केवायसी फ्रॉड म्हणजे काय? | KYC fraud meaning in Marathi

केवायसी फ्रॉड म्हणजे काय? | KYC fraud meaning in Marathi

केवायसी फ्रॉड म्हणजे काय हे बघण्याआधी आपण केवायसी म्हणजे काय याचे महत्त्व काय असते हे थोडक्यात जाणुन घेऊया.

केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर (know your customer) ही एक प्रक्रिया आहे जिच्या दवारे विविध वित्तीय संस्था,कंपन्या,बॅक व्यवसायाकडुन आपल्या ग्राहकाची ओळख पडताळणी केली जात असते.

कंपनीकडुन नव्याने नोकरी दिल्या जात असलेल्या नवीन कर्मचारी वर्गाची ओळख पडताळणी केली जात असते.

केवायसी प्रक्रियेमुळे सर्व वित्तीय संस्था कंपन्या बॅक यांना आपल्या कस्टमरला नीट व्यवस्थित समजुन घेण्यास मदत होत असते.

केवायसी करण्याचा मुख्य हेतु हा जागोजागी होत असलेले ओळख चोरीचे होणारे प्रकार रोखणे,मनी लाॅडरींग तसेच आर्थिक फसवणुकीला आळा घालणे हा आहे.

आरबी आयच्या नियमाप्रमाणे आता केवायसी करणे प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आले आहे.

मुदतपूर्व मुदत ठेव काढण्याचे शुल्क अणि त्याचे नियम

KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांचे खालील दिलेले तपशील गोळा केले जात असतात-

  •  कायदेशीर नाव
  • ओळखीचा पुरावा
  • ओळखीच्या पुराव्यानुसार कायमचा पत्ता दुरुस्त करणे
  • संस्था किंवा व्यक्तीची कायदेशीर स्थिती

केवायसी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्यासाठी तुम्ही आमचे केवायसी म्हणजे काय?हे आर्टिकल वाचु शकतात.

केवायसी फ्राॅड म्हणजे काय?

सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ह्या केवायसी म्हणजे ओळख पडताळणी प्रक्रियेचा आता जागोजागी फसवणुक करण्यासाठी अवाजवी फायदा घेतला जात आहे

 ह्या केवायसी प्रक्रियेचा सध्या सायबर गुनहेगारांकडून जागोजागी लोकांची आॅनलाईन फसवणुक करण्यासाठी त्यांना लुबाडण्यासाठी गैरवापर केला जात आहे.यालाच केवायसी फ्राॅड असे म्हटले जाते.

या तरतुदीचा अवाजवी फायदा घेण्यासाठी गैरवापर करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडुन‌ नागरीकांना केवायसी प्रक्रिया करण्याचे खोटे बनावट एस एम एस अणि टेक्स्ट संदेश पाठविले जातात.

केवायसी फ्राॅड प्रक्रीयेत नागरीकांकडुन त्यांच्या बॅकेचा वैयक्तिक तपशील माहीती जसे की बॅक खाते क्रमांक एटीएम कार्ड नंबर इत्यादी गोळा करण्यासाठी बॅक प्रतिनिधी असल्याचे सांगुन नागरीकांची फसवणुक करण्यासाठी त्यांना काॅल केला जातो.

किंवा नागरीकांना एखादी फिशिंग लिंक पाठवली जाते,मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर, आपणास फसवणूक केलेल्या वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाते आणि बँकेचे वापरकर्ता नाव,पासवर्ड, ओटीपी इत्यादी प्रविष्ट करण्यास सांगितले जाते.

किंवा मेसेज मध्ये १० अंकी मोबाईल नंबर दिला जात असतो,मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केल्यावर, आपल्याला आपला खाते वापरकर्ता नाव,पासवर्ड,खाते क्रमांक, मोबाईल वर आलेला ओटीपी इत्यादी वैयक्तिक तपशील शेअर करण्यास प्रवृत्त केले जाते.

