Possessive अर्थ काय ? Possessive meaning in Marathi
आपल्या रोजच्या बोलण्यात संभाषणात पझेसिव्ह हा शब्द आपण नेहमी वापरत असतो.
तसेच बोलताना गप्पा मारताना एखाद्याच्या तोंडातुन नेहमी ऐकत असतो की तो तिच्या बाबतीत खुप पझेसिव्ह आहे.तिच्याशी कोणी बोललेले देखील त्याला सहन होत नाही.
पण पझेसिव्ह म्हणजे काय?पझेसिव्ह कशाला म्हणतात?पझेसिव्ह असणे म्हणजे काय?याचा अर्थ आपणास माहीत नसल्याने समोरचा आपल्याला नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हेच आपल्याला बरेचदा कळत नसते.
म्हणुन आजच्या लेखात आपण पझेसिव्ह म्हणजे काय?ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?हे जाणुन घेणार आहोत.
Possessive म्हणजे काय?
Possessive हा एक इंग्रजी भाषेतील शब्द आहे.जो आपण नेहमी इतरांच्या तोंडुन ऐकत असतो.
काही व्यक्ती असे असतात जे आपल्या वस्तु कोणासोबत वाटुन घ्यायला तयार नसतात.
आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने आपल्यापेक्षा दुसरे कोणाला अधिक महत्व दिलेले देखील त्यांना अजिबात सहन होत नसते.
त्यांना फक्त असेच वाटत असते की त्या समोरच्या व्यक्तीने फक्त आपल्याला महत्व द्यावे आपल्यापेक्षा इतर कोणालाही महत्व देऊ नये.
म्हणजेच असे व्यक्ती जे एखाद्या वस्तुवर व्यक्तीवर फक्त आपलीच मालकी तसेच हक्क गाजवत असतात.इतर कुणी त्या वस्तुकडे व्यक्तीकडे बघितलेले
देखील त्यांना सहन होत नसते.त्यांना possessive person असे म्हटले जाते.
उदा.1)राहुल हा निकिताचा बाँयफ्रेंड आहे.आणि तो निकिताच्या बाबतीत खुपच पझेसिव्ह आहे.तिच्याशी कोणी बोललेले,तिच्याकडे वाकडया नजरेने पाहिलेले तसेच तिने त्याला सोडुन इतर कोणाला जास्त महत्व दिलेले देखील त्याला अजिबात सहन होत नाही.
म्हणजेच राहुल हा निकिताच्या बाबतीत खुप पझेसिव्ह आहे.
उदा 2) बायकोला आपल्या नवरयाने परस्त्रीकडे बघणे तिला जास्त महत्व देणे तिच्याशी जवळीक करणे अजिबात सहन होत नाही तसेच नवरयाला आपल्या बायकोने कोणा दुसरया पुरूषासोबत हसणे-बोलणे थटटा मस्करी करणे त्याला अधिक महत्व देणे सहन होत नाही.
Possessive असणे ह्या शब्दाचे मराठीत अर्थ –
- एखाद्या वस्तु तसेच व्यक्तीवर फक्त आपलाच अधिकार मालकी गाजवणे.
- एखाद्या व्यक्तीवर अंकूश ठेवणे
- एखाद्या व्यक्तीवर बंधन ठेवणे
- एखादी वस्तु तसेच आपल्या आयुष्यातील व्यक्ती इतरांसोबत वाटुन घेण्याची ईच्छा नसणे.
- एखाद्या वस्तु व्यक्तीवर पुर्णपणे स्वताचा कब्जा करणारा
Possessive ह्या शब्दापासुन तयार होणारी काही वाक्यांची उदाहरणे –
1)rahul is very possessive about nikita.
राहुल हा निकिताच्या बाबतीत खुपच पझेसिव्ह आहे.
2) amruta is very possessive about her toys.
अमृता ही तिच्या टाँईज बाबद खुपच पझेसिव्ह आहे.
3)she is very possessive about him
ती त्याच्याबाबतीत खुपच पझेसिव्ह आहे.
Possessive या शब्दाचे इतर समानार्थी शब्द –
Controler-नियंत्रित करणारा
Possessive ह्या शब्दाचे विरूदधार्थी शब्द –
Permissive prrson –परवानगी देत असलेला व्यक्ती.