पोस्ट आँफिस मधुन कर्ज कसे घ्यावे ?- How To Get Loan From Post Office In Marathi

Table of Contents

पोस्ट आँफिस कर्ज – How To Get Loan From Post Office

मित्रांनो आपण आतापर्यत अनेक बँकामधून फायनान्स कंपन्यांमधून लोन घेतले असेल.पण जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून तसेच आँनलाईन एखाद्या वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेतो तेव्हा ती वित्तीय संस्था दिलेल्या कर्जावर आपणास खुप जास्त व्याज लावत असते.
म्हणुन आपण एखाद्या अशा विश्वासार्ह वित्तीय संस्थेचा शोध घेत असतो जी आपणास कमी व्याज आकारून देखील चांगले कर्ज उपलब्ध करून देणार असते.अशा वेळी बँक,फायनान्स कंपनी सोडुन एकच पर्याय दिसत असतो तो म्हणजे पोस्ट ऑफिस.
होय मित्रांनो पोस्ट ऑफिस सुदधा आपल्याला बँक तसेच वित्तीय संस्था प्रमाणे लोन देण्याचे काम करते.फक्त लोन देण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या काही महत्वाच्या अटी तसेच नियम असतात ज्यांचे काटेकोरपदधतीने पालन आपणास करावे लागत असते.पण कमी व्याजदरात कर्ज घेण्यासाठी बँक व्यतीरीक्त पोस्ट ऑफिस ही एक सर्वात उत्तम अणि विश्वासार्ह संस्था आहे.
म्हणुन आजच्या लेखात आपण पोस्ट आँफिस मधून लोन कसे प्राप्त करायचे?कर्ज घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या असतात?डाँक्युमेंट कोणकोणते लागत असतात?याची माहीती जाणुन घेणार आहोत.

See also  मॅनीफेस्टेशन म्हणजे काय?Manifestation and manifesting meaning

पोस्ट ऑफिस कर्ज योजना काय आहे?

ही एक स्किम आहे ज्यात आपणास कमी व्याज दर आकारून कुठलीही हमी न घेता,तारण न ठेवता पोस्ट ऑफिस कडुन कर्ज दिले जाते.
पण हे कर्ज प्राप्त करण्यासाठी आपले पोस्टात सेव्हिंग अकाउंट,एफ डी,ईपीएफ खाते असणे गरजेचे आहे.

पोस्ट ऑफिस कर्ज योजना कधीपासुन सुरू करण्यात आली ?

पोस्ट ऑफिस कर्ज योजना १९८८ पासुन सुरू करण्यात आली होती.१९८८ पासुन ते आतापर्यत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातुन लोकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

पोस्ट ऑफिस कर्ज घेण्यासाठी तारण ठेवावे लागेल का?

पोस्ट ऑफिस मधून कर्ज प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपली कुठलीही मौल्यवान वस्तु दागदागिने घराची जमिनीची कागदपत्रे तारण ठेवावी लागत नसतात.

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज काही हमी द्यावी लागते का?

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज प्राप्त करण्यासाठी आपल्याला कुठलीही हमी द्यावी लागत नसते कारण आपल्या कर्जाची हमी आधीपासुनच त्यांच्याकडे राखीव स्वरूपात उपलब्ध असते.

पोस्ट ऑफिस कर्ज व्याजदराची आकारणी किती केली जाते?

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज घेणारया व्यक्तीला घेतलेल्या व्याजावर दरवर्षी एक टक्का व्याज आकारले जाते.

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज कोणत्या पदधतीने प्राप्त होत असते?

पोस्ट ऑफिस मधुन आपणास पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्यक्ष जाऊन आँफलाईन पदधतीने अर्ज करून कर्ज प्राप्त होत असते.

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज साठी पात्रतेच्या कोणत्या अटी आहेत?

