इम्पोर्ट अणि एक्सपोर्ट मधील फरक – Difference between import and export in Marathi

इम्पोर्ट अणि एक्सपोर्ट मधील फरक Difference between import and export in Marathi

मित्रांनो आपण खुप जणांच्या तोंडुन इम्पोर्ट एक्सपोर्ट हा शब्द ऐकत असतो.

खुप जण म्हणतात की माझा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे.

किंवा मी इम्पोर्ट एक्सपोर्टचे काम करतो,भारत अमुक अमुक वस्तु इम्पोर्ट करतो अणि तमुक वस्तु एक्सपोर्ट करतो असे आपण नेहमी इतरांकडुन टिव्ही बातमीमध्ये वाचत ऐकत असतो.

तेव्हा अशा वेळी आपल्या मनात हाच एक प्रश्न निर्माण होत असतो की इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे काय?अणि या दोघांमध्ये काय फरक असतो?

आजच्या लेखात आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट या दोघांमध्ये काय फरक असतो हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

इम्पोर्ट म्हणजे काय? Import meaning in Marathi

इम्पोर्ट ह्या शब्दाला मराठीत आयात असे म्हटले जाते.आयात म्हणजे बाहेरून दुसरीकडुन मागवणे होय.

जेव्हा आपण एखादी वस्तु प्रोडक्ट बाहेरून,दुसरया ठिकाणाहुन,दुसरया शहरातुन,दुसरया देशातुन आपल्या देशात मागवत असतो.तेव्हा त्यास आयात असे म्हटले जाते.

थोडक्यात जेव्हा आपण एखादी वस्तु प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध नसल्यावर दुसरया शहरातुन जिल्हयातुन तसेच राज्यातुन,देशातुन मागवत असतो तेव्हा त्या प्रक्रियाला आयात असे म्हटले जाते.

आयात का केली जाते?

आपल्या देशांतर्गत बाजारपेठेत ग्राहकांकडुन ज्या वस्तुंची मागणी केली जात आहे त्या वस्तुंच्या मालाच्या मागणीची पुर्तता करायला अनेक देश इतर देशातुन वस्तुची तसेच मालाची आयात करत जात असतात.

एक्सपोर्ट म्हणजे काय?export meaning in Marathi

एक्सपोर्ट ह्या शब्दाचा अर्थ मराठीत निर्यात असा होत असतो.आपल्या देशातुन दुसरया देशात वस्तु पाठविणे होय.

See also  चंद्रयान ३ चे आज थेट प्रक्षेपण - सर्व शाळा तसेच विद्यापीठांमध्ये थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार युजीसीने दिले निर्देश- Chandrayan 3 soft landing live update

जेव्हा आपण एखादी वस्तु,प्रोडक्ट,सामान आपल्या शहरामधुन जिल्हयामधुन तसेच राज्यामधुन देशामधुन दुसरया ठिकाणी म्हणजे दुसरया शहरात,दुसरया जिल्हयात,दुसरया राज्यात दुसरया देशात इत्यादी ठिकाणी पाठवत असतो.तेव्हा त्यास निर्यात असे म्हटले जाते.

इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक आंतरराष्टीय पातळीवरील व्यापार आहे ज्यात कुठलीही आवश्यकता असलेली वस्तु तसेच सेवा एका देशातुन दुसरया देशात आणली जाते.नंतर मग ती वस्तु आयात करणारया देशामधील देशांतर्गत बाजारपेठेत विकली जात असते.

ज्या मालाचा पुरवठा उत्पादन आपल्या देशात खुप कमी आहे अणि त्याची मागणी आपल्या देशात जास्त आहे अशा मालाला परदेशातुन आयात केले जात असते.

निर्यात का केली जाते?

बाजारपेठेमधील असलेला आपला वाटा हिस्सा अधिक वाढवण्यासाठी तसेच जागतिक बाजारपेठेमधील उपस्थिती वाढावी ह्या हेतुने अनेक देश आपल्या देशातील मालाची दुसरया देशात निर्यात करत असतात.

इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस कशाला म्हणतात?Import export business meaning in Marathi

ज्या व्यवसायात बाहेरून वस्तु आयात केल्या जातात तसेच दुसरया देशात वस्तुंची निर्यात केली जाते अशा व्यवसायाला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस असे म्हणतात.

यात बाहेरून दुसरया ठिकाणाहुन माल मागवला जातो तसेच आपल्या देशातुन दुसरया देशात एका राज्यातुन दुसरया राज्यात माल पाठविला जात असतो.

इम्पोर्ट एक्सपोर्ट हा शब्द अधिकतम आंतरराष्टीय पातळीवर केल्या जाणारया वस्तुंच्या मालाच्या देवाण घेवाणीच्या व्यापारासाठी वापरला जात असतो.

इम्पोर्ट एक्सपोर्ट बददल इतर महत्वपूर्ण मुददे –

● कुठल्याही देशातुन वस्तुची मालाची आयात करण्याआधी वस्तुची आयात करणार असलेली कंपनी वस्तु निर्यात करत असलेल्या कंपनीची सर्व माहीती गोळा करत असते.ज्यात त्यांचा विक्री दर काय आहे वस्तुचे मालाचे कधी अणि कोठे होईल हे जाणुन घेणे तसेच इतर अटी नियम यांचा समावेश होत असतो.

● काही वस्तुंची मालाची बाहेरून आयात करण्यासाठी इम्पोर्ट लायसन्स म्हणजे आयात परवान्याची देखील आवश्यकता असते.

● वस्तुची मालाची निर्यात करत असलेली कंपनी परकीय देशातील कंपनी असल्याने परदेशातुन वस्तुची आयात करण्यासाठी आयात दारास परकीय चलन प्राप्त करावे लागत असते.वरील सर्व महत्वपूर्ण स्टेप्स पार पाडल्यानंतर आयातदार हा कुठल्याही वस्तुची मालाची निर्यात करण्यासाठी निर्यातदाराला आँडर करत असतो.

See also  मराठी सुविचार - marathi suvichar

● आयातीदवारे दुसरया देशातून आपल्या देशातील बाजारपेठेत माल आणण्यात मागवण्यात देशाचा पैसा खर्च होत असतो.तसेच निर्यातीत आपल्या देशातुन दुसरया देशात वस्तु तसेच माल जात असल्याने यातुन आपल्या देशाला पैसा प्राप्त होत असतो,देशाची कमाई होत असते.

● वस्तुची मालाची आयात करत असलेला देश वस्तुची मालाची निर्यात करत असलेल्या देशांकडुन कोटेशनची मागणी करतो मग जे देश वस्तुची मालाची निर्यात करत असतात ते ह्या कोटेशनमध्ये त्यांच्या मालाचे शुल्क,पेमेंट करण्याची सिस्टम,वस्तुची मालाची वितरणाची पदधत इत्यादी विषयी तपशीलवारपणे माहीती पाठवत असतात.

● जो देश मालाची खरेदी करणार आहे तो मालाची निर्यात करणारया निर्यातदाराला शाँर्टलिस्ट करून पाठवत असतो.ज्यात त्यांना कोणता माल किती हवा हे दिलेले असते.अणि मग शेवटी खरेदीदार निर्यातदारास माल पाठवायला सांगत असतो.

● दुसरया देशात माल पाठविण्यासाठी निर्यातदाराकडे निर्यातीचा परवाना म्हणजेच एक्सपोर्ट लायसन असावे लागते.

● माल आयात दाराकडे म्हणजेच दूसरया देशात पाठविण्याच्या आधी निर्यातदार माल पाठविण्याचे सीमा शुल्क क्लीअर करत असतात.