टेटच्या स्कोअर कार्डची पीडीएफ मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची आहे? How to download TAIT score card pdf in your mobile

How to download TAIT score card pdf in your mobile

खुप उमेदवारांना वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपला रेजिस्ट्रेशन नंबर अणि पासवर्ड टाकुन टेटचे स्कोअर कार्ड बघायला मिळाले आहे.

पण बरयाच उमेदवारांना टेटच्या स्कोअर कार्डची पीडीएफ आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड कशी करायची याची माहिती नसल्याने स्कोअर कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड करायला अडचण येत आहे.

याचकरीता आज आपण टेटच्या स्कोअर कार्डची पीडीएफ आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड कशी करायची याची सर्व प्रोसेस जाणुन घेणार आहोत.

सर्वात पहिले उमेदवारांना टेटचे स्कोअर कार्ड डाऊनलोड करण्यासाठी जी लिंक आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे तिच्यावर जायचे आहे.

अणि आपला रेजिस्ट्रेशन नंबर तसेच पासवर्ड भरून झाल्यावर देण्यात आलेला कॅपच्या जसाच्या तसा भरायचा आहे अणि खाली दिलेल्या लाॅग इन बटणावर ओके करायचे आहे.

यानंतर आपल्यासमोर टेटच्या परीक्षेचा स्कोअर कार्ड येईल ह्या स्कोअर कार्ड मध्ये आपले दिलेले सर्व व्यवस्थित सर्व उमेदवारांनी बघुन घ्यायचे आहे. https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229f13cce69

टेट स्कोअर कार्ड प्रिंट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची?

टेटच्या स्कोअर कार्डची पीडीएफ सेव्ह करण्यासाठी ज्या ब्राऊझर वरून आपण लाॅग इन केले आहे त्याच्या मध्ये वर कोपरयात आपणास तीन डाॅट दिसुन येतील त्यावर क्लिक करायचे आहे.

How to download TAIT score card pdf in your mobile

ह्या तीन डाॅटवर क्लिक केल्यावर आपल्याला खालील प्रमाणे पर्याय दिसुन येतील-

  • New tab
  • new incognito tab
  • History
  • Download
  • Bookmark
  • Recent tab
  • Share
  • Find in page
  • Translate
  • Add to home screen
  • Desktop site
  1. वरील सर्व दिलेल्या पर्यायांमध्ये आपणास share ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.शेअर आॅप्शनवर क्लिक केल्यावर खाली gmail,whats app,instagram अनेक पर्याय आपल्यासमोर शेअर करण्यासाठी येतील.
  2. या सर्वांमध्ये आपणास एक print नावाचे आॅप्शन सुदधा दिसुन येईल त्यावर क्लिक करायचे आहे.प्रिंटच्या पर्यायावर क्लिक केल्यावर पीडीएफ सेव्ह करण्यासाठी आपणास पर्याय उपलब्ध होणार आहे.
  3. प्रिंटच्या बटणावर क्लिक केल्यावर preparing preview असे नाव येईल प्रिंट मोबाईलवर दिसण्यासाठी प्रिपेअर झाल्यावर आपणास वर कोपरयात दिलेल्या पीडीएफ आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
  4. पीडीएफ आॅप्शनवर क्लिक केल्यावर पुन्हा preparing preview ही प्रोसेस होईल यासाठी एखादा किंवा अर्धा सेकंद लागु शकतो.यानंतर आपल्या मोबाईल मधील गॅलरी मधे पीडीएफ सेव करण्यासाठी आपल्यासमोर आॅप्शन येईल.
  5. टेट परीक्षेचा स्कोअर कार्डची पीडीएफ सेव करण्यासाठी आपल्यासमोर teacher aptitude टेस्ट ह्या नावाखाली save असे नाव येईल.यावर क्लिक करायचे आहे.
  6. यानंतर आपली स्कोअर कार्डची पीडीएफ डाऊनलोड फोल्डर मध्ये स्टोअर होईल.
  7. यानंतर आपणास फाईल मॅनेजर मध्ये जाऊन डाऊनलोड फोल्डर ओपन करायचे आहे.यात आपणास teacher aptitude test या नावाने एक पीडीएफ दिसेल.
  8. त्या पीडीएफ वर क्लिक केल्यावर ती पीडीएफ आपणास पीडीएफ फाॅरमॅट मध्ये आता मोबाईल मध्ये दिसुन देखील येईल.
See also  एम एस आरटीसी मोफत प्रवास योजना विषयी माहिती - MSRTC free travel scheme in Marathi