Google मध्ये नोकरी कशी मिळवावी – How to get job in Google

Google मध्ये नोकरी कशी शोधावी – How to get job in Google

आपले शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपण प्रत्येक जण आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार एका चांगल्या कंपनीत जाँब मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो.

आपल्या प्रत्येकाची ईच्छा असते की आपल्याला एका मोठया कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त व्हावी.

आपल्याला सर्वानाच गूगलविषयी चांगलेच माहीत असेल कारण आपण रोज आपल्याला आपल्या दैनंदिन जीवणात उदभवत असलेल्या प्रश्नांची उत्तरे,समस्यांचे उपाय विविध विषयावरची माहीती गूगल ह्या सर्च इंजिनवरच अधिक प्रमाणात शोधत असतो.

कारण गूगल हे जगातील सर्वात फेमस आणि फास्ट सर्च इंजिन आहे.ज्याचा वापर संपुर्ण जगभरात अधिक प्रमाणात केला जातो.

काही अडचण असल्यावर आपण चटकन गूगलची मदत घेत असतो.

पण मित्रांनो आपल्याला हा प्रश्न कधी पडतच नाही की एवढी संपुर्ण जगभरातील सर्व माहीती गूगलकडे कुठुन येते?याच्यामागे काही एक्सपर्टचा हात असतो जे गूगलमध्ये high salary घेऊन एका उच्च पदावर नोकरी करीत असतात.

गूगल सारख्या एका मोठया प्रतिष्ठीत कंपनीत नोकरी प्राप्त करणे हे आज आपल्या प्रत्येकाचेच स्वप्र असते.

पण खुप जणांना असेही वाटते की गूगल ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे तिथे आपल्याला जाँब कसा मिळणार?पण विश्वास ठेवा मित्रांनो जर आपल्यामध्ये खरच पात्रता असेल skill expertise असेल तर आज गूगलमध्ये तुमच्या माझ्यासारखे गरीब घरातील मुलेमुली देखील जाँब प्राप्त करू शकतात.

फक्त त्यासाठी आपल्या अंगी काही soft skill, hard skill, education qualification, expertise असणे गरजेचे आहे जे आज आपण आजच्या लेखातुन जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला देखील गूगलमध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त करता येईल.

Google कंपनीमध्ये नोकरी कशी मिळवावी – How To Get Job In Google

तसे पाहायला गेले तर गूगल सारख्या मोठया आंतराराष्टीय दर्जाच्या कंपनीत जाँब प्राप्त करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये.

कारण आजही गूगलमध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी दरवर्षी 20 लाखापेक्षा अधिक उमेदवार अर्ज करत असतात.

See also  जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये -World Earth day quotes and slogan in Marathi

पण त्यातील फक्त पाच ते सहा हजार व्यक्तींनाच गूगलमध्ये जाँब प्राप्त असतो.यावरून आपणास हे कळुन येते की गूगलमध्ये जाँब प्राप्त करणे किती मेहनतीची आणि कर्तबगाराची गोष्ट आहे.

आणि आपल्याला देखील जर गूगलमध्ये जाँब प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला हे माहीत असणे फार आवश्यक आहे.

की गूगलमध्ये जाँब प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा आणि कुठून करायचा?इथे जाँबसाठी सिलेक्ट झाल्यावर आपल्याला सँलरी किती मिळेल?कोणकोणत्या सुविधा प्राप्त होतील?सिलेक्शन साठी आपल्या अंगी कोणते skill expertise, education Qualification असायला हवे?इत्यादी.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या सर्व बाबींविषयी अधिक सविस्तरपणे.

Google मध्ये कशा प्रकारच्या कर्मचारीची विशेष निवड केली जाते?

  • गूगलमध्ये काम करत असलेले सर्वच कर्मचारी हे आत्मविश्वासाने परिपुर्ण असतात.आणि आपल्या कामासोबत आपल्या कंपनीसाठी देखील खुप उत्साही असतात.
  • म्हणुन ते आपल्या कंपनीला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत देखील घेत असतात.
  • ज्या बदल्यात गूगलकडुन त्यांना एक high salary package, compensation package, bonus तसेच इतर financial reward देखील दिले जात असतात.
  • म्हणुन आपल्याला जर गूगलमध्ये लाखो लोकांमधुन निवडल्या जात असलेल्या पाच हजार लोकांमध्ये समाविष्ट व्हायचे असेल म्हणजेच गूगलमध्ये नोकरी प्राप्त करायची असेल तर आपल्या अंगी भरपुर आत्मविश्वास आणि आपल्या कामाच्या आणि कंपनीच्या प्रती प्रेम,प्रामाणिकता,उत्साह भरपुर मेहनतीची तयारी हे गुण असणे गरजेचे आहे.असे असेल तरच आपण इथे जाँबसाठी अँप्लाय करायला हवा.

Google मध्ये नोकरीसाठी candidates चे selection कसे केले जाते?Google मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय हवी?

