15 आँगस्ट निबंध अणि भाषण – Independence Day Essay And Speech In Marathi

15 आँगस्ट निबंध अणि भाषण – Independence Day Essay And Speech In Marathi

सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,पुज्य गुरूजनवर्ग,येथे आपल्या देशाच्या जमलेल्या माझ्या सर्व सळसळते रक्त असलेल्या तरूणांना देशबांधवांना अणि शिलादार यांना माझा नमस्कार.

मित्रांनो आज 15 आँगस्ट म्हणजेच आपल्या देशाचा स्वातंत्रय दिन आहे.अणि आज आपण सर्व जण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत.

आपण सर्वाना माझ्याकडुन सर्वप्रथम स्वातंत्रय दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

आपल्या प्रत्येक भारतीय नागरीकासाठी हा दिवस देशाविषयीच्या खुप अभिमानाचा अणि पराक्रमाचा सन्मानाचा दिवस आहे.आजही इतिहासात ह्या दिवसाची नोंद केली जाते.

कारण कित्येक वर्ष संघर्ष करून भारताच्या स्वातंत्रयसैनिकांनी ब्रिटीशांच्या तावडीतुन आपल्या देशाची 15 आँगस्ट 1947 रोजी मुक्तता केली.तोच हा दिवस आहे.

मित्रांनो आपला देश ब्रिटीशांच्या गुलामीतुन मोकळा व्हावा,आपल्या देशाला स्वातंत्रय प्राप्त व्हावे.

यासाठी महात्मा गांधी,लोकमान्य टिळक,पंडित जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,मंगल पांडे,सुखदेव,राजगुरू,लाला लजपतराय,खुदीराम बोस,इत्यादी अशा देशाच्या अनेक भुमिपुत्रांनी हसत हसत देशासाठी आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली.

मंगल पांडे यांना जेव्हा ब्रिटीश अधिकारीने गोळया घालून ठार केले तेव्हा खरया अर्थाने इंग्रजाविरूदध भारताचा स्वातंत्रयासाठी संघर्ष सुरू झाला होता.कारण यानंतरच देशभरात इंग्रजांविरूदध सगळीकडे वातावरण पेटले.

महात्मा गांधी यांना तर कित्येकदा ह्या स्वातंत्रयाच्या चळवळीमध्ये तुरूंगात जावे लागले होते.लाला लजपतराय यांना ब्रिटीश अधिकारींनी काठीने मारहाण केली ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

म्हणजेच आज आपण जे स्वातंत्रय अनुभवतो ते सहजासहजी मिळालेले नाहीये यासाठी खुप जणांनी जमिनीवर आपले रक्त सांडले आहे.कित्येक जणांना आपले प्राण द्यावे लागले आहेत.

आज हे सर्व जण होते म्हणून आज आपण स्वातंत्रयात जगतो आहे नाहीतर आजही आपण ब्रिटीशांच्या गुलामीतच जगत राहिलो असतो.

आज देखील आपल्या देशातील लाखो सैनिक आपले घर परिवार कुटुंब इत्यादी सर्व काही सोडुन देशाच्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी चोवीस तास बसलेले आहेत.

See also  छोटी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढचे २४ तास खूप महत्वाचे ,ध्यान दिले नाही तर ,तुमचे पैसे अडकू शकतात !!- Deadline to link adhaar to KYC for investors

आज ते सीमेवर उभे राहतात म्हणुन आपण कुठल्याही दुश्मनाची भीती न बाळगता निश्चिंतपणे जगु शकत आहे.झोपु शकत आहे.

15 आँगस्ट हा दिवस दरवर्षी आपण यासाठी साजरा करत असतो की हा दिवस आपण सर्वाना सदैव आठवणीत राहावा,

आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या बलिदानाची,स्वातंत्रयसैनिकांची त्यांच्या शौर्याची आपणास आठवण राहावी यासाठी आपण दरवर्षी हा स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करत असतो.

15 आँगस्ट रोजी सगळीकडे आनंद अणि उत्साहाचे वातावरण असते.या दिवशी सर्व शाळा काँलेज सरकारी कार्यालयांना देखील सुटटी असते.

पण सर्व जण फक्त झेंडा वंदन करण्यासाठी आपापल्या शाळा,काँलेजात,आँफिसमध्ये एकत्र जमत असतात.या दिवशी सर्व शाळा,काँलेज,सरकारी कार्यालये,इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.देशभक्ती वर आधारीत कार्यक्रम देखील आयोजित केले जात असतात.

शाळा काँलेजात अनेक मुले मुली यादिवशी देशभक्तीवर भाषण करत असतात.कवायत परेड, देशभक्तीवर गीत गायन,नृत्य,काव्यवाचन,रांगोळी असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जात असतात.

सर्व विदयार्थी एकत्र मिळुन यादिवशी बाईक रँली देखील काढत असतात.या दिवशी सर्व देश भरात देशभक्तीचा संचार झालेला असतो.

टिव्हीवर देशभक्तीवर आधारीत कार्यक्रम,चित्रपट,गाणे दाखवले जातात.अशा प्रकारे देशाचे संपुर्ण वातावरणच देशभक्तीने रंगलेले असते.

भारत स्वातंत्रय झाला तेव्हा १५ आँगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते लाल किला येथे प्रथम ध्वजारोहण करण्यात आले होते.

तेव्हापासुन भारतात दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात येतो आहे.राष्टगीत म्हणून तसेच २१ तोफांची सलामी देऊन देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व शहीद स्वातंत्रय सैनिकांना आदरांजली वाहण्यात येते.

 

कृष्ण जन्माष्टमी तसेच श्रीकृष्ण जयंती निबंध – Krishna Janmashtami Essay In Marathi

1 thought on “15 आँगस्ट निबंध अणि भाषण – Independence Day Essay And Speech In Marathi”

Leave a Comment