फेसबुक अकाऊंट डिलीट कसे करावे? – How to Permanently Delete a Facebook Account

फेसबुक अकाऊंट  – How to Permanently Delete a Facebook Account

 फेस बुक हे एक असे जगप्रसिदध सामाजिक प्रसारमाध्यम आहे ज्याचा आज लोक लाखो तसेच करोडोंच्या संख्येने वापर करताना दिसुन येत आहेत.

आज फेसबुकच्या माध्यमातुन आपण परदेशातील व्यक्तींसोबत देखील मैत्री करू शकतो.तसेच त्यांच्याशी आँनलाईन फेसबुकच्या माध्यमाने चँट करू शकतो.आपले फोटो व्हिडिओ मित्र मैत्रीणींसोबत शेअर करू शकतो.

आज तसे पाहायला गेले तर आपणास असे दिसुन येते की लहान मुले,काँलेजात शिकणारे तरूण,तरूणी,प्रौढ तसेच वयस्कर व्यक्ती देखील फेसबुकचा अधिक प्रमाणात वापर करत आहेत.एवढे तंत्रज्ञानाने जग व्यापलेले आहे तसेच विकसित होत चालले आहे.

पण कधी कधी ह्याच तंत्रज्ञानाचा अमर्याद आणि अति वापर केल्यामुळे आपला खुप अमुल्य वेळ वाया जात असतो.

अशा वेळी मल्टीपल सोशल मिडिया अकाऊंट हँडल करण्यात तसेच सोशल मिडियावर चँटिंग करण्यात

आपला अमुल्य वेळ वाया जावू नये म्हणुन आपण कधी कधी आपले फेसबुकवर ओपन असलेले मल्टीपल अकाऊंट डिलीट करायचे ठरवत असतो.

पण फेसबुक अकाऊंट कसे डिलीट करतात ह्या माहीतीच्या अभावामुळे आपल्याला आपले अकाऊंट डिलीट करायचे असताना देखील करता येत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण फेसबुक अकाऊंट कसे डिलीट करावे?हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्याला आपले अकाऊंट काही कारणास्तव डिलीट करायचे असेल तर आपणास अकाऊंट डिलीट करताना कुठलीही अडचण येणार नाही.आणि आपण सहजपणे कोणाची मदत न घेता स्वता आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करू शकतो.

 

फेसबुक अकाऊंट डिलीट कसे करतात?How to Permanently Delete a Facebook Account

 

See also  भारताचे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन काय आहे? Lupex mission meaning in Marathi

 

फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे दोन आँप्शन आपल्यासमोर उपलब्ध असतात.एक टेम्पररी अकाऊंट डिलीट करणे,दुसरे परमनंट अकाऊंट डिलीट करणे.

 

आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपला आयडी पासवर्ड टाकुन लाँग इन करावे लागते.

 

आणि समजा आपल्याला आपला पासवर्ड लक्षात नसेल तर आपण forget password वर जाऊन आपला ईमेल आयडी तसेच मोबाईल नंबर इंटर करून त्याद्वारे जो ओटीपी आपल्या मोबाईलवर पाठवला जातो तो इंटर करून नवीन पासवर्ड सेट करू शकतो.

 

आपल्या फेसबुक अकाऊंटवर लाँग इन केल्यानंतर आपण सर्वप्रथम सेटिंग मध्ये जावे आणि तिथे आपल्याला account ownership and Control असे आँप्शन दिसुन येईल.

 

ज्यावर क्लीक केल्यावर आपल्यासमोर deactivation आणि deletation हे आँप्शन येत असते.ज्यावर एकदा ओके केल्यावर आपल्यासमोर अजुन दोन पर्याय येत असतात.Deactivate आणि delete account.

माहिती -इंस्टाग्राम अकाऊंट कसे डिलीट करावे?-

आपले फेसबुक अकाऊंट तात्पुरता deactivate कसे करावे?

 

जर आपण deactivate हे आँप्शन सिलेक्ट केले तर आपले फेसबुक अकाऊंट हे temporary delete तसेच deactivate होत असते.आणि जेव्हा आपण आपला आयडी पासवर्ड इंटर करून पुन्हा आपल्या फेसबुक अकाऊंट वर लाँग इन करतो तेव्हा आपले अकाऊंट पुन्हा चालू होऊन जात असते.

 

किंवा फेसबुककडुन आपल्याला आपले अकाऊंट deactivate करण्यासाठी कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांचा पर्याय देखील दिला जातो ज्यानंतर आपले फेसबुक अकाऊंट आपोआप reactivate होऊन जात असते.

