ग्रो एप्लीकेशन इन्वेस्टमेंट विषयी माहीती – Groww app information in Marathi

ग्रो एप्लीकेशन – Groww app information in Marathi

आज आपल्याला प्रत्येकाला आपल्या पैशांची गुंतवणुक करायची असते.आणि गुंतवणुक म्हटले तर सगळयात पहिला पर्याय आपल्यापुढे शेअर मार्केट हाच येत असतो.आणि आज जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर आपण प्रत्येक जण असलेल्या बर्‍याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म पर्याया मधून ग्रो अँपचा वापर करणे अधिक पसंद करतो.

कारण ग्रो अँप हे एक असे अँप आहे जे आपल्याला आपल्या पैशांची गुंतवणुक करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.ह्या अँपचा वापर करून आपण आपले पैसे शेअर मार्केटमध्ये तसेच म्युच्अल फंडमध्ये एस आयपी मध्ये देखील गुंतवु शकतो.

ह्याचसाठी आज आपण ग्रो अँपविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ग्रो अँप काय आहे? – Groww app information in Marathi

 

  • ग्रो अँप हे एक अँप्लीकेशन आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो.ग्रो अँपचा वापर करून आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करू शकतो.म्युच्अल फंडमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो.ग्रो अँपचा वापर करून आपण काही मिनिटातच शेअर्सची खरेदी विक्री करू शकतो.ग्रो अँप हे डिमँट अकाऊंट ओपन करण्यासाठी फार प्रसिदध अँप्लीकेशन मानले जाते.
  • ग्रो अँपचा वापर आज करोडो लोक करताना आपणास दिसुन येत आहे.आज प्ले स्टोअरवर एक करोड पेक्षा अधिक संख्येने ही अँप डाऊनलोड केली गेलेली आपणास दिसुन येते.
  • ह्या अँपचे रेटिंग देखील खुप चांगले असलेले आपणास दिसुन येतात.सुमारे 4 इतकी रेटिंग ह्या अँपला आहे.

ग्रो अँप कोणी सुरू केले आहे?ग्रो अँप सुरू केलेल्या कंपनीचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

 ग्रो अँप हे नेक्सट बिलियन टेक्नाँलाँजी ह्या कंपनीच्या वतीने तयार तसेच सुरू केलेले अँप आहे.ह्या कंपनीचे मुख्य कार्यालय भारतामध्ये बंगलोर येथे आहे.याचे सीईओ ललित केशरी हे आहेत.

ग्रो अँपवर आपले अकाऊंट तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?

 ग्रो अँपवर आपले अकाऊंट तयार करण्यासाठी आपल्याला काही महत्वाची कागदपत्रे लागत असतात आणि ती महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे असु शकतात.

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • बँक अकाऊंट नंबर
  • आपला मोबाईल नंबर
  • आणि केवायसी व्हेरीफिकेशन करण्यासाठी स्वताचा एक सेल्फी फोटो
See also  आपले इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस कसे तपासायचे?How to check income tax refund status in Marathi

ह्या अँपचे वैशिष्टय असे आहे की इथे आपल्याला आपली कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागत नसतात.इथे आपल्याला फक्त आपला पँन आणि आधार नंबर टाकावा लागतो.

मग आपल्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर पाठवला जात असतो.तो तिथे इंटर करायचा असतो.मग शेवटी आपल्याला आपला एक फोटो काढुन तिथे अपलोड करावा लागतो.हा फोटो कधी काढायचा हे अँपदारेच आपल्याला सुचित केले जात असते.आणि मग दिलेल्या सर्व अँक्टिव्हिटी पुर्ण केल्यानंतर आपले अकाऊंट ग्रो अँपवर तयार होऊन जात असते.

ग्रो अँपचा आपल्याला फायदा काय आहे? – Grow app information in Marathi

  ग्रो अँपचा वापर करून आपण एकदम सहज आणि सोप्या पदधतीने आपले पैसे आपल्याला पाहिजे तिथे गुंतवू शकतो.

  • ह्या अँपचा वापर करून आपण आपले पैसे शेअर मार्केट,म्युच्अल फंड ( Information about Mutual Fund in Marathi ),एस आयपी इन्व्हेस्टमेंट प्लँन अशा विविध ठिकाणी गुंतवू शकतो.
  • ह्या अँपचा वापर करून आपण आपल्या पैशांमध्ये वाढ कशी करायची आणि आपली जास्तीत जास्त प्रगती कशी करायची हे शिकु शकतो.

