लोकसंख्या वाढीचे कोणते दुष्परिणाम होत असतात? Population explosion effects

लोकसंख्या वाढीचे कोणकोणते दुष्परिणाम होत असतात? Population explosion effects

मित्रांनो आज ११ जुलै म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिन आहे.अणि आज आपण जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या वाढीविषयी जनतेत जागृकता निर्माण करण्यासाठी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम जाणुन घेणार आहोत.

आजच्या लेखात आपण लोकसंख्या वाढीचे आपल्या जीवनावर काय अणि कोणते दुष्परिणाम होतात हे देखील जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम –

बेरोजगारीचे वाढते प्रमाण –

दिवसेंदिवस जन्मदरात,लोकसंख्येत अधिक वाढ होत असल्याने अणि पुरेसा रोजगारही उपलब्ध नसल्याने लोकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगार प्राप्त व्हावा म्हणुन आपले गाव सोडुन इतर शहरांमध्ये देशांमध्ये नोकरीसाठी जावे लागत आहे.

अणि गावातील खेडयातील सर्व लोक उदरनिर्वाहासाठी शहरात राहायला गेल्याने तेथील लोकसंख्या वाढते.रहदारीचे प्रमाण वाढुन प्रदुषण वाढते,रोजगाराची साधने अपुरी पडु लागतात.

आरोग्यविषयक समस्यांचा तुटवडा –

दिवसेंदिवस लोकसंख्येत अधिक वाढ होत असल्याने सर्व लोकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत नाही.कारण याने वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधा अपुरया पडत आहेत.

अन्नधान्याची कमतरता –

जर एखाद्या परिवारातील सदस्य अधिक वाढले तर त्यांचा आहार त्यांच्या इतर गरजा तसेच अन्नधान्याचा खर्च देखील वाढत असतो.

कारण आहे त्या धान्यात सर्वाचे पोट भरू शकत नाही.अणि समजा तो परिवार गरीब असेल त्याची आर्थिक परिस्थिति कमकुवत असेल तर त्यांच्यावर उपासमारीची देखील वेळ येऊ शकते.अणि अनेक जण कुपोषणाला देखील बळी पडत असतात.

कारण बाजारात सर्व वस्तुंच्या किंमती वाढलेल्या असतात.त्यामुळ गरीब व्यक्ती त्या खरेदी करू शकत नाही.

See also  1-100 अंक अक्षरी मराठी,हिंदी आणि इंग्रजी - Numbers 1 to 100 in Hindi,Marathi and English

राहण्याची गैरसोय –

जर एकाच कुटुंबात खुप जास्त सदस्य एकत्र राहत असतील तर अशा वेळी प्रत्येकाला आपली प्रायव्हेसी मिळत नाही.प्रत्येकाला अडीअडचणीत कोंडल्यागत दाटावाटीत जगावे लागते.कारण घर देखील खुप मोठे नसते.त्यात घरातील सदस्य खुप जास्त असतात.

शैक्षणिक सुविधांचा अभाव –

लोकसंख्या अधिक असल्यास सर्व मुलांना एकाच शाळा काँलेजात अँडमिशन प्राप्त होत नाही.

कारण मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकांची उपलब्धता मर्यादित असते तसेच विदयार्थ्यांना बसण्यासाठी जागा आसन इत्यादींची देखील कमतरता भासत असते.

थोडक्यात अनेक शैक्षणिक सुविधांचा देखील तुटवडा जाणवत असतो.

अपुरी दळणवळणाची साधने-

लोकसंख्या वाढीमुळे लोकांना पाहिजे तेवढी दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाहीत कारण लोकसंख्या जास्त अणि दळणवळणाची साधने मर्यादित अशी परिस्थिती निर्माण होत असते.

पर्यावरणाची हानी –

लोकसंख्या वाढल्यावर लोकांच्या गरजा देखील वाढतात अणि मग लोक आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी पर्यावरणाच्या मर्यादित नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार वापर करून पर्यावरणाची हानी करू लागतात.

ज्याचा वाईट परिणाम पर्यावरणावर होत असतो.

उदा लाकुड फर्निचर इत्यादी प्राप्त करण्यासाठी लोक अमानुषपणे जंगलतोड करू लागतात.

अणि जंगलतोडीमुळे पाऊस न पडणे दुष्काळाची परिस्थिति निर्माण होणे निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडणे नैसर्गिक संसाधनाचा तुटवडा पडणे इत्यादी असा होत असतो.

आत्महत्येच्या अणि गुन्हेगारीच्या प्रमाणात अधिक वाढ –

पुरेसे शिक्षण घेऊनही कुठेही चांगली नोकरी प्राप्त होत नाही त्यात घरची आर्थिक परिस्थिति कमकुवत म्हणुन अनेक तरुण तरूणी आपल्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी वाईट मार्गाला जाऊ लागतात चोरया मारया करून गुन्हेगारी मार्गाला जाऊ लागतात.

काही जण तर कंटाळुन आत्महत्या देखील करत असतात.

वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात?

 

1)साक्षरतेचे प्रमाण वाढवायला हवे –

 

जर आपणास लोकसंख्या वाढीला आळा घालायचा आहे तर आपण देशात साक्षरतेचे प्रमाण वाढवायला हवे.कारण निराक्षरतेमुळे लोक अंद्रश्रदधेला बळी पडत असतात.

See also  श्री संत तुकाराम महाराज अभंग - काय ते वानावे वाचेचे पालवे ! Sant Tukaram Maharaj Abhang

 

सर्वानी शिक्षण घ्यावे यासाठी आपण लोकांना साक्षरतेचे महत्व देखील पटवून द्यायला हवे.

 

2) सामाजिक जागृती करायला हवी –

 

लोकसंख्या वाढीचे आपल्या जीवणावर काय दुष्परिणाम होत असतात याने कोणकोणत्या समस्या निर्माण होतात हे जनतेस समजावून सांगण्यासाठी आपण खेडयातील,शहरातील महिला अणि पुरुष वर्गात याविषयी जनजागृती करायला हवी.सामाजिक प्रबोधन करायला हवे.