३ मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष
- ३ मे रोजी १७१५ मध्ये संपुर्ण सुर्यग्रहण उत्तर आशिया अणि उत्तर युरोप मध्ये दिसुन आले होते.
- ३ मे १८०२ रोजी वाॅशिंगटन डिसी ह्या शहराची स्थापना करण्यात आली होती.
- ३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मुक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबई येथील काॅरोनेशन चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता.
- दादासाहेब फाळके यांनी निर्मिती केलेला हा चित्रपट मराठी अणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट म्हणुन ओळखला जातो.
- ३ मे १९३९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आॅल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक हा पक्ष स्थापित केला होता.
- ३ मे १९४७ रोजी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काॅग्रेसची स्थापणा करण्यात आली होती.
- ३ मे १८१८ रोजी चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म झाला होता.
- ३ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा जन्म झाला होता.
- ३ मे १९५९ रोजी उमा भारती भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या यांचा जन्म झाला होता.
- १८९६ रोजी भारताचे संरक्षणमंत्री व्हीके मेनन यांचा जन्म झाला होता.
- ३ मे १९६९ रोजी भारताचे तिसरे राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न पद्मविभूषण पुरस्कारविजेते झाकीर हुसेन यांचे निधन झाले होते.
- ३ मे २०११ रोजी कवी तसेच गीतकार म्हणून ओळखले जाणारे जगदीश खेबुडकर यांचे निधन झाले होते.
- ३ मे २००९ रोजी राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन झाले होते.
- ३ मे २००६ रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन झाले होते.
- ३ मे २००० रोजी शकुंतला बाई परांजपे ज्येष्ठ समाजसेविका यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९९६ रोजी व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९८१ रोजी हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद उर्फ नर्गिस यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९७८ रोजी लेखक कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९७७ रोजी मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाणारे हमीद दलवाई यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९७१ रोजी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजय गाडगीळ यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९१२ रोजी उर्दु कादंबरीचे जनक म्हणून ओळखले जाणारे उर्दू लेखक समाजसुधारक नझीर अहमद देहलवी यांचे निधन झाले होते.
- ३ मे १८९८ रोजी इस्राईल देशाच्या चौथ्या अणि पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म झाला होता.
- ३ मे १९९९ रोजी एॅडविन जसकु लसकी हया ९६ वर्षीय वृद्ध व्यक्तीने १०० मीटर धावण्याची शर्यत अवघ्या २४.४ सेकंदात पुर्ण करण्याचा विक्रम नोंदविला होता.
- ३ मे १९७३ मध्ये शिकागो मधील १४५१ फुट उंच अणि १०८ मजले असणारी सिअर्स टाॅवर्स ही त्या काळातील जगातील सर्वात ऊंच इमारत बनली होती.
- ३ मे २००२ रोजी भारताचे उद्योजक म्हणून ओळखले जाणारे एम एस ओबेरॉय यांचे निधन झाले होते.
- ३ मे १९२४ रोजी टायरल रेसिंगचे संस्थापक केन टायरल यांचा जन्म झाला होता.
- ३ मे २००५ मध्ये भारतीय कमांडर जगजित सिंह अरोडा यांचे निधन झाले होते.
- ३ मे २००३ मध्ये व्यंकटेशन तामिळ चित्रपट निर्मात्याचे निधन झाले होते.
- ३ मे १९३० रोजी भारतीय जनता पक्षाच्या सुमित्रा सिंह यांचा जन्म झाला होता.
- ३ मे २००८ रोजी भारतीय टाटा स्टील कंपनीला ब्रिटन मधील कोळसा खाण घेण्याचा परवाना प्राप्त झाला होता.