भारतीय राष्टगाण आणि राष्ट्रगीत –Difference Between National Anthem and National Song
जगातील सर्वात पहिले राष्टगाण हे ब्रिटन ह्या देशाचे होते.जे 1825 मध्ये लिहिले गेले होते.जे गाँड सेव्ह द किंग असे होते.पण नंतर 18 व्या शतकानंतर हेच ब्रिटनचे राष्टगाण राष्टगीत म्हणुन लोकप्रिय झालेले देखील आपणास दिसून येते.अनेक राजेशाही सत्कार,समारंभात याचे गायन देखील केले जात होते.
मग हे पाहुन19 व्या ते 20 व्या शतकात युरोपातील इतर देशांनी देखील ब्रिटनचे अनुकरण करण्यास सुरूवात केली.यात काही राष्टगाणांचे लेखन एका मुख्य हेतुसाठी केले गेले तर बाकी जशा पदधतीने त्यांची चाल आहे तशाच पदधतीने स्वीकार करण्यात आले होते.
याचप्रमाणे भारत देशामध्ये सुदधा अशाच दोन शब्दावलींचा प्रामुख्याने वापर केला जातो.ज्याला आपण राष्ट्रगाण(national anthem) आणि राष्टगीत(national song) असे म्हणतो.
आपल्यातील खुप जणांच्या मनात ही एक शंका असते की राष्टगाण आणि राष्ट्रगीत हे दोघे एकच आहे का?का या दोघांमध्ये काही फरक आहे आणि या दोघांमध्ये जर अंतर आहे तर ते कोणते आहे?
म्हणुन आजच्या लेखात आपण आपल्या मनातील ह्या सर्व शंका दुर करण्यासाठी राष्टगाण आणि राष्टगीत या दोघांविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.आणि या दोघांमधला फरक समजून घेणार आहोत.
भारताचे राष्टगाण(national anthem) कोणते आहे?
भारताचे राष्टगाण हे जन गन मन असे आहे.ज्याचे लेखन नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय कवी रविंद्रनाथ टागोर यांनी केले होते.रविंद्र नाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये भारतो भाग्य विधाता अशी याची रचना केली होती.
जन गन मन ह्या राष्टगाणाची शैली ही आपणास बंगाली आणि तत्सम बंगालीमध्ये असल्याची दिसुन येते.पण संस्कृत भाषेचा देखील बराच प्रभाव असलेला आपणास दिसुन येतो.
भारतो भाग्य विधाता ह्या रविंद्रनाथ टागोरांनी रचनेचा स्वीकार 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आला होता.भारताच्या संविधान सभेने राष्टगाण म्हणुन याचा स्वीकार केलेला आपणास दिसुन येते.
जन गन मन चे गायन हे सर्वप्रथम इंडियन नँशनल काँग्रेसने कोलकत्ता येथे भरवलेल्या अधिवेशनात सगळयांनी मिळुन केले गेले होते.
खर म्हणजे रविंद्र नाथ टागोर यांनी बंगाली भाषेत कवितेचे लेखन केले होते.ज्याच्यातील पाच कडव्यांमधुन एक कडवे हे राष्टगाण म्हणुन स्वीकारले गेले होते.
भारताचे राष्टगीत(national song) कोणते आहे?
भारताचे राष्टगीत हे वंदे मातरम असे आहे.ज्याचे बँकिमचंद्र चँटर्जी यांनी केले होते.
बकिमचंद्र चँटर्जी यांनी बंगाली भाषेत एक कविता लिहिली होती.ज्याचा त्यांनी आपल्या 1882 मध्ये लेखन केलेल्या बंगाली कादंबरीत आनंदमठमध्ये समावेश देखील केलेला आपणास दिसुन येतो.
आनंदमठ ह्या कादंबरीत हे गीत भवानंद नावाच्या संन्यासीने गायलेले आहे.याची धुन यददुनाथ भटाटाचार्यांनी बनवली होती.
ह्या राष्टगीताचे गायन करायला आपणास 65 सेकंद एवढा अवधी लागतो.
आपणा सर्वाना माहीत असावी अशी महत्वाची बाब म्हणजे जेव्हा राष्टगीताची निवड करण्याची वेळ आली होती तेव्हा वंदे मातरम ऐवजी नोबेल पुरस्कार विजेते कवी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलिले जन गन मनला राष्टगीतासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले होते.
