Machine Learning विषयी माहीती – Machine Leaning Marathi Information

माहीती – What is Machine Learning – Machine Leaning Marathi Information

मशिन लर्निग ही एक आकडेवारी (data) ची गणिती प्रातिमान वापरुन  संगणकाला शिकवण्याची एक प्रक्रिया असते , जेणेकरून संगणकाला कोणतीही सुचना न देता तो स्वता काम करण्यास शिकेल.

मशिन लर्निग हे एक सायन्स आहे.जे कोणत्याही डेटाचे विश्लेषण करून त्यातुन काहीतरी शिकण्याकरीता मशिनला दिले जाणारी एक विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण असते.

ज्या प्रमाणे आज मनुष्य कोणत्याही डेटाला तसेच आपल्या जीवणातील कोणत्याही घटना,प्रसंगाला प्रथम विश्लेषण करून समजुन घेतो.आणि मग त्यातुन आपल्याला काय शिकायला मिळते आहे?तसेच काय शिकण्यासारखे आहे हे जाणुन घेत असतो.

त्याचप्रमाणे आज मानवाप्रमाणे मशिन्सला देखील कोणताही डेटा नीट समजुन घेण्याचे आणि त्याचे विश्लेषण करून त्यावर एक योग्य निष्कर्ष काढुन त्यातुन आपल्याला काय शिकायला मिळते आहे?तसेच काय शिकण्यासारखे आहे हे जाणुन घेण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

आणि ह्याच सायन्स आणि टेक्नाँलाजीला आपण मशिन लर्निग म्हणुन ओळखतो.

आजच्या लेखात आपण ह्याच मशिन लर्निगविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

Machine Learning म्हणजे काय?- Machine Leaning Marathi Information

मशिन लर्निग ही एक आकडेवारी(data) ची गणिती प्रातिमान वापरुन  संगणका ना शिकवण्याची एक प्रक्रिया असते  जेणेकरून संगणकाला कोणतीही सुचना न देता तो स्वता काम करण्यास शिकेल.

थोडक्यात मशिन लर्निग ही एक अस तंत्र आहे जिचा वापर करून आपण कंप्युटरला जास्त सुचना न देता सर्व कामे त्याला स्वता आपोआप करता यावी अशी एक कार्यप्रणाली बनवत असतो.

Machine Learning Method कशा पदधतीने कार्य करते?

See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi

मशिन लर्नीग कोणत्याही डेटामधील पँटर्न ओळखण्यासाठी आपल्या अल्गोरिदमचा वापर करत असते.आणि मग त्यातील सँपलचा वापर नवीन डेटा माँडेल तयार करण्यासाठी करत असते.जेणेकरून त्याला डेटाचा अंदाज बांधता येत असतो.

Machine Learning आणि Artificial Intelligence यांच्यात काय संबंध असतो?

आपल्याला ही एक गोष्ट चांगलीच माहीत आहे की मशिन लर्निग टेक्नाँलाँजी ही आर्टिफिशल इंटलिजन्सचाच एक उप भाग आहे .ज्याचे प्रमुख कार्य मशिनला मागील डेटाचा (महितीचा )अंदाज घेऊन शिकण्यास मदत करणे हे असते.यात आपल्याला कोणतेही प्रोग्रँमिंग करण्याची आवश्यकता भासत नसते.

आर्टिफिशल इंटलिजन्स हे एक असे तंत्रज्ञान आहे जिचा वापर करून आपण कोणत्याही मशिनला मानवासारखे वर्तन करण्यासाठी तसेच मानवाचे अनुकरण करण्यास,मानवाप्रमाणे कार्य करण्यास सक्षम बनवू शकतो.

Machine Learning आणि Predictive Analysis यात काय फरक असतो?

आपल्याला ही एक गोष्ट माहीत आहे की मशिन लर्निग हे एक प्रकारचे प्रिडेक्टिव्ह अँनेलिसेस असते.

पण दोघांमध्ये हा फरक आहे असतो की मशिन लर्निग आपण रिअल टाईम अपडेटसाठी वापरत असतो कारण त्यात अधिक डेटा प्राप्त केला जात असतो.

प्रिडेक्टिव्ह अँनँलिसेस हे स्थिर डेटा अपडेट देण्याचे काम करते.आणि अप टु डेटसाठी आपल्याला याला रिफ्रेश देखील करावे लागत असते.

Machine Learning चा Deep Learning सोबत काय संबंध असतो?

डीप लर्निग हा मशिन लर्निगचाच एक महत्वाचा भाग तसेच विशिष्ट पदधत आहे.