गूगलकडुन आपल्या कंपनीत दरवर्षी काही bright अणि प्रतिभावान उमेदवारांची भरती केली जात असते.आणि त्यासाठी गूगल कंपनीकडुन candidate च्या selection साठी एक campus placement आयोजित केले जात असते.

ज्यात त्या candidates ची शारीरीक आणि मानसिक क्षमतेची written तसेच oral test घेतली जाते.

ज्यात कंपनीकडुन candidates ची physical आणि mental ability check करण्यासाठी त्याला interview मध्ये काही questions विचारले जात असतात.

जेणेकरून तो उमेदवार जाँबसाठी physically आणि mentally त्या जाँब पोस्टसाठी किती योग्य आणि पात्र उमेदवार आहे हे कंपनीला व्यवस्थित जाणून घेता येते.

Google मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय हवी?

गूगल कंपनीतील कर्मचारींचा कुठलाही एक विशिष्ट प्रकार नाहीये.म्हणजेच गूगलची अशी कोणतीही अट नाहीये की त्यांच्या कंपनीत जाँब प्राप्त करण्यासाठी त्यांच्या सर्व कर्मचारी वर्गात एकच विशिष्ठ गुण असायला हवा.

गूगल कंपनीला नेहमी अशा candidates चा शोध असतो जे कंपनीला जीवणाचा एक नवीन अनुभव तसेच दृष्टीकोन प्राप्त करून देतील.

म्हणजेच गूगल कंपनीत नेहमी अशा उमेदवारांची निवड केली जाते ज्यांच्या मध्ये ज्यांच्यात कुतुहल आहे learning attitude तसेच शिकण्याची ईच्छा आहे.Google मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय हवी?

याचसोबत Google मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे पुढील शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे-

See also  बजरंग दलाचा इतिहास काय आहे? - Bajrang Dal history.

Educational qualification :

● Google मध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे MCA किंवा B Tech या दोघांपैकी कोणतीही एक degree असायला हवी.

● पुर्ण academic career मध्ये आपणास minimum 65% percent असणे गरजेचे आहे.(10 th,12,MCA आणि B Tech या सगळयांमध्ये किमान 65 टक्के असायला हवेत)

● Google मध्ये नोकरी मिळवू इच्छित उमेदवाराला इंग्रजी भाषेत संभाषण करता यायला हवे तसेच त्याची इंग्रजी भाषेवर चांगली पकड असायला हवी.

● उमेदवाराच्या अंगी technical. skill असणे देखील गरजेचे आहे.

● उदा,उमेदवाराला web research, internet commerce, online advertising चे देखील नाँलेज असायला हवे तसेच त्याला fraud detection, numerical analysis करता येणे गरजेचे आहे.

● Candidate चे math पक्के असणे गरजेचे आहे.जसे की reasoning

● त्याचे written आणि verbal communication skill उत्तम असायला हवे.

● Coding programming अशा साँफ्टवेअर संबंधित विषयाचे त्याला उत्तम नाँलेज असायला हवे.programming मधील सर्व महत्वाच्या language जसे की java,C,c++,html,python इत्यादीचे उमेदवाराला नाँलेज असायला हवे.

● उमेदवाराला computer, hardware आणि software या तिघांचे उत्तम नाँलेज असायला हवे.

Google मध्ये job categories कोणकोणत्या आहेत?

Google मध्ये engineering field मध्ये technical roles साठी पुढील categories आहेत-

  • Software engineering :
  • STA(static timing analysis)
  • Product management
  • Application development

Google मध्ये business field मध्ये non technical roles साठी पुढील categories आहेत-

Business management

● Sales strategy

● Business operation

Google मध्ये design field मध्ये roles साठी पुढील categories आहेत-

● User interface

● UX designer

● Ux researcher

● Visual designer

● Ux writer

Google मध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?

1) online apply :

गूगलमध्ये नोकरी प्राप्त करण्यासाठी आपण Google कंपनीच्या official site career.google.com वर आँनलाईन देखील अर्ज करू शकतो.

career.google.com वर visit केल्यावर तिथे आपल्याला different different post साठी job requirement असलेली दिसुन येईल.

यात आपल्या educational qualification आणि skill expertise नुसार जो जाँब आपल्यासाठी suitable असेल आपण तिथे अँप्लाय करू शकतो.

आपण आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार पात्रतेनुसार कुठलेही एक पद select करून त्यासाठी आपला resume कंपनीला पाठवू शकतो.फक्त आपला resume हा effective असायला हवा.

तरच आपल्याला interview साठी कंपनीकडुन काँल करून बोलावले जाईल नाहीतर resume चा low effectiveness बघुनच आपल्याला reject केले जाऊ शकते.म्हणुन आपण कंपनीला आपला resume पाठवताना विशेष काळजी घ्यायला हवी.

