नाॅन क्रिमिलेअर म्हणजे काय? Non creamy layer meaning in Marathi

नाॅन क्रिमिलेअर म्हणजे काय?Non creamy layer meaning in Marathi

नाॅन क्रिमिलेअर म्हणजे आपण उन्नत तसेच प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाण असणारे महत्वाचे कागदपत्र होय.

समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास तसेच गरीब प्रवर्गातील घटकांना आरक्षणाचा लाभ प्राप्त व्हावा म्हणून हे महत्वाचे कागदपत्र,दस्त ऐवज देण्यात येत असते.

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारावर दिले जात असते.

हे सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्या आई वडिलांच्या मागील तीन वर्षातील प्रत्येक वर्षातील उत्पन्न आठ लाखाच्या आत असायला हवे.

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे आपणास माननीय उपजिल्हाधिकारी सर्टिफिकेट बनवण्यासाठी योग्य ती कागदपत्रे दिल्यावर हे सर्टिफिकेट आपणास उपलब्ध करून देतात.

शासनाने नेमुन दिलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्र अर्थात सेतु केंद्रामध्ये आवश्यक ती सर्व योग्य कागदपत्रे सादर केल्यानंतर हे सर्टिफिकेट आपणास मिळत असते.

तसेच नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपण सीएससी महा आॅनलाईन सिटीजन सर्विस ह्या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.अणि आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने सादर करावा लागेल.

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपणास किमान १५ ते २० दिवस इतका कालावधी लागतो.

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतो?

Non creamy layer meaning in Marathi
Non creamy layer meaning in Marathi

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा उपयोग शासकीय तसेच निमशासकीय शासन अनुदान प्राप्त असलेल्या संस्था मध्ये सेवेतील रिक्त जागेकरीता मागासवर्गीय उमेदवारांना नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असते

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक संस्था मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अॅडमिशन घेत असताना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा तसेच सामाजिक आरक्षणाचा लाभ प्राप्त करण्यासाठी नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उपयोगी पडत असते.

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी कोणते महत्वाचे कागदपत्रे लागतात?

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट बनवण्यासाठी पुढील काही महत्वाचे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे –

See also  डिकार्ड फी चा फुलफाँर्म काय होतो? - DCARDFEE full form in Marathi

१)ओळखीचा तसेच पत्याचा पुरावा –

आधार कार्ड

मतदान कार्ड

ड्रायव्हिंग लायसन

२) स्थानिक रहिवासी पुरावा –

तलाठी कडील स्थानिक रहिवासी दाखला

रेशनकार्ड झेराॅक्स

३)शैक्षणिक व जन्म तारखेचा पुरावा-

शाळा सोडल्याचा दाखला/टीसी

बोनाफाईड सर्टिफिकेट

४)जातीचा दाखला

५)तहसीलदार यांच्याकडून मिळालेला तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला

६) तीन पासपोर्ट साईज फोटो

७) तहसील अर्ज

नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेटचे महत्व –

ज्या उमेदवारांकडे नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट नाहीये अशा उमेदवारांना आरक्षणाचा लाभ प्राप्त होत नाही.हे सर्टिफिकेट फक्त एक वर्षासाठी गृहित धरले जाते यानंतर आपणास ते पुन्हा रिनिव्ह करावे लागते.यासाठी आपणास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागत असतो.