 फसवणूक करणारा फसवणूक करण्यासाठी आपल्या बँक खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी या तपशीलांचा वापर करतो.

किंवा नागरीकांना त्यांच्या डिव्हाईस मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी राजी केले जाते.

डिव्हाईस मध्ये प्रवेश प्राप्त करण्यासाठी हे सायबर गुन्हेगार एखादी अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगत असतात.किंवा एखादी लिंक देऊन त्यावर वर क्लिक करायला सांगत असतात.

जेणेकरून त्यांना लोकांच्या मोबाईल डिव्हाईस मध्ये अनधिकृत पणे प्रवेश करता येईल अणि त्यांचा बॅक तपशील प्राप्त करून त्यांचे खाते रिकामे करता येईल.

असे फसवणुकीचे प्रकार सध्या सरासपणे घडुन येत आहे ज्यामुळे कष्टकरी कामगार अशिक्षित लोकांना आपला कष्टाचा पैसा गमवावा लागतो आहे.

अशी फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार बँक किंवा ई-वॉलेट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिकांना खोटे बनावट कॉल करतात.

मग त्यांना ताबडतोब केवायसी अपडेट करण्याची विनंती करतात आणि असे केले नाही तर तुमचे खाते कायमचे ब्लॉक केले जाईल निलंबित केले जाईल अशी धमकी किंवा इशारा देत असतात.

 कॉलर म्हणतो की तुम्हाला तुमचे खाते सक्रिय ठेवायचे असेल तर तुम्ही सत्यापन/केवायसी ऑनलाइन देखील करू शकतात.

आणि मग हे काॅलर ग्राहकांना त्यांच्या वापरल्या जाणार्‍या डिजिटल डिव्हाइसवर म्हणजे मोबाईल मध्ये ही अॅप डाउनलोड करण्यास सांगत असतात.

 एकदा मोबाईल मध्ये अॅप डाउनलोड केल्यानंतर,फसवणूक करणारे तुम्हाला कोड सामायिक करण्यास आणि काही परवानग्या देण्यास सांगत असतात,ज्यामुळे त्यांना तुमच्या डिजिटल डिव्हाइसमध्ये सहजपणे प्रवेश मिळत असतो.

 त्यानंतर कॉलर पीडित व्यक्तीला तुमच्या बँक खात्यातून एक छोटीशी रक्कम हस्तांतरित करा असे सांगतो,जे त्यांना डिजिटल डिव्हाइसवर पाठवलेला OTP पाहण्यास किंवा ऍक्सेस करण्यास सक्षम करते.

 जेव्हा पीडित व्यक्ती ही छोटीशी रक्कम पैसे हस्तांतरित करते,तेव्हा कॉलरला तुमचा पासवर्ड आणि इतर महत्त्वाचे तपशील दिसतात,ज्याचा वापर फसव्या व्यवहारासाठी आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून टाकण्यासाठी केला जातो.

केवायसी फ्रॉड कसा ओळखायचा? केवायसी फसवणुकीपासून बचाव कसा करायचा?

  • केवायसी फ्राॅड मध्ये आपल्या बॅक खात्यात अनिधिकृतपणे प्रवेश घेण्यासाठी आपणास आपला खाते क्रमांक पिन नंबर पासवर्ड विचारला जात असतो.
  • आपल्या मोबाईल मध्ये एखादे अॅप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते अणि अॅपला आपल्या मोबाईल मध्ये सर्व परमिशन देण्यास सांगितले जाते.
  • बॅकेच्या अधिकृत नंबरवरून मेसेज काॅल न करता आपणास मोबाईल नंबर वरून संदेश पाठविले जातात काॅल केला जातो.
  • आपणास प्राप्त झालेला मेसेज,हा नोंदणीकृत बँकेच्या नावाऐवजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आला असल्याचे दिसुन येईल.

