कमर्शियल पायलट कसे बनावे?How to become commercial pilot
जेव्हा आपण आकाशातील उंच भरारी घेणाऱ्या विमानाकडे बघतो तेव्हा आपल्याला देखील वाटते की एक दिवस मी देखील अशाच एका विमानात बसावा.अणि उंच आकाशात भरारी घ्यावी.
पण काही मुले मुली अशी देखील असतात ज्यांना विमानात बसायचीच ईच्छा नसते तर त्यांना विमान चालवायची देखील इच्छा असते.
खुप जणांचे स्वप्र असते की आपण पायलेट बनावे पायलेट बनून विमान चालवत आकाशात उंच उंच भरारी घ्यावी.
आपल्याला देखील पायलेट बनायचे आहे पण पायलेट बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?कोणती परीक्षा द्यावी लागते?कोणता कोर्स करावा लागतो?हे आपणास माहीत नसेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.
आजच्या लेखात आपण पायलेट बनण्यासाठी काय करायला हवे हे एकदम सविस्तरपणे समजुन घेणार आहोत.
तसे पाहायला गेले तर पायलेट बनणे ही एक छोटी मोठी गोष्ट नाहीये यासाठी आपल्याला खुप अभ्यास करावा लागत असतो.अणि पायलेट देखील एकच प्रकारचा नसतो त्याचे देखील विविध प्रकार असतात.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या पायलेटसला वेगवेगळ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
पायलेट कोण असतो?
पायलेट यालाच आपण मराठीत वैमानिक असे म्हणत असतो.
पायलेट हा एक असा प्रोफेशनल व्यक्ती असतो जो हवेत विमान चालवण्याचे काम करत असतो.मुख्य पायलेट सोबत विमानात एक सहाय्यक पायलट देखील असतात.
हे एक जबाबदारीचे काम असते ज्यात पायलेटला सर्व विमानात बसलेल्या यात्रेकरूंना सुरक्षित आपल्या गंतव्य स्थानी पोहोचवायचे असते.
म्हणुन कुठलाही पायलट हा पुर्णपणे फिजीकली अणि मेंटली फिट असणे आवश्यक असते.
भारतातील पायलेटचे मुख्य प्रकार –
भारतात दोन प्रकारचे पायलेट आहेत-
१) सिव्हील अॅव्हीएशन –
सिव्हील अॅव्हीएशन मध्ये आपल्याला कमर्शियल पायलट बनता येते.
कमर्शियल पायलट हा एक वैमानिक असतो जो एखाद्या सरकारी किंवा गैरसरकारी इंडियन एअरलाईन अॅव्हीएशन तसेच कंपनी करीता विमान चालवत असतो.हा यात्रेकरूंना किंवा सामान यांना एका राज्यातुन दुसरया राज्यात घेऊन जाण्याचे काम करतो.
२) इंडियन डिफेन्स एअरफोर्स –
यात पायलेट बनण्यासाठी आपल्याला एअर फोर्स मध्ये दाखला घ्यावा लागतो.हा पायलेट भारतीय सेनेकरीता काम करीत असतो.
पायलट बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पायलेट बनण्यासाठी आपले किमान फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तिन्ही विषय घेऊन बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बारावी मध्ये आपणास किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
जे विद्यार्थी सध्या दहावी मध्ये शिकत आहे त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी मध्ये सायन्स विषय घेणे आवश्यक आहे तेव्हाच ते बारावी नंतर पायलेट बनू शकतात.अन्यथा नाही.
पायलट बनण्यासाठी पात्रतेच्या इतर अटी –
- उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- आपली उंची किमान पाच फुट तरी असायला हवी.
- आपली नेत्रदृष्टी देखील चांगली असायला हवी.
आपल्याला इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.कारण पायलेटला वेगवेगळ्या देशात प्रवास करावा लागतो तेथील एअरलाईन कंट्रोल सोबत संवाद साधता येण्यासाठी आपले इंग्रजी उत्तम असणे आवश्यक आहे.
आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भावनिक नियंत्रण असायला हवे
कमर्शियल पायलट बनण्यासाठी काय करायचे?
SPL licence –
बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थी पायलट परवान्यासाठी(Student pilot licence) अर्ज करायचा आहे.
याच्यासाठी आपल्याला डीजीसीए (directorate general of civil aviation government of India) अंतर्गत असलेल्या कुठल्याही एका महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करायचा आहे.
