमन काही दिवस वेगळ्या ठिकाणी राहायला जायचे.जिथे ते मोबाईल वापरत नाहीत आणि तिथे त्यांना फोन कॉल्स देखील येत नाही.
  आता तुम्ही म्हणाल मी सगळ्यांबरोबर बोलून,अधून-मधून सोशल मीडिया उघडून तरीही माझे काम पूर्ण होते;तर मग डीप वर्क चा काय फायदा!
 • पण तुम्ही जे आता काम डिस्ट्रॅक्ट होऊन करताय ना ते काम कॅल न्यूपोर्ट यांच्या मते भविष्यात रोबोट करेल किंवा तुमच्याजागी दुसरे कोणीतरी करेल;कारण बेरोजगारी इतकी वाढली आहे की
 • ,तुमचे काम तुमच्यापेक्षा कमी पगारामध्ये करायला खूप माणसे तयार होतील.तुम्हाला जर लॉंग टर्म यश पाहिजे असेल तर तुम्हाला डीप वर्क कला अवगत करायलाच हवी.
 • समजा तुम्ही 100% फोकस देऊन कोणतेतरी काम करत आहात आणि अचानक तुमच्या मोबाईल वरती मेसेज आला.तो मेसेज बघण्यासाठी तुम्ही मोबाईल हातात घेतला आणि मेसेज बघून मोबाईल बाजूला ठेवला आणि परत पहिल्यांदा करत होता ते काम करू लागला.
See also  विनायक मेटे यांचे निधन- Vinayak Mete Passed Away In Marathi

जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके – आर्थिक सक्षमता वाचण्या करता क्लिक करा

आता तुमचा त्या कामावर्ती 100%फोकस नसणार ;त्या कामावर 100%फोकस परत आणण्यासाठी तुम्हाला काही कालावधी लागेल.

तुमच्याकडे जर डीप वर्क ची कला अवगत असेल तर तुम्ही नक्कीच दुसऱ्यापेक्षा वेगळी पर्सनॅलिटी असाल.

भविष्यात तीन प्रकारचे लोक टिकणार.पहिले

डीप वक्र पुस्तकाच्या लेखकानुसार भविष्यात फक्त तीन प्रकारचे लोक टिकणार.

 • पहिले ज्यांचाकडे मोठ्या मोठ्या कंपनीचे शेअर्स आहेत ,
  दुसरे ज्यांच्याकडे नवनवीन टेक्नॉलॉजी चे ज्ञान आहे आणि
  तिसरे जे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अव्वल आहेत.पहिले दोन प्रोफेशन तर काहींसाठी सोडून सगळ्यांसाठी अवघड आहेत.परंतु तुम्ही डीप वर्क च्या मदतीने तिसऱ्या म्हणजे आपल्या क्षेत्रात अव्वल होऊ शकता.

डीप वर्क करण्याचे चार प्रकार:

बिल गेट्स यांनी 8 आठवडे जगाशी संपर्क तोडला होता आणि ते एका अनोळखी जागी राहून आपल्या गोल वरती काम करत होते.त्यांनी त्या 8 आठवड्याच्या डीप वर्क मध्ये कोडींग बनवलेले जे की पुढे मायक्रोसॉफ्ट चा बेस बनलं.तुम्हीही असे कधी जगाशी संपर्क तोडून काही दिवस आपल्या गोल वरती काम करण्यासाठी अनोळखी ठिकणी जा.हे फक्त काही लोकांनाच जमेल.
ह्यामध्ये तुम्ही काही वेळ शांत रूम मध्ये जाऊन बसा.हॅरी पॉटर च्या लेखिका जे के रोलिंग याना त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पार्ट मध्ये पुस्तक लिहिताना कुत्र्यांच्या आवाजाचा ,घरतल्यांच्या कालव्याचा आवाज यायचा आणि त्यांचे पुस्तक लिहिन्यावर लक्ष लागत न्हवते.यावर उपाय म्हणून जे के रोलिंग ह्या पुस्तक लिहायच्या वेळी हॉटेल मध्ये जाऊन पुस्तक लिहायच्या आणि परत आपल्या नॉर्मल जीवनामध्ये यायच्या.ह्या प्रकारातील डीप वर्क खुप लोकांना जमेल.
ह्या प्रकरामध्ये तुम्ही तुमच्या बिजी शेड्युल मधील काही वेळ डीप वर्क साठी ठेवा .समजा तुम्हाला 3 ते साडे तीन मोकळा वेळ आहे,तर त्या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये तुम्ही डीप वर्क करा.
ह्यामध्ये तुम्ही दिवसातील निश्चित वेळ ठरवा आणि त्या निश्चित वेळेत डीप वर्क करा.
वरील चार प्रकार वेगळे आहेत पण त्याचा उद्देश डीप वर्क करणे हा एकच आहे.तुम्ही तुमच्या गरजेनुसार वरील कोणत्याही प्रकारानुसार डीप वर्क करा

See also  क्यु आर कोड स्कॅम म्हणजे काय ? | QR Code Scam information In Marathi