Loan व Debt मध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

Loan आणि debt या दोघांमध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

loan आणि debt हे दोन असे शब्द आहेत.जे आपल्याला नेहमी आर्थिक देवाणघेवाणीचे म्हणजेच बँकेशी,फायनान्सशी संबंधित व्यवहार करत असताना अनेक वेळेस ऐकायला तसेच वाचायला मिळत असतात.
तसे पाहायला गेले तर आपण या दोघे शब्दांकडे एकच अर्थाने बघत असतो तो म्हणजे कर्ज तसेच उसने पैसे घेणे पण या दोघा शब्दांमध्ये काही मुख्य फरक देखील आहे जो आपणास माहीत नसतो.
आपल्याला हा मुख्य फरक माहीत व्हावा याचसाठी आजच्या लेखात आपण loan आणि debt म्हणजे काय असते?या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Loan म्हणजे काय?

4, कर्ज म्हणजे एक किंवा अधिक व्यक्ती, संस्थांनी दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्था इत्यादींना उसने दिलेले पैसे.
कर्ज घेणारा सामान्यतः कर्ज घेतलेल्या मूळ रकमेची परतफेड करण्यासाठी जबाबदार असतो तसेच त्या कर्जाची पूर्ण रक्कम परतफेड होईपर्यंत व्याज देण्यास ही जबाबदार असतो.

अडीअडचणीत तसेच स्वताचे घर विकत घेण्यासाठी,कार घेण्यासाठी,स्वताचा व्यवसाय सुरू करण्यासाठी,परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी अशा विविध कारणांसाठी जेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात.
तेव्हा आपण अशा परिस्थितीत एखाद्या सावकाराकडून ,बँकेकडुन तसेच फायनान्स एजंसीकडुन काही ठाराविक वर्षाच्या मुदतीवर आपण काहीतरी मौल्यवान वस्तु गहाण ठेवून उसने पैसे घेत असतो.ज्याचे आपल्याला त्या बँकेला ठरलेल्या प्रमाणे व्याज देखील द्यावे लागत असते.त्यालाच loan असे म्हणतात.
Loan घेण्यासाठी आपल्याला काही ठाराविक documents ची आवश्यकता भासत असते.
आपल्याला किती कर्ज प्राप्त होईल हे आपल्या job तसेच income वर पुर्णपणे आधारीत असते.तसेच येथे loan देण्याआधी आपल्या क्रेडिटची देखील तपासणी केली जात असते.
यात तोटा एकच असतो की आपण घेतलेले loan जर ठरलेल्या मुदतीत व्याजासह नाही फेडले तर आपण आपली जी वस्तु बँकेत गहाण तसेच तारण ठेवलेली असते.
उदा,आपल्या property चे काही important documents वगैरे तर बँकेकडुन आपल्या त्या property वर ताबा घेतला जात असतो.

See also  फायनान्शिअल लिटरेसी म्हणजे काय? - Financial literacy meaning in Marathi

Loans चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

Loans चे पुढीलप्रमाणे वेगवेगळे प्रकार असतात-
● Education loan
● Home loan
● Car loan
● Mortgage loan
● Business loan
● Gold loan

Loan घेण्याचे फायदे कोणकोणते असतात?

Loan घेण्याचे फायदे पुढीलप्रमाणे काही प्रमुख फायदे असतात-
1) कमी व्याजदरात आपण आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढे loan आपण घेऊ शकतो.म्हणजेच कमी व्याजदरात आपणास कर्ज उपलब्ध होत असते.
2) जेव्हा आपण business साठी बँकेकडुन loan चे पैसे घेत असतो तेव्हा आपल्याला त्यावर भरलेल्या व्याजाच्या मोबदल्यात tax benefit देखील प्राप्त होत असतो.

Debt म्हणजे काय?

जेव्हा government किंवा एखादे public corporation Bond issue करून म्हणजेच रोखे किंवा डिबेंचर जारी करून मार्केटमधून पैसे म्हणजेच निधी(fund) गोळा करत असते,तसेच पैसे उभारण्याचा प्रयत्न करत असते.त्याला debt असे म्हण्टले जाते.
हे देखील एक प्रकारचे कर्जच असते ज्याला आपण debt असे म्हणत असतो.
यात एखादी संस्था तसेच सरकार बाजारातुन पैसे गोळा करण्यासाठी बाँण्ड जारी करत असते.या debt चा वापर मार्केटमधील विविध corporation तसेच individual person मोठया खरेदीसाठी करत असतात.
ही एक debt arrangement असते.जी कर्ज घेत असलेल्या पार्टीला आपल्या काही अटी तसेच नियमांवर पैसे उधार घेण्याची परवानगी देत असते.(सदर पैसे ठरलेल्या तारखेत व्याजासोबत परत केले जावे या अटीसोबत)
बॉण्ड्स हे कर्जाचे साधन असते जे कंपनीला तिच्या गुंतवणूकदारांना परतफेडीचे वचन घेऊन निधी उभारण्यास सक्षम करत असते.
थोडक्यात मार्केटमधुन fund collect करण्यासाठी विविध corporation कडुन bond च्या स्वरुपात कर्ज जारी केले जात असते.त्यालाच debt म्हटले जाते.

Debt हे कोणत्या चार श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जाते

Debt हे पुढील चार श्रेणीत वर्गीकृत केले जाते-
● Secured debt
● Unsecured debt
● Mortgage debt
● Revolving debt
● Corporate debt
Debt चे फायदे कोणकोणते असतात?
● मोठमोठया कॉर्पोरेशन,कंपनी तसेच संस्था त्यांच्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी आणि इतर व्यावसायिक गरजांसाठी debt दवारे बाजारातुन पैसे म्हणजेच भांडवल जमा करत असते.
[ultimate_post_list id="39129"]