डीजीसीए महाविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी आपणास प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर आपल्याला आपली सर्व ट्रेनिंग देखील पुर्ण करावी लागते.यात आपली लेखी परीक्षा सोबत मेडिकल टेस्ट मुलाखत देखील घेतली जाते.मग एसपीएल लेखी परीक्षा मेडिकल टेस्ट मुलाखत मध्ये उत्तीर्ण झाल्यावर एसपीएल लायसन्स दिले जाते.
एसपीएल लायसन प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांना फ्लाईट इंसट्रक्टर दवारे विमान कसे उडवायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.विमान उडविण्याच्या प्रक्रियेचा एकुण कालावधी ६० तास इतका असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करायला काही दिवस लागत असतात.यात किमान २० तास उमेदवाराला एकट्याला विमान उडवावे लागते.
PPL licence –
यानंतर आपल्याला पीपीएल private pilot licence करीता अर्ज करायचा आहे.इथे देखील आपल्याला ट्रेनिंग पुर्ण करून खाजगी पायलट परवान्यासाठी परीक्षा द्यावी लागते.
पायलट बनण्यासाठी एसपीएल (student pilot licence) अणि पीपीएल (private pilot licence) हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक आहे.
CPL licence –
यानंतर आपणास कमर्शियल पायलट बनण्यासाठी कमर्शियल पायलट लायसन्स(commercial pilot licence) सीपीएल प्राप्त करण्यासाठी अर्ज करायचा आहे.
यात देखील आपल्याला काही टेस्ट पास करून परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते.
सीपीएल लायसन्स आपणास तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण आपला पायलेटचा कोर्स पूर्ण करताना २५० तासांची फ्लाईंग ट्रेनिंग पुर्ण करतो.
याचसोबत उमेदवाराला मेडिकल टेस्ट पास करून air force central medical establishment afcme institute of aviation medicine bangalore कडुन मेडीकल फिटनेस सर्टिफिकेट देखील प्राप्त करावे लागते.
मग आपण एक कमर्शियल पायलट बनण्यास पात्र ठरत असतात.अणि आपल्याला कमर्शियल पायलट बनण्यासाठी लायसन्स देखील मिळुन जाते.
पायलट परवान्यासाठी कोणकोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे?
आपले बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
स्टुडंट प्रायव्हेट लायसन्स करीता आपले वय किमान सोळा असणे आवश्यक आहे.अणि प्रायव्हेट पायलेट लायसन्स करीता आपले वय किमान १७ असणे आवश्यक आहे.अणि कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त करण्यासाठी आपले वय किमान १८ असणे आवश्यक आहे.
पायलट बनण्यासाठी लक्षात घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी –
एसपीएल(student pilot licence), पीपीएल (private pilot licence), सीपीएल(commercial pilot licence) या तिन्ही लायसन्स करीता आपल्याला लेखी परीक्षा मेडिकल टेस्ट मुलाखत द्यावी लागते.लेखी परीक्षा मध्ये मॅथ फिजिक्स केमिस्ट्री रिजनिंग एअर लाईन्स संबंधित विषयावर प्रश्न विचारले जातात.
या तिन्ही लायसन्स करीता घेतलेल्या लेखी परीक्षा मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला किमान ७० टक्के प्राप्त करणे आवश्यक असते.एकदा अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ह्या परीक्षेंसाठी पुन्हा बसता येते.
पायलट बनण्यासाठी खर्च किती येतो?
पायलट बनण्यासाठी आपल्याला साधारणतः २० ते ३० लाखाच्या आसपास साधारणतःखर्च येऊ शकतो.
पायलेटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण एक कमर्शियल तसेच प्रायव्हेट पायलेट बनु शकतो.
कमर्शियल पायलेटचे वेतन किती असते?
कमर्शियल पायलेटचे वेतन दरमहा दीड ते दोन लाख इतके असते.जसजसा अनुभव वाढत जातो अणि स्कील मध्ये वाढ होते तसे वेतन पाच ते दहा लाखांपर्यंत दिले जाते.
पायलेट बनण्यासाठी कोर्स उपलब्ध करून देणारया भारतातील काही प्रमुख संस्था अकॅडमी –
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी रायबरेली
- राजीव गांधी अकॅडमी ऑफ अॅव्हीएशन टेक्नाँलॉजी केरळ
- बाॅम्बे फ्लाईंग क्लब मुंबई
- नॅशनल फ्लाईंग ट्रेनिंग इंस्टीटयुट गोंदिया महाराष्ट्र
- अहमदाबाद अॅव्हीएशन अॅण्ड अॅरोनोटिक्स लिमिटेड अहमदाबाद
- ब्लु डायमंड अॅव्हीएशन पुणे