ग्रो अँपवर आपले अकाऊंट सुरू करत असताना आपल्याला जर काही अडचण आली तर आपण काय करू शकतो?

 ग्रो अँपवर आपले अकाऊंट सुरू करत असताना समजा आपल्याला काही अडचण आली तर आपण ग्रो अँपच्या टीमशी त्वरीत संपर्क साधू शकतो.

 यासाठी आपल्याला दोन पर्याय दिले गेले आहेत यात आपण ग्रो अँपच्या टीमशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या कस्टमर केअर सेंटरवर काँल करू शकतो.किंवा त्यांच्या आँफिशिअल ईमेलवर मेल करू शकतो.

ग्रो अँप कस्टमर केअर नंबर -9108800604

ग्रो अँप ईमेल -support@grow.in

ग्रो अँपची मुख्य वैशिष्टये कोणकोणती आहेत?

 इथे आपल्याला अकाऊंट ओपन करण्यासाठी कुठलाही चार्ज द्यावा लागत नसतो.

  • इथे आपल्याला शुन्य ब्रोकरेज चार्ज लागत असतो.
  • ह्या अँपवरची सर्व प्रक्रिया आँनलाईन आणि फास्ट आहे म्हणजेच पेपरलेस पदधतीची आहे.

आपण ग्रो अँपवर आपले अकाऊंट कसे तयार करू शकतो?

  • ग्रो अँपवर आपले अकाऊंट तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जाऊन ग्रो अँप ऊनलोड तसेच इंस्टाँल करावी लागेल.
  • मग इंस्टाँल करून झाल्यानंतर अँपमध्ये जाऊन आपल्या गुगल अकाऊंटवरून लाँग इन करावा लागते.
  • यानंतर आपल्याला आपला पिन नंबर तसेच फिंगरप्रिंट तिथे इंटर करायचा असतो.
  • यानंतर आपल्यापुढे कम्पलीट अकाऊंट सेट अपचे आँप्शन येते.तिथे ओके करावे लागते.
  • यानंतर आपल्याला ही अँप आपला ट्रेडिंगमध्ये असलेला अनुभव विचारत असते.आपल्याला जेवढा अनुभव ट्रेडिंगमध्ये असेल तो आपण इथे सिलेक्ट करू शकतो.किंवा ट्रेडिंगचा काहीच अनुभव नसेल तर नो एक्सपिरियंस ह्या आँप्शनला सिलेक्ट करू शकतो.
  • यानंतर इथे आपल्याला आपली एक सेल्फी काढावा लागत असते.मग आपल्याला तिथे एक कोड दिला जातो जो आपल्याला मोठया आवाजात व्हिडिओ द्वारे रेकाँर्ड करून पाठवावा लागतो.
  • यानंतर आपल्याला आपल्या पँन कार्डचा एक फोटो देखील तिथे द्यावा लागत असतो.आधीपासुनच जर आपण पँनकार्डचा फोटो काढुन ठेवला असेल तर तो इथे सबमीट करू शकतो किंवा तिथे दिलेल्या कँमेरा आँप्शनचा वापर करून तत्काल एक पँनकार्डचा फोटो काढुन सबमीट करू शकतो.
  • यानंतर लुक्स गुड ह्या बटणवर क्लीक करायचे मग आपल्याला आपले अँड्रेस व्हेरीफिकेशन देखील करावे लागते यासाठी आपण आपले आधार कार्ड,पासपोर्ट,ड्राइव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक डाँक्युमेंट सबमीट करू शकतो.
  • मग अँड्रेस व्हेरीफिकेशनसाठी आधार कार्ड,पासपोर्ट,ड्राइव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक डाँक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्या फ्रंट साईडचा एक फोटो काढावा लागतो.
  • मग लूक्स गुड ह्या आँप्शनवर क्लीक करून आपण डाँक्युमेंटच्या मागच्या बाजुचा देखील एक फोटो काढायचा असतो.
  • मग यानंतर आपल्याला आपल्या डाँक्युमेंटसचा आयडी नंबर तसेच विचारली गेलेली इतर माहीती देखील भरायची असते.
See also  50 World's largest companies - कोणती कंपनी कोणत्या देशाची - company belongs to which country

आणि शेवटी कन्फर्म बटणवर ओके करायचे असते.

