ज्यांचा मोबाईल नंबर पोस्ट खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यातील व्यवहार आता बंद केले जाणार – Post office update 2023 link mobile number with post office account in Marathi

ज्यांचा मोबाईल नंबर पोस्ट खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यातील व्यवहार आता बंद केले जाणार post office update 2023 link mobile number with post office account in Marathi

ज्या भारतातील नागरीकांनी पोस्ट ऑफिस  मधील कुठल्याही एखाद्या saving scheme किंवा investment scheme योजनेत आपल्या पैशांची गुंतवणूक केली आहे अशा पोस्ट खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची सुचना आहे.

पोस्ट खात्याकडुन आपल्या पोस्टल खाते धारकांना एक सुचना देण्यात आली आहे.ज्यात असे दिले आहे की ज्या पोस्ट खातेधारक गुंतवणुकदारांनी पोस्ट खात्यातील एका किंवा एकापेक्षा अनेक योजनेत आपल्या पैशांची गुंतवणूक केली असेल.

अशा सर्व खातेधारकांनी ३१ मार्च २०२३ अगोदर आपल्या सर्व पोस्ट खात्यात गुंतवणूक केलेल्या विविध योजना खात्यांशी आपला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे.

कारण आता पोस्ट खात्यात गुंतवणुक केलेल्या कुठल्याही योजनेशी आपला मोबाईल नंबर लिंक करणे पोस्ट खात्याकडुन‌ अनिवार्य करण्यात आले आहे.

ज्या पोस्ट खाते धारकांनी अद्याप आपल्या saving scheme अणि investment scheme खात्याशी आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाहीये त्यांनी लवकरात लवकर ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करून घ्यायचा आहे.

अन्यथा १ एप्रिल २०२३ पासुन आपणास कुठल्याही बचत तसेच गुंतवणुक खात्यातुन पैसे भरणे किंवा पैसे काढणे असे कुठलेही व्यवहार करता येणार नाहीये.

यामुळे पोस्ट खातेधारकांची खुप मोठी फजिती होऊ शकते कारण याने पोस्ट खाते धारक जे पैसे नियमित आपल्या खात्यात जमा करत असतात ते त्यांना आपल्या योजनेशी मोबाईल नंबर लिंक नसल्यास भरता येणार नाहीये.

अणि वेळेवर पैसे न जमा केल्याने खाते धारकांना दंड देखील भरावा लागु शकतो.किंवा एक विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त दिवस पोस्ट खात्यातील व्यवहार बंद ठेवले तर पोस्ट खाते धारकांचे खाते देखील बंद केले जाऊ शकते.

त्यामुळे आपण देखील पोस्ट आॅफीस च्या विविध योजनांमध्ये आपले पैसे गुंतवले असतील तर लवकरात लवकर आपल्या प्रत्येक खात्याशी मोबाईल नंबर ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करून घ्या.

See also  राईट टू हेल्थ बील म्हणजे काय - Right to health bill meaning in Marathi

पोस्ट ऑफिस  मधील बचत अणि गुंतवणुक योजना पुढीलप्रमाणे आहेत-post office saving and Investment scheme in Marathi

1) पोस्ट ऑफिस  बचत खाते -post office saving account

2) पोस्ट ऑफिस  आवर्ती ठेव -post office recurring deposit

3) पोस्ट ऑफिस  मुदत ठेव खाते -post office fixed deposit account

4) पोस्ट ऑफिस  मासिक उत्पन्न योजना -post office monthly income scheme

5) पोस्ट ऑफिस  ज्येष्ठ नागरिक बचत योजना -Post Office Senior Citizen Savings Scheme

6) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी -public provident fund