2) campus placement through :

College च्या placement program साठी गूगलकडुन IIT,NIT,DTU सारख्या काही famous colleges तसेच university ची देखील निवड केली जात असते.

जर आपण यापैकीच एखाद्या फेमस college तसेच university मध्ये शिकत असाल तर आपल्यासाठी college through Google मध्ये job प्राप्त करण्याची एक best opportunity आहे.

See also  महात्मा फुले यांनी केलेली शैक्षणिक कार्ये अणि त्यांचे शैक्षणिक विचार - Work of Mahatma Jotirao Phule in Educational field

3) APAC test :

ही गूगलकडुन computer science तसेच computer technology शी संबंधित expert talented युवा उमेदवारांची दरवर्षी निवड करण्यासाठी घेतली जाणारी एक online exam तसेच coding competition आहे.

ज्यांना कोडिंगचे उत्तम नाँलेज असेल ते उमेदवार ह्या परिक्षेसाठी आपली नावनोंदणी करून ही परीक्षा देऊ शकतात.

जे उमेदवार ह्या परीक्षेत पास होतात त्यांना गूगलमध्ये technical job करण्याची संधी प्राप्त होत असते.

Google मध्ये Job साठी apply केल्यानंतरची process-

● आपण online job साठी apply केल्यानंतर जर कंपनीला वाटले की आपण ह्या जाँब पोस्टसाठी योग्य आणि पात्र उमेदवार आहात तर कंपनीकडून आपल्याला interview साठी काँल केला जातो.

● हा interview online,telephone,hangout,onside इत्यादी पदधतीने घेतला जाऊ शकतो.recruiters कडुन जर आपले एखाद्या पोस्टसाठी selection करण्यात आले तर मग आपला आँनलाईन पदधतीने interview घेतला जातो.ज्यात आपली क्षमता आणि पात्रता देखील तपासली जात असते.

● ज्या candidates ने technical post साठी apply केले असेल त्यांना telephonic तसेच online interview मध्ये coding, data structure तसेच algorithm.शी related question विचारले जात असतात.आणि त्या candidate च्या उत्तर देण्याच्या पदधतीला शैलीला तसेच level ला बघुन त्याचे परीक्षण केले जाते.

● मग telephonic तसेच online interview मध्ये pass झाल्यानंतर candidate ला कंपनीत offline बोलावण्यात येते.जिथे candidates चे general knowledge ची पातळी चेक केली जाते.त्यांच्यात leadership ची quality आहे का हे बघितले जाते.तसेच त्याच्या अंगी असलेले इतर soft skills बघितले जातात.तसेच ज्या जाँब पोस्टसाठी तो उमेदवार अर्ज करतो आहे त्याचे त्याला किती सखोल नाँलेज आहे त्याला त्याच्या job role विषयी किती माहीती आहे तो आपल्या कामात किती expert आहे हे देखील बघितले जाते.

● सोबत candidate ज्या जाँबसाठी अँप्लाय करतो आहे त्यात त्याला त्याच्या job post मध्ये ज्या problems, obstacles चा सामना करावा लागु शकतो त्याच्याशी संबंधित काही condition त्याच्यासमोर ठेवून त्याची क्षमता,योग्यता पातळी चेक करण्यासाठी त्याला job interview मध्ये काही questions विचारले जातात.

● मग job post साठी selection झाल्यावर त्या उमेदवाराला वरिष्ठांकडुन कामाची training दिली जात असते.

● आणि मग training complete झाल्यावर त्या उमेदवाराच्या हातात finally joining letter दिले जात असते.

Google मध्ये काम करत असलेल्या employee ला salary किती दिली जाते?

Google मध्ये प्रत्येक employee ला त्याच्या knowledge, skill expertise तसेच work experience प्रमाणे salary दिली जात असते.

तरी साधारणत गूगलमध्ये काम करत असलेल्या employee ची average salary 1 करोड (yearly) इतकी असते.

Google मध्ये काम करत असलेल्या employee ला प्राप्त होत असलेल्या इतर सोयसुविधा-

● कंपनीत कर्मचारींना इतर सुविधा जसे की bonus, compensation package, तसेच इतर financial reward देखील दिले जात असतात.

● एवढेच नाही तर कंपनीत काम करत असलेल्या उमेदवारांच्या जेवणाची सोय देखील कंपनीकडुनच केली जात असते.

● तसेच employees चा कामाचा stress कमी करण्यासाठी relax house, swimming तसेच जिम आणि मेडिकल help ची facility देखील दिली जात असते.याचसोबत employees ला work from home ची सुट देखील दिली जाते.

● Google कंपनीच्या पा़ँलिसीनुसार जर कंपनीत काम करत असलेल्या एखाद्या employee ची death झाली तर गूगलकडुन त्या employee च्या salary मधील अर्धा हिस्सा त्या मृत कर्मचारीच्या कुटुंबाला दिला जातो.

1 thought on “Google मध्ये नोकरी कशी मिळवावी – How to get job in Google”

Comments are closed.