ईपीएफ मेंबरशीपकरीता ई नाॅमिनेशन कसे करायचे आहे? -File e-Nomination online through UAN

ईपीएफ मेंबरशीपकरीता ई नाॅमिनेशन कसे करायचे आहे? – File e-Nomination online through UAN

ज्यांना आपला पीएफ अकाउंट मधील बॅलन्स चेक करायचा आहे पासबुक चेक करायचे आहे अशा सर्व व्यक्तींनी आपल्या पीएफ अकाउंटवर नाॅमिनी अॅड करणे आवश्यक आहे.कारण आता हे यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे

सर्वात पहिले आपणास आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मधील क्रोम ब्राऊझर ओपन करून epfindia.gov.in असे सर्च बार मध्ये टाईप करायचे आहे.

ईपीएफ मेंबरशीपकरीता ई नाॅमिनेशन कसे करायचे आहे - File e-Nomination online through UAN

यानंतर आपल्यासमोर ईपीएफ ची आॅफिशिअल वेबसाईट htttps://www.epfindia.gov.in ह्या नावाची वेबसाईट स्क्रीनवर दिसेल ह्या वेबसाईटवर आपणास व्हिझिट करायचे आहे.

 1. वेबसाईट वर गेल्यावर आपल्यासमोर होम पेज ओपन होईल होम पेज वर आपणास वेगवेगळे मेन्यू दिसुन येतील.
 2. यानंतर आपणास online claim member account transfer वर क्लिक करायचे आहे.
 3. यानंतर आपल्यासमोर epf member unified portal ओपन होईल तिथे आपणास login page दिसुन होईल इथे आपणास आपला UAN number अणि password टाकायचा आहे तसेच खाली दिलेला कॅपच्या जसाच्या तसा भरायचा आहे.यानंतर खाली दिलेल्या sign in बटणावर क्लिक करायचे आहे.
 4. Sign in वर क्लिक केल्यावर आपणास alert मध्ये काही माहीती दिली जाईल त्याच्या खाली दिलेल्या esigh आॅप्शन वर क्लिक करायचे आहे किंवा आपण हे क्लोज करून manage मधील ई नाॅमिनेशन वर जायचे आहे.
 5. इथे आपणास सर्वप्रथम आपला फोटो अॅड करण्यास सांगितले जाईल.unable to proceed please upload your profile photograph
 6. Photo graph अपलोड करण्यासाठी आपणास view मेनयु मध्ये जायचे आहे अणि profile वर क्लिक करायचे आहे.इथे आपणास आपला कुठलाही फोटो दिसुन येणार नाही फोटो अपलोड करायला आपल्याला change photo वर क्लिक करायचे आहे.अणि browse वर क्लिक करायचे आहे अणि आपला फोटो अपलोड करायचा आहे.
 7. यानंतर preview मध्ये जाऊन एकदा आपला फोटो चेक करून घ्यायचा आहे.अणि upload photograph वर क्लिक करायचे आहे.फोटो सिलेक्ट केल्यावर आपला फोटो आपल्या प्रोफाईल फोटो मध्ये अपलोड होऊन जाईल.
 8. यानंतर आपली नाॅमिनेशन डिटेल अपडेट करण्यासाठी आपणास पुन्हा manage मेन्यू मध्ये जाऊन e nomination वर क्लिक करायचे आहे.
 9. यानंतर आपणास आपली प्रोफाईल डिटेल चेक करून खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे.
 10. यानंतर आपल्यासमोर family declaration नाव येईल इथे आपणास आपली फॅमिली डिक्लेरेशन माहीती भरायची आहे.
 11. आपली फॅमिली असल्यास having family मध्ये yes करायचे नसेल तर no करायचे आहे.
 12. यानंतर आपणास आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीला आपला नाॅमिनी लावायचे त्याची माहीती भरायची आहे.
 13. ह्या माहितीमध्ये सर्वप्रथम आपल्या नाॅमिनीची आधार डिटेल भरायची आहे.त्याचे नाव टाकायचे आहे.त्याची जन्मतारीख टाकायची आहे.तो नाॅमिनी पुरूष आहे की महिला हे टाकायचे आहे.
 14. आपले त्या नाॅमिनी सोबत काय नाते आहे ते देखील टाकायचे आहे.तो नाॅमिनी आपली पत्नी आहे का आई आहे का मुलगा मुलगी आहे हे इत्यादी इथे टाकायचे आहे.
 15. यानंतर नाॅमिनीचा पुर्ण पत्ता टाकायचा आहे.नाॅमिनीची बॅक अकाऊंट माहीती देखील भरायची आहे.यानंतर नाॅमिनीचा एक फोटो अपलोड करायचा आहे.
See also  जागतिक मार्बल दिवस काय आहे?, इतिहास | World Marbles Day In Marathi

