इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?– How To Delete Instagram Account
आज आपले प्रत्येकाचे अनेक सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर अकाऊंट असतात.मग ते फेसबुक,व्हाँटस अँप,टेलिग्राम,इंस्टा,टविटर असो किंवा इतर कोणतेही सोशल मिडिया अँप.
आणि आपल्या मधील काही जणांचे तर इंस्टाग्राम सारख्या एकाच सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर दोन ते तीन अकाऊंट असतात.अशावेळी मल्टीपल अकाऊंट असल्यामुळे आपल्या कोणत्या सोशल मिडिया अकाऊंटचा वापर आपण करावा आणि कोणत्या करू नये हा प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो.
अशा परिस्थितीत आपल्याला आपले कोणते तरी एक अकाऊंट डिलीट करण्याची वेळ येत असते.पण आपले इंस्टाग्रामचे एक अकाऊंट डिलीट करण्याचे ठरवले असुनही आपल्याला ते डिलीट करता येत नसते.
कारण इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करतात हेच आपल्याला माहीत नसते.
म्हणून आजच्या लेखातुन आपण आपले इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला आपले इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करताना कोणतीही अडचण येणार नाही.
आपण आपले इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?
मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ही एक गोष्ट माहीत असली पाहिजे की आपण आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला डिलीट तसेच डी अँक्टीव्हेट देखील करू शकतो.
म्हणजे समजा आपल्याला आपले इंस्टाग्राम अकाऊंट कायमचे डिलीट न करता फक्त तात्पुरता जर काही कारणास्तव बंद करायचे असेल तर आपण आपले अकाऊंट डिलीट न करता डि अँक्टीव्हेट करणे अधिक योग्य ठरते.
याने आपल्याला हा एक फायदा होत असतो की आपले अकाऊंट चालु असुन देखील कोणालाही आपले फोटो व्हिडिओ दिसत नसतात.कारण आपले अकाऊंट डि अँक्टीव्हेट केल्यामुळे ते इंस्टाग्राम कडुन हाईड केले जात असतात.जेणेकरून आपल्या प्रायवेसीसाठी आपले इंस्टाग्राम आपले फोटो तसेच व्हिडिओ इतरांना दिसु देत नसते.
याने आपल्याला दोन फायदे होत असतात त्यात पहिला फायदा हा असतो की आपले अकाऊंट पुर्णपणे डिलीट होत नसते फक्त ते काही कालावधीसाठी डि अँक्टीव्हेट होत असते.आणि आपण जेव्हा नंतर पुन्हा त्या अकाऊंटवर लाँग इन करतो तेव्हा ते अँटोमँटीकली अँक्टीव्हेट देखील होऊन जाते.
पण याचठिकाणी आपण आपले अकाऊंट जर डिलीट केले तर आपल्याला पुन्हा ते चालू करता येत नसते कारण ते ३० ते ४० दिवसांत कायमचे डिलीट होऊन जात असते.
आणि यात आपले फोटो व्हिडिओ देखील कायमचे डिलीट होऊन जात असतात.म्हणुन आपण आपले अकाऊंट डिलीट करण्याअगोदर आपला सर्व महत्वाचा डेटा डाऊनलोड करून घ्यायला हवा.मगच आपण आपले अकाऊंट डिलीट करायला हवे.अन्यथा नाही.
चला तर मग आता आपण आपले इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे ह्याबाबद जाणुन घेऊ.
- आपल्याला आपले इंस्टाग्रामचे अकाऊंट डिलीट करायचे असेल तर सर्वप्रथम आपले इंस्टाग्राम अकाऊंट ओपन करावे लागेल.
- मग अकाऊंट ओपन करून झाल्यावर आपण आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलमध्ये जावे.
- प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजुला कोपरयात तीन डँश दिसुन येत असतात.त्यावर आपण क्लीक करावे.
- यानंतर आपल्यासमोर खालील आँप्शन येत असतात.
- Archive
- Your Activity
- Qr Code
- Save
- Close Friends
- Discover People
- Setting
ह्यापैकी आपण Setting ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
मग Setting ह्या आँप्शनवर क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर खालील आँप्शन दिसुन येत असतात.