कारण काही मुस्लिम धर्मियांनी वंदे मातरमला राष्टगीताचा दर्जा देण्यास विरोध दर्शवला होता.मुस्लिम धर्मियांचे असे म्हणने होते की ह्या वंद मातरम गीतामध्ये देवी दुर्गेला राष्टाचे रूप मानण्यात आले आहे.जे मुस्लिम धर्माच्या विरूदध आहे.
याचसोबत अनेक मुस्लिम धर्मियांचे असे देखील मत होते की हे गीत ज्या आनंदमठ कांदबरीतुन घेण्यात आले आहे त्या कादंबरीतुन मुस्लिम धर्माविरूदध लेखन केले गेले आहे.
मग 1937 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक संघटना स्थापित करण्यात आली आणि ह्या वादावर गंभीरपणे विचार करण्यात आला.ज्यात मौलाना अब्दुल कलाम आझाद हे देखील समाविष्ट होते.
मग ह्या राष्टगीताची पाहणी केल्यावर असे लक्षात आले की यातील सुरूवातीच्या दोन ओळीत मातृभुमीची प्रशंसा केली आहे पण बाकीच्या सर्व ओळीत हिंदु धर्माचा आणि हिंदु धर्मातील देवी देवतांचा उल्लेख करण्यात आला आहे.
याचसाठी ह्या गाण्याच्या फक्त सुरूवातीच्या दोन ओळी ह्या राष्टगीतासाठी निवडण्यात आल्या होत्या.
भारताचे राष्टगाण जनगन मन आणि राष्ट्रगीत वंदे मातरम या दोघांमध्ये काय फरक आहे? Difference Between National Anthem and National Song
- भारताच्या राष्टगाणाची रचना ही बंगाली कवी तसेच नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत केलेली आहे.
- भारताचे राष्टगाण जन गन मन असे आहे.
- रविंद्र नाथ टागोर यांनी बंगाली भाषेत 1911 मध्ये कवितेचे लेखन केले होते.ज्याच्यातील पाच कडव्यांमधुन एक कडवे हे राष्टगाण म्हणुन स्वीकारले गेले होते.
- 24 जानेवारी 1950 रोजी जन गन मनचा भारतीय संविधान सभेने राष्टगाण म्हणुन स्वीकार केला होता.
- जन गन मन हे बंगाली भाषेत लिहिले गेले असले तरी यावर संस्कृत भाषेचा अधिक प्रभाव आहे.
- भारताचे राष्टगाण जन गन मन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत देखील अनुवादीत करण्यात आले आहे.
- राष्टगान जन गन मनचे गायन सगळयात पहिले 27 डिसेंबर 1911 रोजी इंडियन नँशनल काँग्रेसद्वारे कोलकत्ता येथे भरवलेल्या अधिवेशनात सर्व मिळुन केले गेले होते.
- राष्टगाणाचे गायन करण्यास एकुण 52 सेकंद इतका कालावधी आपणास लागतो.
- भारताच्या राष्टगाणातुन भारत देशाची संस्कृती,सभ्यता,इतिहास यांचे गुणगान करण्यात आले आहे.
राष्ट्रगीत वंदे मातरम
- भारताच्या राष्टगीताची रचना बकिमचंद्र चँटर्जी यांनी केली आहे.
- वंदे मातरम ह्या राष्टगीताची रचना बकिमचंद्र चँटर्जी यांनी 1882 मध्ये संस्कृत तसेच बंगाली या दोन मिश्र भाषेत केली होती.
- भारताचे राष्टगीत वंदे मातरम असे आहे.
- भारताचे राष्टगीत हे बकिमचंद्र चँटर्जी यांनी बंगाली भाषेत आनंदमठ कादंबरीत लिहिलेल्या काही कवितेच्या ओळींतून घेण्यात आले होते.
- राष्टगीत वंदे मातरमचे गायन सगळयात पहिले 1896 मध्ये भारतीय राष्टीय काँग्रेसच्या सत्रामध्ये केले गेले होते.
- वंदे मातरम ह्या राष्टगीताच्या गायनाचा अवधी 52 सेकंद इतका असतो.
- 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरमचा भारतीय संविधान सभेने राष्टगीत म्हणुन स्वीकार केला होता.
- वंदे मातरमच्या पहिल्या दोन ओळी संस्कृत भाषेत आहे आणि बाकीच्या बंगाली भाषेत आहे.