यात मानव ज्या पदधतीने कोणतेही ज्ञान प्राप्त करतो त्याचप्रमाणे त्याचे सखोल अनुकरण करून मशिन हे सखोल ज्ञान प्राप्त करत असते.ज्याला डीप लर्निग असे म्हटले जात असते.

Machine Learning Technology चे कोणकोणते फायदे असतात?

मशिन लर्निगचे आपल्याला अनेक फायदे होत असतात आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :

  1. मशिन लर्निगद्वारे संरचना केलेल्या तसेच संरचना न केलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या डेटामधील पँटर्न आणि स्ट्रक्चर ओळखण्यास आपली मदत होत असते.
  2. डेटामध्ये जी स्टोरी दिलेली असते ती आपण ओळखु शकतो.
  3. डेटा मायनिंगच्या प्रोसेसमध्ये मशिन लर्निग हे फार उत्तम मानले जाते.कारण याच्याने डेटा इंटीग्रिटी मध्ये सुधारणा होत असते.
  4. मशिन लर्निगमुळे कस्टमरचा अनुभव अनुकुलीत करत असते.याचे उत्तम उदाहरण आहे यातील अँडँप्टिव्ह इंटरफेस,टार्गेट कंटेट,चँट बोटस आणि व्हाँईस ईनेबल व्हरच्युअल असिस्टंट.
  5. आज फसवणुकीसाठीचे डावपेच सतत बदलताना आपणास दिसुन येत असतात.मशिन लर्निग अशा नवीन पँटर्नसला माँनीटर करण्याचे काम करते.आणि ह्या नवीन पँटर्नला फसवणुकीचा प्रयत्न यशस्वी होण्याअगोदर ओळखत असते.आणि पकडुन देत असते.
  6. कस्टमरच्या अँक्टिव्हीटी तसेच बिहेव्हीअरचा अंदाज घेण्याचे काम मशिन लर्निग करत असते.यासाठी ते कोणतेही पँटर्न तसेच कस्टमर बिहेव्हीअर ओळखण्यासाठी डेटावर रिसर्च करत असते.आणि उत्पादनाच्या शिफारसींना आँप्टीमाईज करून एक बेस्ट कस्टमर एक्सपिरीअंस प्रदान करत असते.
  7. मशिन लर्निगचा अजुन एक महत्वाचा फायदा आहे लो काँस्ट याचसोबत हे आपल्या टीमला अशा गोष्टींवर लक्ष देण्यासाठी अनुमती देत असते.ज्या अत्याधिक महत्वपुर्ण आहेत.म्हणजेच मशिन लर्निग आपल्याला टाईम आणि रिसोर्स फ्री करत असते.
See also  अफिलिएट मार्केटिंग Niche कसा शोधावा ? 4 मुद्द्यावर लक्ष देण गरजेचं-Best Affiliate Niche in Marathi

Machine Learning च्या Techniques किती आणि कोणकोणत्या आहेत?

मशिन लर्निगच्या तीन प्रमुख पदधती आहेत ज्या आपण मशिन लर्निगमध्ये वापरत असतो.

1)Supervised Learning – मानवी देखरेखीखाली

2)Unsupervised Learning – मानवी देखरेख न करता

3)Reinforcement Learning – एकाद्या परिस्थित योग्य पावलं उचलत – निर्णय घेत योग्य तो निकाल / परिणाम मिळवण

1) Supervised Learning :

यात लेबल्स आणि स्ट्रक्चरसोबत डेटा सेटला संबोधित केले जात असते. यात डेटा एक टिचर बनुन मशिनला ट्रेन करत असतो.आणि मशिनच्या प्रिडिक्शन करण्याच्या आणि डिसीजन घेण्याच्या क्षमतेत वाढ घडवून आणत असतो.

2) Unsupervised Learning –

यात लेबल्स आणि स्ट्रक्चरशिवाय डेटा सेटला संबोधित केले जात असते.क्लस्टरमध्ये डेटाचे गृप तयार करून त्यांच्यातील पँटर्न आणि रिलेशनशीप शोधत असते.

3) Reinforcement Learning –

यात मानवी आँपरेटरला बदलून त्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी कंप्युटर प्रोग्रामचा वापर केला जातो.जो फीडबँक लुपवर आधारीत परिणाम निर्धारीत करण्याचे काम करत असतो.

कोणतीही समस्या सोडविण्यासाठी मशिन लर्निग कशापदधतीने कार्य करत असते?