- Follow And Invite Friends
- Notification
- Privacy
- Security
- Ads
- Account
- Help
- About
- Theme
मग Help आँप्शनवर क्लीक केल्यानंतर आपल्याला खालील आँप्शन दिसुन येतात.
- Report A Problem
- Help Center
- Support Request
- Privacy Security Help
वरीलपैकी आपण Help Center ह्या आँप्शनवर क्लीक करावे.
- मग Help Center ह्या आँप्शनवर क्लीक केल्यानंतर आपल्यासमोर एक Help Center चा आयकाँन येतो जिथे आपण Help Center ह्या नावाच्या समोरच आपल्याला सर्च चा Symbol दिसुन येतो.त्याच्याशेजारीच आडवे तीन डँश आपल्याला दिसुन येत असतात.त्यावर आपण क्लीक करावे.
- मग उजव्या बाजुला कोपरयात असलेल्या आडव्या तीन डँशवर क्लीक करून झाल्यावर आपल्यासमोर खालील चार आँप्शन येत असतात.
- Instagram Feature
- Manage Your Account.
- Privacy Safety Security
- Policies And Reporting
वरील पैकी आपण Manage Your Account ह्या आँप्शनला सिलेक्ट करावे.
मग Manage Your Account वर क्लीक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर काही आँप्शन येत असतात ते पुढीलप्रमाणे :
- Signing Up And Getting Start
- Account And Notification Setting
- Adding Accounts
- Delete Your Accounts
- Verified Badges
- Accessibility
- About Instagram Ads
मग वर दिलेल्या आँप्शनमध्ये आपण Delete Your Account वर ओके करावे.
Delete Account ह्या आँप्शनवर ओके केल्यावर आपल्यासमोर काही पर्याय दिले जातात
- How Do I Temporarily Disable My Instagram Account
- How Do I Delete My Instagram Account
How Do I Access Or Retrieve My Data On Instagram
- आपल्याला आपले अकाऊंट तात्पुरता डिलीट करायचे असेल तर वर दिलेल्या पर्यायांपैकी पहिला पर्याय निवडावा.आणि जर आपल्याला आपले अकाऊंट कायमचे डिलीट करायचे असेल तर आपण How Do I Delete My Instagram Account ह्या दुसरया आँप्शनवर क्लीक करावे.
- मग How Do I Delete My Instagram Account ह्या आँप्शनवर क्लीक केल्यानंतर Delete Your Account चे पेज ओपन होत असते.
- मग आपण थोडे खाली आल्यावर आपल्याला To Request Permanent Deletion Your Account असे टायटल दिसुन येते.त्यात आपल्याला नंबर १ ला Delete Your Account हे आँप्शन दिसून येते.त्यावर क्लीक करावे.
- मग इथे आपल्याला आपले अकाऊंट का डिलीट करायचे आहे हे विचारले जाते मग तिथे आपले अकाऊंट डिलीट करण्याचे कारण दिल्यानंतर
- आपल्याला आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड इंटर करण्यास सांगितले जाते.
- मग यानंतर कनफर्मेशन केल्यानंतर आपले अकाऊंट डिलीट होऊन जात असते.
- पण हे अकाऊंट डिलीट होण्यासाठी कमीत कमी एक महिना लागत असतो तेवढया कालावधीत जर पुन्हा आपण आपल्या अकाऊंटवर आय डी पासवर्ड टाकून लाँग इन केले तर आपले अकाऊंट पुन्हा चालू होऊन जाते पण आपण पुन्हा त्या अकाऊंटवर कमीत कमी १५ दिवस लाँग इन नाही केले तर आपले अकाऊंट Permanently Delete होऊन जात असते.यानंतर ते सर्वरमधुन कायमचे डिलीट होऊन जात असते.
अशा पदधतीने आज आपण आपण आपले इंस्टाग्राम अकाऊंट कायमचे डिलीट कसे करावे हे अत्यंत सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.
1 thought on “इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?- How To Delete Instagram Account”
Comments are closed.