फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय? फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह कोण असतो?
जेव्हा आपण एखाद्या कंपनीत,संस्थेत हाॅटेल,रेस्टॉरंट,बॅक शाळा महाविद्यालय इत्यादी पैकी कुठल्याही ठिकाणी जात असतो तेव्हा तेथे प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला डेस्क वर एक विशिष्ट व्यक्ती आपले स्वागत करण्यासाठी बसलेली दिसते.
ह्या फ्रंट पुढील बाजुमध्ये बसलेल्या कर्मचारीला तसेच अधिकारीलाच फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह असे म्हटले जाते.
जेव्हा आपण एखाद्या बॅकेत जातो तेव्हा बॅकेत प्रवेश केल्यावर समोरच डेस्कवर आपल्याला एक व्यक्ती बसलेली दिसते.जी आपल्याला सांगत असते बॅकेत आपले अकाऊंट ओपन करण्यासाठी आपण कुठे जायचे काय करायचे?कोणते कागदपत्रे जोडायचे
कोणते अकाऊंट ओपन करणे आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल कोणता फाॅम कसा भरायचा?इत्यादी अकाऊंटं संबंधित सर्व माहीती देत असते ती व्यक्ती तेथील फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह असते.
प्रत्येक शाळा,महाविद्यालय,संस्था,कंपनी हाँटेल तसेच रेस्टॉरंट मध्ये कस्टमरचे स्वागत करण्यासाठी एक फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्हची नियुक्ती केली जात असते.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्हचे काम काय असते?
- कंपनीत आॅफिसात आलेले काॅल रिसिव्ह करणे
- कंपनीतील ज्या कर्मचारींसाठी तो काॅल आला असेल त्याला तो काॅल ट्रान्स्फर करणे,
- आॅफिसात आलेल्या अतिथींचे हसुन स्वागत करणे,त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे,
- त्यांच्या तक्रारी सोडवणे,मेल तयार करणे,मेल पाठवणे,
- मेल रिसिव्ह करणे,
- रिसेप्शन क्षेत्र व्यवस्थित ठेवणे,
- मिटिंग शेड्युल करणे
इत्यादी आॅफिसातील महत्वाची कामे फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह करीत असतो.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी आपले किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे.ग्रॅज्युएशन आर्ट काॅमर्स सायन्स इत्यादी पैकी कुठल्याही एका शाखेतुन केलेले असले तरी चालते.
पण आपले बिझनेस मॅनेजमेंट मध्ये,एच आर मध्ये एमबीए झालेले असल्यास अधिक चांगले आहे.कारण याने आपल्याला आॅफिसात चांगल्या पदावर उत्तम पगाराची नोकरी प्राप्त होते.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी कोणकोणते कला कौशल्य आपल्या अंगी असायला हवे?
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह याला डेस्कवर बसुन कंप्युटर मध्ये काम करावे लागते असते म्हणून त्याला कंप्युटरचे उत्तम नाॅलेज असणे देखील आवश्यक आहे.
याचसोबत आपणास वर्ड एक्सेल पावरपाॅईट तसेच इंटरनेट इत्यादीचे उत्तम नाॅलेज असणे आवश्यक आहे.आपला टायपिंगचा वेग चांगला असायला हवा.
मेल तयार करणे,मेल पाठवणे,मेल रिसिव्ह करणे इत्यादी गोष्टी येणे आवश्यक आहे.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह याला ऑफिस मध्ये डेस्कवर फ्रंटला बसुन अतिथी तसेच कस्टमरशी संवाद साधावा लागतो त्यांच्याशी संभाषण करावे लागते.त्यांच्या अडचणी समस्या ऐकून त्या दुर कराव्या लागतात.
म्हणून फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्हला उत्तम संवाद संभाषण कौशल्य अणि समस्या दूर करण्याचे कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्हचे वेतन काय असते?
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर आपण फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून एखाद्या कंपनीत हाॅटेलात रेस्टॉरंट मध्ये किंवा संस्थेत कामाला लागलो तर आपणास सुरूवातीला २० ते २५ हजार इतके मासिक वेतन दिले जाते.
हळुहळु कामातील अनुभवानुसार आपल्या वेतनात अधिक वाढ केली जाते.
पण एमबीए पुर्ण केल्यानंतर आपण फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदावर कामाला लागलो तर आपणास ३५ ते ४० हजार इतके वेतन प्राप्त होते.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून आपण कोणकोणत्या ठिकाणी नोकरी करू शकतो?
१)एखादी खाजगी कंपनी
२) हाॅटेल
३) रेस्टॉरंट
४) एखादी सरकारी तसेच खासगी संस्था तसेच कार्यालय
५) शाळा
६) महाविद्यालय/विद्यापीठ
७) बॅक