वरील सर्व कंडिशन आपणास आढळून आल्या तर समजुन घ्यायचे आपल्यासोबत केवायसी फ्राॅड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केवायसी फ्रॉड पासुन बचावासाठी काय करायचे?

  • आपला खाते क्रमांक पिन नंबर पासवर्ड कोणत्याही बॅक प्रतिनिधी नावाने काॅल करणारया व्यक्तीला द्यायचा नाही.
  • आपल्या मोबाईल मध्ये कुठलेही अनधिकृत अॅप डाऊनलोड करायचे नाही अणि त्याला आपल्या मोबाईल मधील डेटा अॅक्सेस करण्याची परमिशन देखील द्यायची नाही.
  • बॅकेच्या अधिकृत नंबरवरून मेसेज काॅल न येता आपणास एखाद्या खाजगी मोबाईल नंबर वरून बॅक प्रतिनिधी म्हणून संदेश पाठविला गेला किंवा काॅल केला गेला असल्यास त्या काॅलरला आपली बॅक डिटेल द्यायची नाही.
  • आपणास प्राप्त झालेला मेसेज,हा नोंदणीकृत बँकेच्या नावाऐवजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आला असल्याचे दिसुन आले तर समजुन घ्यायचे हा केवायसी फ्राॅडचा प्रकार आहे.
  • बॅकेच्या नावाने केवायसी करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या कुठल्याही अनोळखी अनधिकृत लिंकवर क्लिक करायचे नाही.
  •  एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की बँक/वॉलेट कंपन्या किंवा इतर अधिकृत संस्था कधीही केवायसी अपडेट करण्यासाठी कॉल करून केवायसी करायला सांगत नाहीत किंवा आपल्या गू केवायसी करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नसतात.
  •  नेहमी लक्षात असु द्यावे की एक वैध ग्राहक सेवा क्रमांक हा 10 अंकी मोबाईल क्रमांक असू शकत नाही जो सामान्यतः बनावट संदेशात दिला जातो.
  • आपला मोबाईल नंबर,खाते क्रमांक,पासवर्ड, ओटीपी, पिन किंवा इतर कोणताही गोपनीय तपशील कधीही कोणासोबत शेअर करू नका.  कारण कोणतीही अधिकृत बँक किंवा ग्राहक सेवा कधीही आपल्या ग्राहकांना कोणतीही गोपनीय माहिती शेअर करण्यास सांगत नाही.
  •  गुगल वर कुठल्याही वेबसाईटवर दिलेल्या ग्राहक सेवा क्रमांकांशी संपर्क करणे टाळावे हे नंबर फेक असु शकतात.फक्त मूळ बँकिंग वेबसाइटवर दिलेल्या अधिकृत क्रमांकांवर नेहमी संपर्क साधा.
  • एक गोष्ट लक्षात असु द्या की जोपर्यंत तुम्ही एखादी कोणतीही फसवी अॅक्टीव्हीटी करत नाही तोपर्यंत बॅकेकडुन तुमचे खाते बँक/कोणत्याही ई-वॉलेटद्वारे कधीही ब्लॉक केले जात नसते.
  •  रिमोट ऍक्सेस प्रकारचे ऍप्लिकेशन (AnyDesk , Quicksupport ,Team Vier इ.) डाऊनलोड करून कोणालाही आपल्या डिव्हाइस मध्ये अनधिकृत प्रवेश देणे टाळा.
  • अधिकृत स्टोअर/वेबसाइटवरून डाउनलोड केलेले मूळ अॅप्सच नेहमी वापरा,इतर थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करणे त्या आपल्या डिव्हाईस मध्ये डाउनलोड करणे टाळा.
  • सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपणास अशी कोणतीही समस्या असेल तर ताबडतोब विशिष्ट बँक अधिकारींशी संपर्क साधावा त्यांना याबाबत त्वरीत कळवा.
  • आपली जर अशी कुठलीही आॅनलाईन फसवणुक करण्यात आली तर याबाबत सरकारी पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार दाखल करत जा.