शेतकरयांना फळबाग लागवडीसाठी शासन देते आहे १०० टक्के अनुदान –  Falbag Lagwad Anudan Yojana In Marathi

शेतकरयांना फळबाग लागवडीसाठी शासन देते आहे १०० टक्के अनुदान –  Falbag Lagwad Anudan Yojana In Marathi

ज्या शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करायची आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

असे शेतकरी ज्यांना आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची आहे अशा शेतकरयांना शासनाकडून फळबाग लागवडीसाठी ९० टक्के अनुदान दिले जात आहे.

ज्या शेतकरी बांधवांना शेतीमधुन फळबाग लागवड करून चांगले उत्पन्न प्राप्त करायचे आहे पण फळबाग लागवडीसाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी चालुन आली आहे.

अणि आता फळांची विक्री सुदधा खुप चांगल्या दरामध्ये होऊ लागली आहे त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत ९० टक्के अनुदानावर फळबाग योजनेकरीता आॅनलाईन पदधतीने अर्ज मागवायला देखील सुरूवात झाली आहे.

ह्या योजनेकरीता एक कोटी ६८ लाख इतका निधी शासनाकडून मंजुर करण्यात आलेला आहे.अणि हा निधी शेतकरयांना फळबाग लागवडीसाठी अनुदान म्हणून वितरीत केला जाणार आहे.

जे शेतकरी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये पात्र ठरले नव्हते अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने संदर्भ क्रमांक एक नुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा आरंभ केला आहे.

भाऊसाहेब फुंडकर योजना ही २०१८-२०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती.हया योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरयांना मंजुर करण्यात आलेले अनुदान हे एकुण तीन टप्यात दिले जाणार आहे.

ह्यामध्ये पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना अनुदानाची पन्नास टक्के रक्कम दिली जाते मग दुसरया वर्षी ३० टक्के इतकी अनुदानाची रक्कम दिली जाते मग तिसरया वर्षी उर्वरीत २० टक्के अनुदानाची रक्कम दिली जात असते.

असे एकुण शंभर टक्के अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी ह्या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.

ह्या योजनेचा लाभ अनुसुचित जाती जमाती मधील शेतकरी वर्गासोबत इतर शेतकऱ्यांना देखील घेता येणार आहे.

फक्त शेतकरयांना अनुदान देण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत लाभार्थी शेतकऱ्यांना दुसरे तसेच तिसरया वर्षीचे अनुदान देण्याअगोदर त्या शेतकरीने एकुण लागवड केलेल्या वृक्षांचे प्रमाण बघण्यात येत असते.

See also  कमी वेळात जास्त अभ्यास कसा करावा? (How To Study More In Less Time)

हे प्रमाण बागायती झाडांकरीता ९० टक्के तर क़ोरडवाहु झाडांकरीता किमान ८० टक्के असावे लागते.समजा ह्या प्रमाणात कमतरता आढळुन आली तर लाभार्थी शेतकऱ्याला स्वता खर्च करून झाडे आणावी लागतील अणि झाडांचे प्रमाण जसे असणे आवश्यक आहे.ते राखावे लागणार आहे.

हया योजनेमध्ये शेतकरी कोकण विभागामध्ये किमान दहा गुंठे अणि जास्तीत जास्त दहा हेक्टर इतका मर्यादित क्षेत्र लाभ घेऊ शकतील.

अणि इतर विभागातील किमान २० गुंठा अणि कमाल ६ हेक्टर मर्यादित क्षेत्र इतका लाभ घेऊ शकतात.

योजनेसाठी लागत असलेली महत्वाची कागदपत्रे –

आधार कार्ड

बॅक खाते पासबुक

सात बारा उतारा

आठ अ उतारा

हमीपत्र

अनुसूचित जाती जमाती मधील शेतकरी वर्गाकरीता जातीचे प्रमाणपत्र

सर्व पात्र शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.सदर योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपली निवड होण्यास वेळ लागेल.

योजनेसाठी आपली निवड झालेल्या शेतकऱ्यांना महडिबीटीच्या पोर्टलवर जाऊन आवश्यक ते डाॅकयुमेंट अपलोड करायचे आहे.

यानंतर शेतकरयाने झाडे लावण्यास सुरुवात केल्यावर अनुदान हे त्याला तीन टप्प्यांत दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक –

Https://Mahadbt.Maharashtra.Gov.In/Farmer/Login/Login

Leave a Comment