नोरो व्हायरस विषयी माहीती – Norovirus information in Marathi

नोरो व्हायरस विषयी माहीती Norovirus information in Marathi

मित्रांनो कोरोना व्हायरस नंतर आता एका नवीन व्हायरसने आपल्या जीवनात शिरकाव केला आहे ज्याचे नाव नोरोव्हायरस असे आहे.

एक दोन दिवसापुर्वीच केरळ येथील एका शाळेत दुपारी मध्यांतरातील काळात जेवण करत असताना अचानक काही विदयार्थींची प्रकृती बिघडली होती.

आणि जेव्हा त्या मुलांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले तेव्हा असे निर्दशनास आले की त्यांना नोरोव्हायरस झाला होता.

म्हणुन आता आपण सगळयांनी स्वताच्या आरोग्याची आणि खासकरून स्वच्छतेची काळजी घेणे फार आवश्यक झाले आहे.

कारण आरोग्य विभागाने देखील सांगितले आहे की नोरोव्हायरस हा घाणेमुळे आणि संक्रमणामुळे पसरणारा रोग आहे.

आजच्या लेखात आपण नोरोव्हायरस विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्याला ह्या रोगाबाबद अधिक सतर्कता पाळता येईल.

नोरोव्हायरस काय आहे?what is norovirus meaning of norovirus in Marathi

नोरोव्हायरस हा एक असा विषाणुचा प्रकार आहे जो संसर्गामुळे पसरत असतो.

नोरो व्हायरस हा कसा पसरतो?How is the norovirus spread in Marathi

नोरो व्हायरस हा घाणेमुळे दुषित अन्नाचे पाण्याचे सेवन केल्याने पसरतो.आणि संक्रमणामुळे पसरत असलेला संसर्गजन्य रोग आहे.हा एका संक्रमित व्यक्तीमुळे इतरांना जडणारा रोग आहे.आणि हा विषाणु एकदम सहजरीत्या आणि पटकन पसरणारा आहे.

See also  नृत्य करण्याचे कोणकोणते फायदे आहेत - 10 Benefits of Dance in Marathi

नोरोव्हायरस कशामुळे होतो?cause of norovirus transmission in Marathi

नोरो व्हायरस हा घाणेला स्पर्श केल्यामुळे,नोरो व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने,दुषित अन्नपदार्थ तसेच पाण्याचे सेवन केल्याने देखील होतो.

नोरोव्हायरसचा संसर्ग कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो?what age people can be infected with Norovirus in Marathi

नोरोव्हायरस हा लहानांपासुन ते मोठयांपर्यत कुठल्याही वयोगटातील व्यक्तीस जडु शकतो.

नोरोव्हायरसपासुन कोणाला अधिक धोका संभवतो?

नोरोव्हायरस हा कुठल्याही वयोगटातील व्यक्तीस जडु शकतो.पण या आजाराचा धोका अधिककरून तरुण,वृदध व्यक्ती आणि ज्यांच्यामध्ये प्रतीकारक्षमता खुप कमी आहे यांना जडण्याची शक्यता आहे.जी व्यक्ती दुषित अन्न पाणीचे सेवण करते अशा कुठल्याही व्यक्तीस हा नोरोव्हायरस जडु शकतो.

नोरोव्हायरसची लक्षणे कोणकोणती आहेत?

symptoms of norovirus in Marathi

नोरोव्हायरसची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

1)वांत्या होणे

2) जुलाब होणे

3) जीव मळमळ करणे

4) पोटात दुखणे

5) डोके तसेच अंग दुखणे

इत्यादी काही नोरोव्हायरसची लक्षणे आहेत.

नोरोव्हायरस पासुन आपला बचाव व उपाय योजना?What measures should you take to protect yourself from norovirus in Marathi

नोरोव्हायरसची लागण आपल्यास होऊ नये तसेच नोरोव्हायरसपासुन आपला बचाव व्हावा यासाठी आपण पुढील उपाय करायला हवेत-

● बाहेरून आल्यावर आपण सर्वप्रथम आपले हात पाय पाण्याने स्वच्छ धुवायला हवे.

● सर्व भाजा फळे खाण्याआधी धुवून घ्यावीत.दुषित अन्न आणि पाण्याचे सेवण करू नये.

● नोरोव्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीपासुन सुरक्षित अंतर ठेवायला हवे.

● नेहमी स्वताचा एक सेपरेट टाँवेल अंग पुसण्यासाठी वापरायला हवा.

● दुसरयाचे कपडे परिधान करू नये.

नोरो व्हायरस झाल्यावर करावयाचे उपचार -norovirus treatment in Marathi

नोरोव्हायरसवर उपचार करण्याची कुठलीही आवश्यकता नसते कारण दोन तीन दिवसांत हा बरा होऊन जात असतो.तरी देखील नोव्हायरसची लागण झाल्यावर पुढील काळजी घ्यायला हवी.

● डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी भरपुर पाणी प्यायला हवे.

See also  मंगल पांडे कोण होते? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडे यांनी दिलेले अमुल्य योगदान. - Veer Mangal Pandey

● दोन तीन दिवसात बरे वाटु न लागल्यास आपण त्वरीत आपल्या घराजवळच्या तसेच शहरातील एखाद्या तज्ञ डाँक्टरकडे जाऊन याबाबद डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

● नोरो व्हायरस झालेल्या रूग्नाने असा साधा आहार सेवण करायला हवा जो पचायला सोप्पे जाईल.

● ज्याला नोरो व्हायरसची लागण झाली असेल त्याने घराबाहेर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे कारण हा एका व्यक्तीतुन दुसरया व्यक्तीत पसरत असतो.

अशा प्रकारे आज आपण नोरोव्हायरसविषयी काही महत्वाची माहीती जाणुन घेतली आहे.