 

  • आपल्याला जर आपले अकाऊंट काही दिवसांसाठी deactivate करायचे असेल तर आपण deactivate आँप्शन निवडायला हवे आणि मग आपल्यासमोर continue नावाचे बटण येते.तेथे क्लीक करायचे असते.मग आपण आपले अकाऊंट कोणत्या कारणामुळे deactivate करतो आहे ते कारण देऊन खाली दिलेल्या continue बटणावर ओके करावे लागते.
See also  स्पेक्ट्रम म्हणजे काय?-Spectrum meaning in Marathi

 

  • आणि समजा आपल्याला आपले फेसबुक बंद ठेवून फक्त मँसेंजर चालू ठेवायचे असेल तर आपण keep using messenger ह्या पर्यायावर tick करू शकतो

 

  • आणि मग शेवटी खाली दिलेल्या continue option वर एकदा ओके करावे लागते यानंतर आपले अकाऊंट यशस्वीपणे deactivate होऊन जात असते.

 

आपल्या फेसबुक अकाऊंटवर लाँग इन केल्यानंतर आपण सर्वप्रथम सेटिंग मध्ये जावे आणि तिथे आपल्याला account ownership and Control असे आँप्शन दिसुन येईल.

 

 

account ownership and Control असे आँप्शन दिसुन येईल.
ज्यावर क्लीक केल्यावर आपल्यासमोर deactivation आणि deletion हे आँप्शन येत असते.

 

 

 

 

 

 

आपले फेसबुक अकाऊंट तात्पुरता deactivate कसे करावे?

आपले फेसबुक अकाऊंट permanently delete कसे करावे?

 

  • जर आपल्याला आपले अकाऊंट कायमस्वरूपी म्हणजेच परमनंटली डिलीट करायचे असेल तर आपण

         account ownership and Control मध्ये जाऊन

     Deactivate account आणि delete account       ह्या दोन पर्यायांपैकी delete account हा पर्याय सिलेक्ट करावा.आणि मग खाली दिलेल्या continue ह्या बटणावर ओके करावे.

 

  • मग यानंतर आपण जर आपले अकाऊंट परमनंटली डिलीट केले तर आपले फेसबुक अकाऊंट आणि फेसबुक अकाऊंटवर असलेला सर्व महत्वाचा डेटा जसे की फोटो,व्हिडिओ इत्यादी कायमस्वरूपी डिलीट केला जाईल व तो आपल्याला पुन्हा प्राप्त करता येणार नाही असे आपणास फेसबुक कडुन सुचित केले जाते.

 

  • आणि समजा आपल्याला आपला डेटा कायमचा लाँस्ट होऊ द्यायचा नसेल तर आपण फेसबुकने दिलेला डेटा डाऊनलोडचा पर्याय निवडुन अकाऊंट परमनंटली डिलीट करण्याअगोदर आधी आपला महत्वाचा डेटा डाऊनलोड देखील करू शकतो.

 

  • मग यानंतर अकाऊंट डिलीट करण्यासाठी आपण खाली दिलेल्या continue ह्या बटणावर ओके करायचे असते.

 

  • मग यानंतर आपल्याला आपला पासवर्ड विचारला जातो जो जसाच्या तसा आपण तिथे इंटर करायचा असतो.मग पासवर्ड इंटर केल्यानंतर खाली दिलेल्या continue बटणावर ओके करावे लागते.
See also  हॉटस्पॉट म्हणजे काय ? Hotspot information Marathi

 

  • मग यानंतर finally delete account चे आँप्शन आपल्यासमोर येते ज्यावर ओके केल्यावर आपले फेसबुक अकाऊंट कायमचे म्हणजेच permanently delete होऊन जात असते.

 

  • आणि मग शेवटी एक संदेश येतो ज्यात असे दिलेले असते की आपले फेसबुक अकाऊंट हे परमनंटली डिलीट करण्यात येते आहे.

 

  जर आपणास आपले फेसबुक अकाऊंट पुन्हा चालु करायचे असेल तर आपण तीस दिवसाच्या आत आपल्या फेसबुक अकाऊंटवर आयडी पासवर्ड इंटर करून पुन्हा लाँग इन करावे.आणि मग cancel deletion आँप्शन वर ओके करून पुन्हा आपण आपले फेसबुक अकाऊंट चालू करू शकतो.असे न केल्यास आपले फेसबुक अकाऊंट तीस दिवसानंतर कायमचे डिलीट करण्यात येईल.