कोणतीही समस्या सोडविण्यासाठी मशिन लर्निग पुढीलप्रमाणे कार्य करत असते :

1)माहिती गोला करणे – डेटा संग्रहित करणे आणि तो तयार करणे :

2)प्रतिमान प्रशिक्षण – माँडेलला ट्रेनिंग देणे :

3) प्रतिमान 0-  माँडेलच्या अचुकतेचे मुल्यांकन करणे :

4) आलेल्या निकालाचा योग्य निष्कर्ष लावून त्यातुन योग्य अर्थ काढणे :

1)डेटा संग्रहित करणे आणि तो तयार करणे :

सगळयात आधी डेटाचे मेन सोर्स ओळखुन त्यातील उपलब्ध डेटा संग्रहित करत असते.यातच आपल्याकडे जे डेटाचे टाईपस असतात ते आपल्याला कोणते मशिन लर्निग अल्गोरिदम आपण वापरावे हे ठरवण्याबाबद साहाय्य करत असतात.

जेव्हा आपण आपल्या डेटाला रिव्युव्ह करून बघत असतो.तेव्हा त्यातील अबनाँरमलीटीज ओळखल्या जात असतात.मग नवीन स्ट्रक्चर डेव्हलप करून डेटा इंटिग्रिटीचे प्राँब्लेम्स साँलव्ह केले जात असतात.

2) माँडेलला ट्रेनिंग देणे :

यात तयार केलेल्या डेटाला दोन गटात विभाजित केले जाते.हे दोन गट असतात ट्रेनिंग सेट आणि टेस्टींग सेट.ट्रेनिंग सेट हा आपल्या डेटाचा एक महत्वाचा पार्ट असतो.जो आपल्या मशिन लर्निग माँडेलला हायेस्ट अँक्युरीसीमध्ये टयुन करण्यासाठी वापरतात.

See also  2021 -10 बेस्ट फ्री फोटो एडिटिंग अँप्स -Best free photo editing apps Marathi information

3)माँडेलच्या अचुकतेचे मुल्यांकन करणे :

जेव्हा आपण आपले शेवटचे डेटा माँडेल वापरण्यासाठी त्याची निवड करण्यासाठी सज्ज असतो.टेस्ट सेटचा वापर हा त्याच्या परफाँमर्स आणि अचुकतेचे मुल्यांकन करण्यासाठी केला जात असतो.

4) आलेल्या रिझल्टचा योग्य निष्कर्ष लावून त्यातुन योग्य अर्थ काढणे :

आणि सगळयात शेवटी आलेल्या आऊटकमचा रिव्युव्ह केला जात असतो.मग त्याविषयी योग्य तो निष्कर्ष काढुन परिणामांचा अंदाज लावला जात असतो.

Machine Learning काय करत असते?

मशिन लर्निग हे पुढील कार्य करत असते :

1) मूल्य निर्धारण -Value Predict करणे:

2) असामान्यता ओळखणे – Unusual Occurrence Identify करणे :

3) रचना शोधणे – Structure Find करणे :

4) श्रेणी निर्धारण करणे –  Categories चा अंदाज लावणे :

1)Value Predict करणे :

मशिन लर्निग हे कोणत्याही व्हँरीएबल्समधील रिझन तसेच इफेक्ट ओळखण्यासाठी फार उपयुक्त मानले जाते.

रिग्रेशन अल्गोरिदम व्हल्युंनमधून एक माँडेल तयार केले जाते.ज्याचा उपयोग नंतरून योग्य तो अंदाज बांधण्यासाठी तर्क काढण्यासाठी केला जात असतो.

रिग्रेशन स्टडीद्वारे भविष्याचा अंदाज लावला जात असतो.आणि उत्पादनाच्या मागणीचा अंदाज,सेलिंगच्या आकडेवारीचा,पुर्ण मोहीमेच्या होत असलेल्या परिणामांचा अंदाज लावायला साहाय्य करत असते.

2) Unusual Occurrence Identify करणे :

मशिन लर्निगचा वापर Unusual Occurrence Identify करण्यासाठी म्हणजेच रिस्क शोधण्यासाठी केला जात असतो.

3) Structure Find करणे :

क्लस्टरींग अल्गोरिदमला मशिन लर्निगची फस्ट स्टेप म्हटले जाते जिचे काम डेटासेटमधील अंतरनिहित रचना रीव्हील करणे हे असते.तसेच सारख्या वस्तुंचे वर्गीकरण करत असते.

क्लस्टरींग मेथडचा वापर मार्केट सेगमेंटेशनसाठी केला जातो.जे अंतरदृष्टी आँफर करून किंमत निवडायला आणि कस्टमरच्या प्राधान्याविषयी अपेक्षा करायला मदत करत असते.

4) Categories चा अंदाज लावणे :

क्लासिफिकेशन अल्गोरिदम माहीतीचा योग्य गट तसेच श्रेणी निर्धारीत करायला मदत करत असतो.

[catlist name=टेक्नॉलॉजी numberposts=5]

1 thought on “Machine Learning विषयी माहीती – Machine Leaning Marathi Information”

Comments are closed.