संविधान म्हणजे काय ? What Is a Constitution?

भारताचे संविधान म्हणजे काय ? 

संविधान म्हणजे काय  : अर्थ – What Is a Constitution?

देशाच्या कारभारा संबधीच्या  तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तस्तुदींचा लिखित दस्तऐवज होय.

  • जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संबिधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते.
  • संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो.
  • संबिधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते.
  • संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदा., नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायदयांचे बिषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी.
  • संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते.
  • इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतींत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंबा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उदिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करते.
  • आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारताबर इंग्रजांचे राज्य होते.

इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत ब मद्रास प्रांत यांसारखे बिभाग पाडले होते.

या डॉ.राजेंद्रप्रसाद प्रांतांपधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते.अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रात आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समाबेश होता.

संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे

योगदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा बिबिध देशांच्या संबिधानाचा गाढा अभ्यास होता.

त्यांनी अहोरात्र अभ्यास ब चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संबिधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.

संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी बिचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संबिधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.