  • यानंतर आपले सिग्नेचर म्हणजेच सही देखील व्हेरीफाय केली जात असते.मग इथे आपल्याला आपली एक सही करावी लागते.
  • मग त्यानंतर आपल्यासमोर आधार ई साईनचे आँप्शन येत असते.मग आपल्याला प्रोसिड टु आधार ई साईन ह्या बटणवर क्लीक करायचे असते.यानंतर आपल्यासमोर ई साईनचे एक पेज ओपन होत असते.तिथे साईन नाऊ बटणवर आपण क्लीक करायचे असते.
  • यानंतर आपल्यासमोर एन एस डीएलची साईट ओपन होत असते.इथे मग आपण चेक बाँक्समध्ये क्लीक करून आपला आधार नंबर किंवा व्हर्चुअल आयडी नंबर फील करू शकतो.मग त्यानंतर सेंड ओटीपी वर ओके केल्यावर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जात असतो.तो ओटीपी इंटर करून व्हेरीफाय ओटीपी ह्या आँप्वनवर क्लीक करायचे असते.
  • यानंतर थोडयाच कालावधीत आपली ईसाइनची प्रक्रिया पुर्ण होऊन जाते आणि आपले ग्रो अँप अकाऊंट सुरू होऊन जात असते.आणि आपले अकाऊंट यशस्वीपणे तयार झाले आहे असा एक मँसेज देखील लगेच आपल्याला येत असतो.
  • चोविस तासाच्या आतच आपले अकाऊंट हे अँक्टिव्ह होऊन जात असते यानंतर आपण ट्रेडिंग करू शकतो.आणि म्युच्अल फंड एस आयपी प्लँन किंवा स्टाँक मार्केटमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो.

ग्रो अँपद्वारे आपल्या पैशांची गुंतवणुक कशी करायची? – Groww app information in Marathi

 ग्रो अँप ही एक अशी अँप आहे जिचा वापर करून आपण सहज आणि सोप्या पदधतीने कुठेही आपले पैसे गुंतवू शकतो.

  • आपले ग्रो अँपचे अकाऊंट अँक्टिव्हेट झाल्यानंतर सर्वप्रथम आपले पैसे इन्व्हेस्ट करताना आपल्याला आपला एक पिन विचारला जातो जो आपण तिथे इंटर करायचा असतो.
  • त्यानंतर मग आपण ग्रो अँपमधील आपल्या व्हाँलेट मध्ये पैसे अँड करू शकतो.
  • व्हाँयलेटमध्ये पैसे अँड केल्यानंतर आपल्याला स्टाँक मार्केट,म्युच्अल फंड,गोल्ड हे तीन पर्याय दिसुन येत असतात इथे आपल्याला ठरवायचे असते या तिघांपैकी कुठे आपल्याला आपले पैसे गुंतवायचे आहे.जिथे आपल्याला योग्य वाटेल तिथे आपण आपले पैसे गुंतवू शकतो.
See also  आयई एक्सच्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता शेअर २०० च्या पार जाणार - IEX shares

ग्रो अँपविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

 1) ग्रो अँप ही एक सुरक्षित अँप आहे का?

 ग्रो अँप ही करोडोंच्या संख्येत लोकांनी डाऊनलोड केलेली अँप आहे.आणि ह्या अँपचे रेटिंग 4 .4 इतके आहेत.आणि ह्या अँपबाबद अनेक लोकांनी पाँझिटिव्ह फिडबँक देखील दिला आहे.यावरून आपल्याला अंदाजा येऊन लागतो की एवढया करोडोच्या संख्येत ही अँप लोक वापरलं जात असून ये एक विश्वसनीय अँप आहे.

शेअर मार्केट अभ्यास साथ ऑनलाइन माहिती करता

 

 

Disclaimer

All investments, including share Market  is speculative in nature and involves substantial risk of loss. We encourage all investors to invest carefully. We also encourage investors to get personal recommendations and advice from your expert professional investment advisor and to also make independent investigations before acting on information that we publish.

1 thought on “ग्रो एप्लीकेशन इन्वेस्टमेंट विषयी माहीती – Groww app information in Marathi”

Comments are closed.