पोस्ट आँफिस मधुन कर्ज प्राप्त करण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठेवण्यात आल्या आहेत ज्या पुढीलप्रमाणे आहेत-
● ज्याला पोस्ट ऑफिस कडुन कर्ज प्राप्त करायचे त्याचे पोस्टात अकाऊंट ओपन असावे लागते.
● ज्याला कर्ज प्राप्त करायचे आहे त्याची पोस्ट ऑफिस मध्ये एक वर्ष जुने सेव्हिंग अकाऊंट तसेच मुदत ठेव असावी लागते.
● ज्याला पोस्ट आँफिस मधुन कर्ज प्राप्त करायचे आहे अणि त्याने एफडी काढलेली नसेल तर किमान त्याचे पोस्ट खात्यामध्ये ईपीएफ अकाऊंट असणे गरजेचे आहे.तरच त्या व्यक्तीला कर्ज मिळु शकते.

See also  आधारकार्ड आता करा मोफत अपडेट, १४ जून पर्यंत अपडेट करण्याची सुविधा मोफत । Uidai Aadhaar Online Document Update Facility Free

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज घेण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

● पोस्ट ऑफिस मधुन कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत इथून कर्ज घेण्याचा पहिला फायदा हा आहे की इथे आपणास बँक अणि वित्तीय संस्था आकारतात त्यापेक्षा कमी व्याजदरात कर्ज मिळुन जाते.
● इथे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कुठलीही वेगळी हमी द्यावी लागत नही.कुठलीही मौल्यवान वस्तु तारण ठेवावी लागत नही.
● बँकेतुन कर्ज प्राप्त करण्यासाठी जेवढी दमछाक आपली होत असते तेवढी दमछाक आपल्याला पोस्टातुन कर्ज घेताना करावी लागत नही.
● पोस्ट ऑफिस ही एक संपुर्ण भारतातील एक अत्यंत विश्वासु संस्था आहे ज्यावर संपुर्ण देशाला विश्वास आहे म्हणुन इथे आपली फसवणुक होण्याची कुठलीही भीती नसते.

पोस्ट ऑफिस मधुन घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड नही केली तर काय होते?

पोस्ट ऑफिस मधून कर्ज घेतल्याने होणारे नुकसान –

● जर एखाद्या व्यक्तीने पोस्ट ऑफिस मधुन कर्ज घेतले आहे अणि त्या व्यक्तीने ते कर्ज ठरलेल्या कालावधीत फेडले नाही तर अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस आपले पैसे वसुल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मुदत ठेव अणि ईपीएफ खात्यावर कायमची जप्ती आणु शकते.तसे हक्क त्यांच्याकडे असतो.
● अणि यात जे कर्ज आपणास दिले जाते ते आपल्या ईपीएफ अणि मुदत ठेव अकाऊंटवर देण्यात येत असते.म्हणून जो पर्यत आपण आपले घेतलेले पुर्ण कर्ज दिलेल्या कालावधीमध्ये फेडत नही तोपर्यत आपल्याला आपल्या ईपीएफ अणि मुदत ठेव खात्यावर कोणतेही व्याज दिले जात नही

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज कसे प्राप्त करायचे?

पोस्ट ऑफिस मधुन कर्ज प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे-
● पोस्ट ऑफिस मधुन कर्ज प्राप्त करण्यासाठी आपणास सर्वप्रथम आपल्या शहरातील अशा पोस्ट आँफिस कार्यालयात जावे लागेल.जिथे आपले सेव्हिंग खाते ओपन आहे.
● यानंतर कर्ज प्राप्त करण्यासाठी एक अर्ज करावा लागेल.अर्ज करण्यासाठी एक फाँर्म भरावा लागेल त्या फाँर्ममध्ये आपली सर्व माहीती व्यवस्थित भरावी लागेल.
● मग भरलेल्या फाँर्मला आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील अणि तो फाँर्म पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल.
● यानंतर आपल्या अर्जाची पोस्ट ऑफिस कडुन पडताळणी केली जाईल आपण फाँर्ममध्ये भरलेली सर्व माहीती अचुक असेल अणि आपण सर्व आवश्यक कागदपत्रे फाँर्मला जोडलेले असतील तर आपल्या अर्जाला लगेच मंजुरी दिली जाते.अणि आपणास कर्जाची रक्कम देखील देण्यात येत असते.

See also  हात धुण्याचे महत्व - 15 ऑक्टोबर ग्लोबल हँड वॉशिंग डे - Global Hand Washing Day Marathi