पीडीएफ फाईलवरून पासवर्ड कसा काढायचा?How to remove password from pdf in Marathi

पीडीएफ फाईलवरून पासवर्ड कसा काढायचा?How to remove password from pdf in Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात आपणास ईमेल वगैरे दवारे अनेक महत्वाचे मॅसेज फाईल तसेच पीडीएफ स्वरुपात प्राप्त होत असतात.

समजा आपल्याला बॅकेकडे एक मॅसेज पाठविण्यात आला आहे ह्या मेसेज मध्ये बॅक अकाऊंट स्टेटमेंट असलेली एक पीडीएफ फाईल देखील पाठविण्यात आली आहे.

आपण ह्या पीडीएफ फाईल वर क्लिक करून जेव्हा ही पीडीएफ पाहण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपणास इथे पासवर्ड विचारला जात असतो.म्हणजेच this file is protected असे सांगत असते.

हा पीडीएफ फाईल ओपन करण्याचा प्रयत्न केल्यावर विचारला जात असलेला पासवर्ड कसा रिमुव्ह करायचा हेच आपण आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.

सगळ्यात पहिले आपणास ही पीडीएफ फाईल आपल्या मोबाईल मधील गॅलरी फंक्शन मध्ये डाऊनलोड करून घ्यायची आहे.

यानंतर गॅलरी फंक्शन मध्ये गेल्यावर आपणास एक document आॅप्शन दिसुन येईल.डाॅक्युमेंट सेक्शन मध्ये गेल्यावर आपणास ही लाॅक लावलेली पीडीएफ फाईल दिसुन येईल.

ह्या पीडीएफ फाईल वर क्लिक केल्यावर आपण गुगल ड्राईव्ह मधुन ओपन करायची आहे.यानंतर ही पीडीएफ फाईल ओपन होईल आपल्याला पासवर्ड विचारला जाईल पासवर्ड विचारताना this file is protected असे आॅप्शन दिसुन येईल.

आता पासवर्ड काढण्यासाठी आपल्याला ती पीडीएफ फाईल सिलेक्ट करून घ्यायची आहे.सिलेक्ट करण्यासाठी आपणास एकदा पीडीएफ फाईल वर लाॅग प्रेस करायचे आहे.

लाॅग प्रेस केल्यावर पासवर्ड ने प्रोटेक्ट असलेली आपली पीडीएफ फाईल सिलेक्ट होईल यानंतर खाली दिलेल्या more option मधील तीन डाॅटवर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर open with असे एक आॅप्शन दिसुन होईल.

यानंतर आपणास गुगल ड्राईव्ह मधून ओपन करायचे आहे अणि आपला पासवर्ड टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या ओपन आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्या बँक अकाऊंटची पीडीएफ फाईल स्टेटमेंट आपल्यासमोर ओपन होईल.

See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi

यानंतर आपल्याला उजव्या बाजूला कोपरयात दिलेल्या तीन डाॅटवर क्लिक करायचे आहे.अणि print ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.यानंतर प्रिंट फाॅरॅमॅट मध्ये पीडीएफ समोर येईल.यानंतर आपण वर दिलेल्या पीडीएफ आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर आपणास विचारले जाईल आपल्याला ही पीडीएफ विदाऊट लाॅक कोठे सेव करायची आहे.दिलेल्या आॅप्शन मध्ये आपणास कुठलेही एक फोल्डर निवडुन घ्यायचे आहे.अणि खाली दिलेल्या save बटणावर क्लिक करायचे आहे.

यानंतर जेव्हा आपण गॅलरी मधे डाऊनलोड सेक्शन मध्ये जाऊ आपणास आपली लाॅक लावलेली पीडीएफ अणि लाॅक न लावलेली पीडीएफ अशा दोन पीडीएफ फाईल आपणास दिसून येतील.

आता आपल्याकडे एक पीडीएफ अशी येऊन जाईल जिथे आपणास कुठलाही पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नसेल.