यानंतर खाली दिलेल्या disclaimer ला सिलेक्ट करायचे आहे अणि खाली दिलेल्या save family details बटणावर ओके करायचे आहे.यानंतर आपल्या नाॅमिनीची भरलेली सर्व डिटेल सेव्ह होऊन जाईल.ही माहीती आपल्याला खाली epf nomination मध्ये दिसुन येईल.

Epf nomination मध्ये आपणास उजव्या बाजूला दिलेल्या percentage of share मध्ये जाऊन परसेंटेज आॅफ बेनिफिट टाकायचे आहे.

यानंतर डाव्या बाजूला येऊन नाॅमिनीला सिलेक्ट करायचे आहे अणि खाली दिलेल्या save nomination वर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर eps details successfully saved असे नाव आपल्यासमोर येईल.

पीएफ अकाउंट धारकाला आपल्या सर्व नाॅमिनेशनला पुर्ण करण्यासाठी ई साईन करायचे आहे.आपल्या पीएफ अकाउंटला आधारच्या साहाय्याने ई व्हेरीफाय करून घ्यायचे आहे.

ई साईन वर क्लिक केल्यावर आपणास esigh not registered असा एक मेसेज स्क्रीनवर दिसेल त्याच्या खाली दिलेल्या proceed बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर डिजीटल इंडियाची वेबसाईट ओपन होईल इथे आपणास आपल्या आधार कार्डची वर्चुअल आयडी टाकायचा आहे.हा वर्चुअल आयडी आधार कार्डवर आधार नंबरच्या खाली दिलेला असतो.

आधार कार्ड मध्ये दिलेला वर्चुअल आयडी बघुन तो इथे आपणास enter virtual id मध्ये टाकायचा आहे.

अणि खाली दिलेल्या disclaimer ला सिलेक्ट करून verify वर क्लिक करायचे आहे.

यानंतर पुन्हा एकदा चेक बाॅक्स वर क्लिक करून disclaimer ला सिलेक्ट करायचे आहे

यानंतर आपल्यासमोर aadhar based e authentication असे नाव येईल इथे आपणास आपला आधार नंबर टाकायचा आहे.अणि send otp वर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर रेजिस्टर आहे त्यावर एक ओटीपी पाठविला जाईल तो इथे enter otp मध्ये आपणास टाकायचा आहे.

पुन्हा खाली दिलेल्या disclaimer ला सिलेक्ट करून घ्यायचे आहे अणि खाली दिलेल्या submit बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर स्क्रीनवर एक मेसेज येईल pf sigh successfully यानंतर आपला नाॅमिनी यशस्वीपणे अॅड झाला आहे असा याचा अर्थ होतो.

See also  भारतीय युवा वर्ग भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून परदेशात का जात आहे? – Why Indians renounced citizenship

जर आपणास आपले ईनाॅमिनेशन स्टेटस चेक करायचे असेल तर आपल्याला manage मध्ये जाऊन e nomination वर क्लिक करायचे आहे.

यानंतर nomination history मध्ये आपले स्टेटस आपणास nomination successfully असे दाखवेल.

आपल्याला जर आपली नाॅमिनी डिटेल डाऊनलोड करायची असेल तर नाॅमिनी डिटेल पीडीएफ फाईल वर क्लिक करायचे आहे.अणि पीडीएफ फाईल सेव्ह करून घ्यायची आहे.

सर्व माहिती आपणास व्यवस्थित स्क्रीनवर दिसावी म्हणून लाॅग इन करण्याच्या आधीच मोबाईल डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करून घ्यायचा आहे यासाठी सर्वात पहिले आपल्या अॅड्राॅईड मोबाईल मधील क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचे आहे

यानंतर वर उजव्या बाजूला कोपरयात दिलेल्या तीन डाॅटवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपणास सर्वात खाली desktop site असे एक आॅप्शन दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.

याने आपणास मोबाईल वर देखील कंप्युटर वरील डेस्कटॉप प्रमाणे स्क्रीन करून सर्व माहिती व्यवस्थित बघता येईल.