वेळ आणि संधी , जीवनात जिंकायच ना ? मग आताच, नाहीतर कधीच नाही !! (Importance of time and opportunity)

importance of time and opportunity

आहे ना वेळ? कितीसा वेळ लागेल ?-importance of time and opportunity

अस म्हणून मिळालेली संधी,कार्य,काम पुढं नक्कीच ढकलता येतात पण खरी अडचण ही आहे किं जेव्हा उद्या उजाडतो तेव्हा तो पुन्हा आज झालेला असतो.. ,,,,,,,,,,,,आहे ना विचार करण्यासारखं ??

आणि विशेष म्हणजे आज जो आपण अनुभतोय तो ही काल पर्यन्त उद्याच होता . खरा प्रश्न हा आहे की मिळालेल्या संधीच आपण काय केलंत? काय पावलं उचललीत ? माझ्या अनुभवावरून ,अभ्यासावरून सांगते ,, 95% लोक  आज ही मिळालेली संधी,,वेळ वाया घालवतील ज्या पद्धतीन त्यांनी ही ती काल वाया घालवली!!!

मिळालेल्या संधीच  आपण सोन्यात रूपांतर करू शकलो असतो,, पण आपल्या दिरंगाईमुळे, महत्वाचा वेळ,काळ ,दिवस वाया घालवल्या मुळे एक संधी सहज आपल्या हातातून निसटून गेली.

आपण सर्वांनी वेळोवेळी एक क्षणबर स्तब्ध राहून स्वतःला आठवण करून दिली पाहिजे,, की वेळच निघून जात आहे!! घड्याळाचा काटा सतत टिकटिक करत निरंतरपणे पणे पुढं जातोय .

आपले गोल, टार्गेट . स्वप्न पूर्ण करण्या करता जे करयचा आहे ते आताच!!

एक मजेदार आणि प्रेरणादायी उदाहरण पाहुयात-importance of time and opportunity

जुलै 2002 ची युवी आणि कैफ ने गाजवलेली क्रिकेट मॅच सर्वाना आठवत असेल!!

106 धांवा वर 1 विकेट आणि 146 वर 5 विकेट्स,24 ओव्हर्स मध्ये!!

पण,,,त्यानंतरच्या 24 ओव्हर्स,, आणि120मिनिटात त घडलं ते अवर्णिनिय, अलौकिक आणि अतुलनीय च म्हणावं लागेल!!

See also  अक्षय तृतीया की शुभकामनाएं | Akshaya Tritiya Wishes in Hindi

आपण पाहिलं आपला संघ  त्या शेवटच्या 1 तासात मोठया जोमाने,, अधिक सफाईदारपणे,, हुशारीने,,अधिक ताकदीने,,ऊर्जेने,क्षमतेने खेळ खेळला आणि आपण जिंकलो!!

ह्या 60 मिनिटात, 1 तासात असे काय झालं की भारत जिंकला???

कारण,, येऊ घातलेल्या, संभाव्य पराभवाची अचानक आलेली चाहूल आणि  आता काही तरी केलंच पाहिजे ह्याची तीव्रतेने झालेली जाणीव,, आता नाही तर कधीच नाही !!!

खेळाडूंना समजून चुकलं होत,, वेळ आपल्याला अनुकूल नाही,, आपण आता काही असामान्य कर्तृत्व नाही दाखवलं तर वेळ 60 मिनिटात संपणार आहे.

पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या संघाने असामान्य चातुर्य ,धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर सामना जिंकला,,

भारतीय खेळाडूंमध्ये इतकी क्षमता नक्कीच होती की सुरवातीपासून आपल्या पूर्ण क्षमतेने खेळ  करून खेळावर पकड घेऊन सहज समाना जिंकता आला असता!

पण,,, बऱ्याचदा चांगली उद्धिष्ट ,प्लॅन असूनही आणि खेळाडूंनी सुरवातीला अगदीच सामान्य किंवा।टुकार खेळ केला, परुंतु 146 वर 6 विकेट असा क्षण होता की संघाला येऊ घातलेल्या पराभवाची चाहूल लागली!!

असच आपल्या मानवी जीवनाची कथा!, सेकंडन निसटत जातात,, तास वाया जातात, दिवंसोदिवस वाया जातात,,आणि एक सकाळी आपल्या जाणीव होते अरे संधी तर गेली!!

आयुष्या च्या शेवटी विचार करत बसतो अस केलं असत तर,, तसे झालं असते तर? रुखरुख हळहळ,व्यक्त करत त्या गोष्टी आठवतो ज्या कधी करता आल्या असत्या पण आता हातात काही करण्या सारख राहिलेले नसते.

आयुष्यचा खेळ जेव्हा संपत येतो,,तेव्हा आपल्या चुकांना, त्रुटी ना ,दोषांना,,, दुरुस्त् ,, सुधानरण्या करता हवा असलेला सेकंड चान्स ,,, दुसरी संधी ही दूर निघून गेलेली असते,,

काळ,,क्षण जे निरंतरपणे,, आपल्या पासून जात असतात त्यांना कोण जिंकल कोण हारल ह्याच्याशी काही घेणं देणं नाही !

वेळे ला ,काळाला,,तुमी देत असलेल्या तक्रारी शी, कारणा नाशी ,, तुमी अपेक्षा करत असलेल्या समान संधी शी ही काही घेणं देणं नसते,,,, एक च गोष्ट महत्वाची ,, तुमी मिळालेल्या संधी चा उपयोग कसा केलात?? हा  जीवनातला खेळ तुमी कसा खेळलात??

See also  रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया - Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi

लक्षात असू द्या,,, आपलं वय आज कितीय ,काय आहे हे महत्वाच नाही,,, आपल्या ध्येयपूर्तीसाठी ,स्वप्नां साकार करण्यासाठी आपण आताच ह्याच क्षणी उठून तातडीने कामाला लागल पाहिजे,, पावलं उचलली पाहिजेत!!,

हाच क्षण ,, हीच वेळ ,, आपण सतत, सदैव तयार राहील पाहिजे , कष्ट करत राहिले पाहिजेत ,

एक एक क्षणाचं गांभीर्य,,, महत्वही लक्षात ठेवायला हवं,, लहान लहान क्षण जे आपल्याला आता अगदीच मामुली वाटतात त्यावरच पुढे आयष्यातल यश अपयश अवलंबून आहे!!

अजून ही आपल्याकडे भरपूर वेळ आहे,, अगणित संधी आहे,,असंख्य शक्यता आहेत,,, बरीच वर्षे आहेत,,, आयष्यात बरच काही करून दाखवता येईल!!

आपल्यातल्या बऱ्याच जणां करता  उद्या,, पुढचा आठवडा,, पुढचा महिना आणि पुढेच अनेक वर्षे आहेत, पण आपल्याला जर क्षणांच ,वेळेचं महत्त्व कळून येत नसेल ,, तर आपण सतत  वेळ वाया घालवत राहणार !!!

भावानो स्वप्न पूर्ण करायचं न ???? मग आता वाट कसली पहाताय?

आजच,आताच, ह्याच क्षणी ,,,, फक्त प्लॅन नको , कृती हवी!!

पुढच्या भागात बघुयात वेळेचच सदुपयोग कसा करता  येईल !!

Optimum Nutrition Amino Energy – Pre Workout with Green Tea, BCAA, Amino Acids, Keto Friendly, Green Coffee Extract, Energy Powder – Fruit Fusion, 30 Servings

Alacer Emergen-C Raspberry – 30-Count

अभिवृद्धी म्हणजे काय


पुस्तके – छंद आणि सवयी